Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    चहा आणि कॉफी

    चहा उत्तेजितपणाचे कार्य करतो आणि ठराविक मर्यादेपर्यंत नशासुद्धा निर्माण करतो. त्याचप्रमाणे कॉफी आणि इतर उत्तेजित पेयेसुद्धा हेच कार्य करतात. याचा पहिला प्रभाव आनंदी करण्याचा असतो. यामुळे पोटाचे स्नायु उत्तेजित होतात. मेंदूमध्येसुद्धा याचे परिणाम होतात. यामुळे हृदयाची धडधड वाढते. यामुळे काही काळ सर्व तंत्रांना एक उत्तेजितपणा येतो. एक शक्ति प्राप्त होते. थकवा पळून जातो आणि असे वाटते की शरीरामध्ये शक्ति वाढली आहे. कल्पना शक्ति प्रबळ होते. मेंदू उत्तेजित होतो.MHMar 250.3

    या सर्व परिणामामुळे त्यांना वाटते की चहा-कॉफी आपल्या फायद्यासाठी आहेत. आपले पोषण करीत नाही. त्यांचे पचन होण्याअगोदरच त्यांचा प्रभाव मेंदू आणि शरीरावर दिसून येतो आणि चहा कॉफीपासून शक्ति मिळते असेMHMar 251.1

    आपण समजतो. ती शारीरिक आणि मेंदूवरील तांत्रिकावर असणारी उत्तेजना किंवा नशा आहे जी तात्पुरतीच असते आणि थाड्यावेळाने निघून जाते आणि अनैसर्गिक शक्ति कमी होते आणि यानंतर शरीर थकते व दुर्बल बनते. MHMar 251.2

    शरीर व मेंदू उत्तेजित करणारे पदार्थ वारंवार घेतल्यामुळे त्यांचे पुढीलप्रमाणे परिणाम दिसून येतात. डोकेदुखी, अनिद्रा, हृदयाची धडधड वाढणे व शरीर थरथरणे अशा अनेक गोष्टी निर्माण होतात. या वाईट परिणामामुळे जीवनाची शक्ति थकते म्हणून ही लक्षणे दिसून येतात. आणि थकलेल्या शरीराला उत्तेजित औषधांची नाही परंतु विश्रांतीची गरज आहे. निसर्गाला आपली शक्ति परत मिळविण्यासाठी वेळ लागतो. उत्तेजित पदार्थ घेतल्याने जी उत्तेजन शक्ती निर्माण होते ती अनैसर्गिक होती त्याचा प्रभाव शरीर, मेंदू व शरीरावर होतो. शरीराकडून अधिक कार्य करुन घेते म्हणून शरीर थकते. आणि या सवयीमुळे शरीराचे जे हाल होतात ते सावरण्यासाठी भरपूर वेळ लागतो. सर्व शरीर तंत्र बिघडते व शरीराच्या नैसर्गिक शक्ति परत मिळविणे कठीण होऊन बसते. या उत्तेजित पदार्थांवर आणि त्या व्यसनावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण होते. उत्तेजित किंवा मादक पदार्थ घेण्याची सवयींमुळे ते व्यसन बनते. यामुळे हरपलेली शक्ति परत मिळविण्यासाठी खूप वेळ लागतो.MHMar 251.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents