Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३—निसर्ग आणि परमेश्वराबरोबर

    हिरवळीमध्ये जंगलात व डोंगरावर
    येशूने पित्याशी वार्तालाप केला

    या पृथ्वीवर मुक्तिदात्याचे जीवन निसर्ग आणि परमेश्वरामध्ये गेले. परमेश्वराशी असणाऱ्या या संभाषणामध्ये आमच्यासाठी जीवनाची शक्तिचे रहस्य दाखविले येशू ख्रिस्त हा सतत आणि तत्पर कार्य करणारा होता. मनुष्यामध्ये इतकी मोठी जबाबदारी उचलणाऱ्यांमध्ये आजपर्यंत दुसरा कोणीच झाला नाही आणि कधी होणारही नाही. कोणीही या जगातील पाप आणि दुःखाचे ओझे उचलले नाही. कोणीही मनुष्याच्या भल्यासाठी इतक्या उत्साहाने व आत्मियतेने स्वत:चा त्याग करुन परिश्रम केले नाही. तरीही त्याचे जीवन पूर्ण आरोग्यदायी होते. शारीरिकरूपाने व मानसिक रूपाने तो बलिदान होणाऱ्या कोकऱ्याचे प्रतिरूप होता. “निष्कलंक निर्दोश कोकरा.”MHMar 23.1

    देह आणि आत्मा या दोहोमध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या समस्त मानवासाठी योजनेसाठी एक आदर्श होता. परमेश्वराच्या नियमांचे पालन केल्याने आम्हीही ख्रिस्तासमान बनू शकतो. जेव्हा लोकांनी येशूला पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या चेहऱ्यामध्ये ईश्वराची दया आणि स्थिर शांती एकमेकांमध्ये मिसळलेले पाहिली. तो आत्मिक जीवनाने घेरलेला दिसत होता. त्याचे आचरण सरळ आणि सत्य होते. त्यांनी लोकांना एक सामर्थ्यशाला प्रभावित केले होते की लपलेले जरी असले तरी पूर्णपणे लपू शकले नाही.MHMar 23.2

    त्याच्या सेवेच्या काळामध्ये धूर्त आणि ढोंगी लोकांनी नेहमी त्याचा पाठलाग केला होता. ते त्याच्या जीवनाचा नाश करण्यासाठी टपले होते. गुप्तचर त्याच्या मागावर होते. लोक त्याला शब्दामध्ये पकडण्याची संधी पाहात होते म्हणजे त्याच्यावर काहीतरी आरोप करता येईल. त्या देशातील अति हशार तज्ञ लोकांनी त्याच्याशी वादविवाद करुन त्याचा परभाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कधीच त्याच्यावर विजय मिळवू शकले नाहीत. गालीलातील या नम्र शिक्षकाकडून ते अपयश आणि अपमानीत होऊन त्यांना मैदान सोडावे लागले. ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये एक असा ताजेपणा होता आणि सामर्थ्य होते की या आधी लोकांनी असे पाहिले नव्हते की ऐकले नव्हते. एवढेच नाही तर त्याच्या विरोधकांनाही कबूल करावे लागले की “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही” (योहान ७:४६).MHMar 23.3

    येशूचे बालपण दारिद्र्यात गेले, परंतु तो त्या वेळच्या भ्रष्टतेपासून पूर्णपणे वेगळा व स्वतंत्र होता. त्याने खोट्यापणाची सवय कधीच लाऊन घेतली नाही. सूतार काम करताना, कौटुंबिक जीवनाचे ओझे वाहताना कष्ट आणि आज्ञाधारकपणाचे धडे शिकत असताना त्याने निसर्गामध्ये असणाऱ्या देखाव्याचा आनंद उपभोगला. त्याने निसर्गातील ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ज्ञानामध्ये वाढ होत गेली. त्याने परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन केले आणि त्याच्या आनंदाचा सर्वात मोठा क्षण म्हणजे सर्व काम संपल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन हिरवळ दाट झाडी आणि निळसर डोंगरामध्ये जाऊन परमेश्वराच्या वचनाचे मनन करणे आणि पित्याशी संवाद करण्यास त्याला अति आनंद वाटत असे. रोज पहाटे उठून एकांतामध्ये तो जात असे. झाडाखाली बसून परमेश्वराच्या वचनाचे मनन आणि प्रार्थना करण्यामध्ये तो वेळ घालवित असे. गीतांच्या ध्वनीबरोबर तो सूर्याच्या किरणांचे स्वागत करीत असे. धन्यवाद व गीत गाऊन तो आपल्या श्रमांचा आनंद उपभोगत असे. निराश आणि थकलेल्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये सहानुभूतिपूर्ण स्वर्गीय आनंद प्राप्त करुन देत होता. MHMar 24.1

