Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    माझ्यामध्ये राहा

    ख्रिस्त आम्हाला आग्रह करतो तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे ......... राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. जो माझ्यामध्ये राहाते आणि मी ज्याच्यामध्ये राहातो तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येणार नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.MHMar 412.4

    जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली तशी मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतित राहा. “तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे.” (योहान १५:४-१६).MHMar 412.5

    “पाहा, मी दाराशी उभी आहे व दार ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील.” (प्रकटीकरण ३:२०).MHMar 413.1

    “आत्मा मंडळ्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐका.MHMar 413.2

    “जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो ते खडा घेणाऱ्या शिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.” (प्रकटी २:१०). “जो विजय मिळवितो त्याला मी पहाटेचा तारा देईन” आणि मी आपल्या परमेश्वराचे नाव आणि मी आपले नाव त्यावर लिहीन.” (प्रकटीकरण २:२६, २८,३:१२).MHMar 413.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents