Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शरीर विज्ञानाचा अभ्यास

    आई-बापाने सुरुवातीलाच शरीर विज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या भावी बाळासाठी त्यांना सरळ व सोप्या भाषेमध्ये या सिद्धांताचा अभ्यास करावा. त्यांनी हे शिकावे की बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्तिंना सुरक्षित कसे ठेवावे आणि त्यांनी आपल्या जीवनातील या देणगीचा वापर कसा करावा म्हणजे ते एकमेकांसाठी आशीर्वादीत आणि परमेश्वराचा आदर कसे बनतील. तरुणांसाठी हे ज्ञान अति मोलाचे आहे. ज्या गोष्टी जीवन आणि आरोग्या विषयीच्या असतात त्यांचे ज्ञान शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्यदायी शिक्षणाला महत्त्व असते.MHMar 298.2

    आई-बापाला आपल्या बाळासाठी अधिक आणि इतरांसाठी कमी वेळ द्यावा. आरोग्यविषयी अभ्यास करा आणि आपले हे ज्ञान व्यवहारामध्ये आणा. आपल्या मुलांना शिकवा की कोणत्या गोष्टीचा कसा परिणाम होतो. त्यांना हेही शिकवा जर ते आरोग्यदायी आणि सुखी जीवन जगू पाहतात तर त्यांनी निसर्ग नियमांचे पालन करावे. हा बदल करण्यासाठी त्यांना वेळ लागेल. तुमच्या इच्छेनुसार लगेच होणार नाही, परंतु धीर सोडू नका आपले काम करीत राहा, प्रयत्न सोडू नका.MHMar 298.3

    आपल्या मुलाला पाळण्यामध्येच आत्मत्याग आणि आत्मनियंत्रण करण्यास शिकवा. त्यांना निसर्गाचा आनंद उपभोगू द्या. निसर्गनियम त्यांना शिकवा आणि त्याप्रमाणे वागण्यास शिकवा. त्यांचे शरीर बुद्धी आणि आत्मिक अशा सर्व शक्तिंना व्यायामाची सवय लावा. आपल्या मुलांचे पालनपोषण असे करा की त्यांचे शारीरिक आरोग्य व त्यांचे चारित्र्य उत्तम राहावे. त्यांचा चेहरा नेहमी हसरा आणि स्वभाव मधूर असावा. त्यांच्या कोमल बुद्धीवर असा ठसा उमटवा की वर्तमानातील आपली भूक भागविण्यासाठी त्यांनी जगावे असे परमेश्वराला वाटत नाही. परंतु आपले अंतिम लक्ष्य साध्य करण्यासाठी झटावे. त्यांना शिकवा की परीक्षामध्ये पडणे म्हणजे ही कमजोरी आणि दुष्टपणा आहे आणि परीक्षामध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे उत्तम वीराचे काम आहे. हे धडे चांगल्या सूपित जमिनीत पडणाऱ्या बीयासारखे आहे आणि हे बी अशी फळे आणील की त्यामुळे तुम्ही खूश व्हाल.MHMar 298.4

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई-वडीलांनी आपल्या मुलांभोवती प्रसन्न वातावरण, दया आणि शिष्टाचाराचे वातावरण निर्माण करा. आपले घर असे असावे की त्यामध्ये प्रेमाचा वास असावा. सर्व गोष्टीमध्ये प्रीतिचा वापर असावा. आपली दृष्टी आणि शब्दामध्ये तिचा वापर असावा. अशा घरामध्ये स्वर्गीय देवदूत अति आनंदाने राहतात.MHMar 299.1

    आई-बापांनो तुमच्या घरामध्ये प्रेमाची उब, प्रसन्नता आणि खूशीबरोबरच तृप्ती आपल्या हृदयामध्ये ठेवा आणि त्याचा मधूर प्रवाहामध्ये प्रसन्नता पसरु द्या. यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. म्हणून तुम्ही एक दयाळू आणि सहनशील स्वभाव प्रगट करा आणि सर्व उपायांचा वापर करुन याच भावना आपल्या मुलांमध्ये विकसित करा. त्यांना उत्साहित करा. अशा प्रकारचे वातावरण मुलांना मोकळी हवा आणि स्वच्छ वातावरणामध्ये त्यांचा विकास होईल.MHMar 299.2

    *****