Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय २२—पोशाख

    पवित्रशास्त्र आम्हाला साजेल अशी वेषभूशा असावी असे सांगते. “तसेच स्त्रियांनी स्वत:स साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे” (१ तीमथी २:९). पवित्र शास्त्रामध्ये कपड्यातील दिखाऊपणा, भडक रंग आणि दागदागिन्यासाठी मनाई केली आहे. आपल्या पोशाखामध्ये कोणत्याही प्रकारचा आकर्षकपणा असू नये, आपल्या पोशाखाची कोणी स्तुति करु नये असा साधाच असावा. “केसांचे गुंफणे आणि सोने, मोते व मौल्यवान वस्ते ह्यांनी नव्हे” (१ तीमथी २:९).MHMar 220.1

    पैसा हा परमेश्वराने दिलेली ठेव आहे, तो आम्हांला अशासाठी दिला नाही की आम्ही गर्वाने फुगावे, त्याविषयी बढाई मारावी आणि आपली महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो खर्च करावा. तर परमेश्वराच्या संतानाच्या हातून भुकेले, उघडे वागडे गरीबांना अन्नाचा पुरवठा व्हावा म्हणून दिला आहे. त्रासलेल्यांना सुरक्षा, गरीबांना सुवार्ता सांगणे जो पैसा आपण स्वत:च्या ख्याली खुशालीसाठी खर्च करीत आहात तो पैसा योग्यप्रकारे खर्च केला तर अनेकांची हृदये आनंद व समाधानाने खुलून येतील. गरीबांना अन्न, वस्त्र मिळेल. आजाऱ्यांना औषधोपचार मिळून ते बरे होतील आणि या सर्वांचा तुम्हांला आशीर्वाद मिळेल. ख्रिस्ताच्या जीवनाकडे लक्ष द्या. त्याच्या स्वभावाचे अध्ययन करा आणि त्याच्या आत्मत्याग जीवनाचे अनुकरण करा.MHMar 220.2

    आजच्या केवळ नावानेच ख्रिस्ती असणारे लोक अनावश्यक दागीने व भारी कपड्यावर पैसे खर्च करतात. त्याऐवजी सर्व भुकेले, गरीबांना अन्न, उघड्यांना वस्त्रांचा पुरवठा करण्यास पुरेसे होतात. जो पैसा गरीब, दःखी, अपंग व भुकेलेल्यांवर खर्च करायला हवा तो स्वत:च्या इच्छा व फॅशनवर खर्च केला जातो. उद्धारकर्त्याच्या प्रीतिचे सुसमाचाराचा प्रसार करणे आवश्यक आहे. परंतु कार्य कमी होत आहे आणि सुवार्ता मिळण्याआधीच मोठ्या संख्येने लोक मरत आहेत. आमच्या जवळचे आणि दूरचे लोक सुवार्ता प्रसाराला वंचित होत आहेत. त्यांचा उद्धार होत नाही. परंतु परमेश्वराने पृथ्वीला आशीर्वार्दाने भरुन टाकले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आनंद भरुन टाकले आहे. मग आमच्या आजूबाजूला असणारे गरीब, गरजवंत, अनाथ, विधवा व आजारी लोकांचा विलाप कोणाला ऐकू कसा येत नाही. त्यांना स्वर्गाचे राज्य मिळविण्यसाठी कोणत्या प्रकारचा अडथळा होत आहे ? जेव्हा ख्रिस्त या जगामध्ये होता तेव्हा तो रोग आजार बरे करीत येणाऱ्या राज्याची सुवार्ताप्रसार करीत होता तेव्हा जे धनवान आपल्याच भोगविलासात व सुखसमाधानात जगत होते. त्यांना कोणते निमित्त होते ? अशासाठी देवाने परवानगी दिली नाही येथून श्रीमंत तरुणाला सांगितले की तुझे असेल नसेल ते सर्व विक, गोरगरीबांना दे आणि चल माझ्या मागे. तेव्हा तो निराश होऊन परत गेला कारण तो फार श्रीमंत होता. जगीक संपत्तीसाठी त्याने सार्वकालिक जीवन नाकारले. अशांना ख्रिस्त म्हणेल “जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तहानेला होतो तेव्हा पाणी पाजले नाही. मी उघडा होतो तेव्हा वस्त्र दिले नाही. मी आजारी व बंदीगृहात होतो तेव्हा माझा समाचार घ्यावयाला नाही आला.” (मत्तय २५:४२-४३).MHMar 220.3