    आपल्या सेवेसाठी तो बहुतेक वेळ घराबाहेरच घालवित असे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास बहुतेक करुन तो पायीच करीत असे. त्याचे बहुतेक शिक्षण त्याने मोकळ्या हवेमध्येच दिले. आपल्या शिष्यांना तो सहसा शहरापासून दर मोकळ्या मैदानात घेऊन जात असे आणि त्यांच्यामध्ये विश्वास आणि आत्मत्याग करण्याचे धडे तो देत असे. अगदी साध्या व सोप्या भाषेमध्ये त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत असे. त्याची ही ठिकाणे डोंगरावर झाडांच्या सावलीत गालील समुद्रात थोडे दूर. त्याने आपल्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचने अशाचप्रकारे डोंगरावर आणि समुद्रकिनाऱ्यावर लोकांना उपदेश देण्याची उदाहरणे आहेत.MHMar 24.2

    येशूने लोकांना निळ्या आकाशाखाली, डोंगरावरील हिरवळीत पाण्याच्या काठावर किंवा समुद्र किनाऱ्यावर असे उपदेश केले आहेत. तेथे तो लोकांची मने जगीक जीवनापासून वळवून त्याने निर्माण केलेल्या निसर्गाकडे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. निसर्गाची वृद्धी आणि विकासाकरवी त्याने निसर्गाचे नियम प्रकाशित केले. जेव्हा लोक आपल्या डोळ्यांनी परमेश्वराने निर्माण केलेले पहाड पाहातात आणि त्याच्या हातच्या कृती पाहतात आणि ती अद्भुत कृत्ये पाहून स्वर्गीय सत्यतेचे अनमोल धडे शिकतात. अशाप्रकारे येणाऱ्या दिवसांमध्ये स्वर्गीय गुरुचे धडे निसर्गातील गोष्टी पाहून त्यांची दोन वेळा जाणीव होते. यामुळे बुद्धीला चालना मिळेल आणि हृदयाला विश्रांती मिळेल. MHMar 24.3

    त्याचे शिष्य जे त्याच्या कार्याला हातभार लावित होते. येशू त्यांना कधी कधी स्वतंत्र करुन त्यांच्या घरी पाठवून देत असे म्हणजे ते आपापल्या घरी जाऊन विसावा घेऊ शकतील, परंतु लोकांना त्याच्या कार्यापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. दिवसभर तो लोकांची तो सेवा करीत असे. कारण त्याच्याभोवती लोकांची गर्दी सतत असे, परंतु संध्याकाळी व भल्या पहाटे उठून डोंगरावर जाऊन स्वर्गीय पित्याबरोबर संभाषण करीत असे. बहुतेक वेळा दिवसभर लोकांची सेवा करणे आणि विरोधकांच्या खोट्या शिकवणीशी संघर्ष करुन खूप थकून जात असे, यामुळे त्याची आई आणि शिष्यसुद्धा भयभीत होत असत. कारण त्याचे जीवन समाप्त होते की काय अशी धास्ती त्यांना वाटत असे, परंतु दिवसभर कष्ट करुन लोकांची सेवा करुन थकल्यावर तो संध्याकाळी एकांतात प्राथनेसाठी जात असे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि टवटवितपणा व जीवनाची शक्ति दिसत असे. ही शक्ति त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पसरत असे. रोज सकाळी परमेश्वराबरोबर एकांत स्थळी थोडा वेळ घालविल्यानंतर मनुष्यासाठी स्वर्गीय प्रकाश घेऊन येत होता.MHMar 25.1