    आपला पोशाख विनयशील आणि साधा असावा. भडक रंगाचा आणि इतरांना आकर्षित करणारा नसावा. म्हणजे तो सेवेसाठी उपयुक्त असावा. तो टिकाऊही असावा. दाखविण्यासाठी नसावा. आपल्या शरीरासाठी सुरक्षित असवा. थंडी व उष्णतेपासून संरक्षक असावा. नीतिसूत्रामध्ये सुरक्षित असावा. थंडी व उष्णतेपासून संरक्षक असावा नीतिसुत्रामध्ये बुद्धीवान स्त्री विषयी सांगितले आहे. “आपल्या कुटूंबातीला बर्फाचे भय वाटत नाही. कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते.” (नीतिसूत्रे ३१:२१).MHMar 221.1

    आमचा पोशाख स्वच्छ असावा, मळीण कपडे आरोग्यासाठी हानीकारक असतात. यामुळे शरीर व आत्मा दोन्हीही दूषित होतात. “तुम्ही देवाचे मंदिर आहा... जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र तेच तुम्ही आहा.” (१ करिथ ३:१६-१७). पोशाख किंवा ड्रेस प्रत्येक बाजूंनी शरीराला आरोग्यदायी असावा. सर्व गोष्टींपेक्षा वेगळा परमेश्वराची इच्छा आहे की “निरोगी राहा’ देह आणि आत्म्याचे आरोग्य स्वच्छ ठेवा आणि आम्हांला देह आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी परमेश्वराचे सहकारी व्हावे. आरोग्यदायी वस्त्रांनी या दोन्हीला उत्साह मिळतो.MHMar 221.2

    यामध्ये सुंदरता, अनुग्रह व नैसर्गिकतेची जोड असावी. ख्रिस्ताने आम्हांला जीवनाच्या गर्वाविषयी सावधगिरीची सूचना दिली आहे. परंतु नैसर्गिक सौंदर्याविषयी नाही. जमिनीमध्ये उगवणारी व फुलणारी फुले त्याच्या पावित्र्याची साक्ष देतात. त्यांच्याकडे निर्देश करीत तो म्हणाला, “तरी मी तुम्हांस सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखा सजला नव्हता.” (मतय ६:२९). अशा प्रकारे निसर्गातील गोष्टींच्या सौंदर्य, पावित्र्य आणि शुद्धतेचे उदाहरण देतो, वर्णन करतो आणि ते स्वर्गाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. या प्रकारे आमची वस्त्रे किंवा पोशाख त्याला पसंत असावा.MHMar 221.3

    परमेश्वराला सर्वात अधिक आवडणारा पोशाख म्हणजे आमच्या आत्म्यावर असण्यास सांगतो. “तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी.” (१ पेत्र ३:४). त्याची किंमत आणि सौंदर्य बाहेरील दिखाव्याला काहीच मोल नाही.MHMar 222.1

    ते लोक जे उद्धाकर्त्याचे सिद्धांतानुसार चालतात त्यांच्यासाठी त्याचे वचन किती महान आहे.” तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता ? रानातील पाखरे पाहा. ती कशी वाढतात ? ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हास सांगतो शलामोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारिखा सजला नव्हता. जे रानातले गवत आहे उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर आहे तुम्ही अल्पविश्वासी तो विशेषकरुन तुम्हाला पोशाख घालणार नाही काय ? यास्तव काय खावे काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका कारण ही र्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मतय ६:२८-३३).MHMar 222.2

    “ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यांस तो पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुजवर असतो.” (यशया २६:३).MHMar 222.3

    एक विरोध असा की फॅशनचे नियम म्हणजे थकवा, बेचैनी आणि आजारपण निर्माण होते. कारण कमरेला घट्टपणा किंवा अंगाला चिकटून बसणारे कपडे आरोग्यास चांगले नसतात. फॅशन म्हणून वापरण्यात येणारे कपडे पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या नियमांच्या कितीतर विरोधात आहेत. त्या जीवन शैलीच्या विषयाबद्दल विचार करा. मागील शंभर वर्षापूर्वी जी फॅशन होती त्या काळी जे लोक फॅशन करीत नव्हते त्यांना असभ्य समजत असत. यामध्ये कितीतरी आत्मसंयमी आणि देवावर श्रध्दा असणारे सभ्य लोक होते आणि अशा लोकांना अनुचित असे घोषित केले होते.MHMar 222.4

    परमेश्वराचे वचन केवळ कपड्याच्या फॅशनविषयीच विरोध करीत नाही, तर दागिने व जवाहर यांच्याही विरोधात सांगितले आहे. त्याचबरोबर धनसंचया विरोधी सुद्धा वचने आहेत. यशया ३:१६,२३ वाचा यामध्ये दागिन्यांविषयी सांगितले आहे. काहीजण तर आयुष्यभर धनसंजय करतात व त्या विषयीच विचार करतात. यामुळे ते आत्मशक्ति व्यर्थ गमवितात. परंतु बरेच गरीब लोक आपली रोजची भाकर कष्टाने मिळवितात. ते साधेच कपडे वापरतात. महागडे वस्त्रे ते घेऊ शकत नाहीत. अनेक निर्धन मुली महागडी वस्त्रे खरेदी करण्यासाठी काहीही करु शकतात कारण त्यांची तशी लालसा असते. त्या विनयशील व विनम्र नसतात. अनेक गरीब असेही आहेत जे श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतात आणि त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयार असते. निर्लजपणाची मर्यादाही ते ओलांडतात. अपमानजनक मार्गावर चालणाऱ्या व धन कमाविणाऱ्या अनेक मुली वाम मार्गाच्या जाळ्यात अडकतात. पत्नी आणि मुलांच्या वायफळ खर्चासाठी त्यांचे वडील आर्थिक घोटाळ्यामध्ये सापडतात आणि शेवटी त्यांचे दिवाळ निघते. अनेक महिलांसुद्धा स्वत:च्या आणि मुलांच्या वायफळ व फॅशनेबल खर्चासाठी दीर्घकाळ कठीण परिश्रम करतात. अनेक महिला आपल्या मुलांच्या आधुनिक फॅशनसाठी रात्री उशीरापर्यंत कष्ट करतात. त्यांच्यासाठी फॅशनेबल कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी अति कष्ट करतात. आपली मुले सुंदर दिसावित अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु या सर्व प्रकाराने मुलांना सौंदर्य प्राप्त होत नाही किंवा आरोग्य. फॅशनसाठी ते आपले आरोग्य, आत्म्याची शांति हरवून बसतात. यामुळे त्यांचे योग्य पालनपोषण व्हायचे होते ते होतच नाही. त्यांचे हृदय, बुद्धी आणि संस्काराकडे दुर्लक्ष केले आहे. या सर्वांमुळे आत्म्याचाही विकास होत नाही. MHMar 223.1

    आईकडे मुलांच्या शारीरिक विकासाचे नियम असतात त्यांनी त्यांचा अभ्यास करावा. परंतु आजकालच्या महिलांना वेळ मिळत नाही. त्या आपल्या मुलांच्या आरोग्य आणि संस्कृतीची काळजी घेत नाहीत. अशा बऱ्याच माता आहोत त्या मुलांना कामवालीच्या हवाली सोडून दिवसभर बाहेर असतात. मुलांची मानसिक व आत्मिक उन्नती, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या परीक्षेमध्येही सहकार्य त्या करु शकत नाहीत.MHMar 223.2

    या जगात आल्याबरोबर मुले फॅशनच्या जगामध्येही प्रवेश करतात. ते आपल्या उद्धारकर्त्यापेक्षा फॅशनविषयीच जास्त विचार करतात. आपल्या पोशाखा विषयीच विचार करतात. मुले पाहतात की त्यांची माता बायबल वाचण्याऐवजी फॅशनेबल पुस्तकेच जास्त प्रमाणात पाहतात. पोशाखातील फॅशन आणि दिखाव्यामध्ये त्यांचा जास्त रोख असतो. जीवनातील सत्य हे मधुरता व सर्वोतमता याविषयी ते वंचित राहतात. फॅशनमुळे त्यांना येणाऱ्या जीवनासाठी तयारी करण्याची त्यांना वेळ मिळत नाही. MHMar 224.1

    ज्याने सतत बदलणाऱ्या फॅशनसाठी व नवनवे शोध लावणार दुसर कोणीही नाही, परंतु तो सर्वांचा वैरी सैतान आहे. तो मानवजातीला दुःख आणि नाशामध्ये ढकलून परमेश्वरासाठी दुःख आणि अनादर निर्माण करण्यापेक्षा जास्त काहीच करु शकत नाही. त्याची हीच इच्छा असते की देवाच्या लोकांना कोणत्याही निमित्ताने त्याच्यापासून दूर करावे. फॅशन शरीर आणि आत्म्याला दुर्बळ करते बुद्धी भ्रष्ट होते आणि यामुळे आत्मा शक्तिहीन होतो. महिला गंभीर आजाराची शिकार बनतात आणि त्यांच्या पीडा त्यांच्या पेहरावामुळे अधिकच वेदनादायक बनतात. येणाऱ्या संकटकाळामध्ये आपली शक्ति सांभाळून ठेवण्याऐवजी चुकीच्या सवयीमुळे आरोग्य आणि जीवनाचे बलिदान देतात. आपल्या मुलांनासुद्धा ते आजार आणि विकृतियुक्त आजार देतात कारण मुलांना पालकांकडूनच जीवनाचे खोटे विचार आणि तशी आश्वासने जी सैतानी विचारांकरवी आलेली असतात.MHMar 224.2

    काही फॅशन तर अशा असतात की त्यामुळे मुली व महिलांना अति कष्ट पडतात. त्यांनी अशाप्रकारचे स्कर्ट धारण केलेले असतात की त्या वरील नक्षी व कलाकुसरीमुळे वजनदार असतातच परंतु पायघोळ असल्यामुळे ते वर उचलून चालावे लागते, त्याचप्रमाणे त्या हातामध्ये इतर काहीच घेऊ शकत नाहीत. तसे पावसाळ्यामध्ये पावसाचे किंवा चिखलाचे पाणी अंगावर उडते. ही एक वेगळीच अडचण स्कर्ट खाली सोडता येत नाही तो सोडला तर जमिनीवर लोळणार व मळीण होणार अशा प्रकारच्या फॅशनमुळे स्त्रियांना त्रासच होतो.MHMar 224.3

    दुसऱ्या प्रकारची फॅशन अशी की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम पडतो. महिलांचे काही पोशाच असे असतात की या पोशाखांचा सर्व भार छाती आणि कमरेवर पडतो. त्यामुळे पोशाखाच्या भारामुळे पोशाखाखाली घसरु नये म्हणून तो घट्ट बांधवा लागतो. छातीशी असणारा घट्टपणामुळे पोशाख छातीला चिकटून राहतो यामुळे त्वचा मोकळी राहू शकत नाही व पोशाखाचे कापड कृत्रिम धाग्याचे असल्यामुळे त्वचारोग होऊ शकतो आणि घट्टपणामुळे फुफ्फुसे मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. कमरेवरील घट्टपणामुळेही पोशाखाचा सर्वभार कमरेवर पडतो त्यामुळे पोट वर खाली होऊ शकत नाही. त्यामुळे वाकून चालण्याची प्रवृत्ति निर्माण होते व श्वास घेणेही कठीण होऊन बसते.MHMar 224.4

    मागील काही वर्षांमध्ये कमरेला दबाव होत असल्याच्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या. कमरेचे धोके निर्माण झाले तरी हरकत नाही, परंतु फॅशनचे कमी होत नाही व अजूनही झाले नाही. फॅशनची इच्छा इतकी प्रबल असते की त्यामुळे शरीराचे व आरोग्याचे होणारे नुकसान कोणाच्याच लक्षात येत नाही. फॅशनच्या सवयीमुळे स्त्रिया आणि मुलींना होणारे आरोग्यदायी नुकसान मर्यादेपलिकडे जात आहे. आरोग्यासाठी हे अति आवश्यक आहे. की छाती पूर्ण प्रसरण होणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा पोशाख असेल तरच मोकळा श्वास घेता येतो. फुफ्फुसांना हालचाल करण्यासाठी मुक्त वाव द्यावा आणि फुफ्फुसांना जर प्रसरण पावण्यास बंदी घातली तर ऑक्सिजन पूर्ण शरीरास व्यवस्थित पोहोचणार नाही व त्यामुळे आरोग्य बिघडू शकते, रक्तसंचार व्यवस्थित होणार नाही. फुफ्फुसातून जे विषारी द्रव्य बाहेर टाकण्यात येतात त्यांना अडथळे निर्माण होतात. ते फुफ्फुसातच राहतात. तसेच रक्तप्रवाहामध्ये अडथळे येतात. अंतरिक इंद्रियांना पेटके येतात त्यांना स्वतंत्रपणे आपले कार्य करता येत नाही. अशाप्रकारे फॅशनमुळे पोटावर पट्टे आवळून बांधल्याने शरीर सुडौल व बांधेसुद होत नाही. शारीरिक सौंदर्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक अवयवांमध्ये एकसंग संतुलन वाढत होणे आवश्यक आहे. शारीरिक विकासाचा योग्य नमूना हो कोणत्या शिंप्याकडे नाही, परंतु परमेश्वराच्या नियमानुसार मानवाचा विकास होत असतो. केवळ परमेश्वरच खरे सौंदर्य देणारा आहे. आणि केवळ त्याच्या आदर्शानुसार पालन केल्याने आम्हाला खरी सुंदरता प्राप्त होते. फॅशनमुळे होणारे दुसरे नुकसान म्हणजे वस्त्रांचे एकसमान वितरण होत नाही. यामुळे शरीराचा काही भाग आवश्यकतेपेक्षा अधिक झाकला जातो आणि काही भाग आवश्यकतेनुसार व्यवस्थित झाकला जात नाही. शरीरापासून दूर असणाऱ्या अवयवांना विशेष करुन संरक्षण किंवा उष्णता मिळत नाही म्हणून त्यांचे व्यवस्थित रक्षण करणे आवश्यक आहे. कारण या अवयवांना कमी रक्ताचा पुरवठा होत असतो, परंतु जोपर्यंत मुख्य अंग व्यवस्थित झाकले जात नाही तोपर्यंत हातापायांना रक्त पुरवठा योग्य प्रमाणात मिळणार नाही. MHMar 225.1

    बहुतेक महिलांना शुद्ध हवा मिळत नाही. त्यामुळे त्यांना काळजी वाटते. त्या आपले हातपाय जास्त प्रमाणात हलवित नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरात त्यांचा जास्त वेळ जातो. या महिला निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकतात, परंतु त्या पूर्णपणे रोगी होतात. बहुतेक महिला आजारी होऊनच मरतात. परंतु अंगभर कपडे घालून मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करतात तर त्या निरोगी जीवन जगू शकतात. MHMar 226.1

    सर्वाधिक आरोग्यवर्धक पोशाख बनवितांना संपूर्ण शरीराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पाणी, हवा आणि भोवतीचे वातावरण पाहूनच पोशाख बनविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपली आरोग्यदशा, वय, पेशा आणि वातावरणानुसार पोशाखाची गरज आहे. शरीराच्या प्रत्येक भागाला संरक्षण आणि ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये याची काळजी घ्यावी. हातापायांना मोकळी हालचाल करण्याइतके कपडे ढिले असावेत.MHMar 226.2

    ज्या महिला आजारी आहेत त्यांनी विवेकपूर्ण पोशाख वापरुन व व्यायाम करुन निरोगी जीवन जगू शकतात. घराबाहेर मोकळ्या हवेत जाऊन आनंदी वातावरणात वेळ खर्च करावा. सुरुवातीला सावध राहून व्यायाम करावा. त्याचा सराव झाला म्हणजे मग नियमितपणे व्यायाम करावा व हळूहळू व्यायाम वाढवित जावे. असे केल्याने अनेक महिला आपले हरवलेले आरोग्य पुन्हा मिळवू शकतात.MHMar 226.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents