Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    बंधु प्रेम

    ख्रिस्ताने राष्ट्रीयता पद किंवा पंथांमध्ये असणारा फरक स्वीकारला नाही. शास्ती आणि परुशांची इच्छा होती की स्वर्गामध्ये केवळ त्यांचेच उच्च स्थान असून इतर परिवारांना स्वर्गाच्या बाहेर जागा मिळावी, परंतु येशूने विभागणी करणाऱ्या सर्व भिंती पाडून टाकल्या. तो हे दाखवायला आला की त्याची दया आणि प्रेमाचे उपहार पृथ्वीवरील हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि पाऊस भेदभाव न ठेवता सर्वांवर उपकृत होतो. तसेच त्याच्या प्रीतिने सर्वांना ताजेतवाने करते. ख्रिस्ताच्या जीवनाने एक अशा धर्माची स्थापना केली की त्यामध्ये कोणतीच जात किंवा भेदभाव नाही की पंथ नाहीत. एकच धर्म ज्यामध्ये यहूदी व अन्य जाती, श्रीमंत, गरीब, दास, स्वतंत्र असा भेदभाव नसून सर्व बंधूप्रेमाने एकत्र राहताता जसे परमेश्वराला सर्व एक तसेच हे लोक भेदभाव विसरुन राहतात. नैतिकतेच्या कोणत्याच प्रश्नाने त्यांच्या अंदोलनासाठी प्रभावित केले नाही. त्याने शेजारी, अनोळखी मित्र व शत्रु असा भेदभाव मुळीच केला नाही. जीवनाच्या पाण्यासाठी तहानलेला आत्मा त्याच्या हृदयाला आकर्षित करीत होता.MHMar 6.1

    तो कोणत्याही व्यक्तिला मूल्यहीन समजून त्याच्या जवळून पुढे गेला नाही. परंतु प्रत्येक आत्म्याला आरोग्यदायी औषध देण्यासाठी शोध करीत होता. तो कसल्याही आणि कोणत्याही संगतीत असो, वेळ आणि परिस्थितीनुसार त्याने योग्य शिक्षण दिले. त्याने लोकांकरवी आपल्याच लोकांनी दुर्लक्षित आणि अपमानकारक गोष्टींमळे अधिक जागरुक बनविले. निराशात्मक आणि सर्वात असभ्य लोकांना आशा देऊन त्यांच्यासमोर आश्वासन ठेवले की ते सुद्धा निर्दोष आणि अहिंसक बनून देवाच्या संतांमध्ये दिसून येणाऱ्या चारित्र्याचे धनी बनू शकत.MHMar 6.2

    जे लोक मार्ग चुकून सैतानाच्या नियंत्रणामध्ये गेले होते आणि सैतानाच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यामध्ये त्राण नव्हते. अशा निराश, आजारी, परीक्षेत पडलेले अशा पतित लोकांना येशून आपल्या मृदू आवाजामध्ये व दयाळू शब्दामध्ये त्यांना समजाविले होते. तो अशा आत्म्यांना भेटला की ते शत्रुबरोबर आपली लढाई लढीत होते. अशा लोकांना धीर देण्यासाठी त्याने आश्वासन देऊन प्रोत्साहन दिले की शेवटी त्यांचीच सरशी होणार. कारण देवाचे दूत त्यांच्या बाजूचे होते आणि त्यांना विजय मिळवून देतीलच.MHMar 6.3

    जकात गोळा करणाऱ्यांच्या मेजावर एक आदरणीय पाहुण्यासारखा बसला होता. सहानुभूति आणि दयाळूपणाबरोबर त्याने असे दाखविले की तो मानवतेचा आदर करीत होता आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या तहानलेल्या हृदयांवर त्याचे शब्द जीवनदायी शक्तियुक्त आशीर्वादाच्या रूपाने पडले. त्यांच्यामध्ये नवी चेतना निर्माण झाली आणि समाजातील तिरस्कारी लोकांसाठी नव्या जीवनाच्या शक्यतेसाठी दार उघडले.MHMar 6.4

    येशू जरी एक यहूदी होता तरीही त्याने आपल्या राष्ट्रातील परुशांचे नियम नाकारले. तो शमरोनी लोकांमध्ये मुक्तपणे मिसळत होता. यहूदीयांच्या परंपरे विरुद्ध जाऊन येशू शमरोन्यांचा सेवा-सत्कार स्वीकारला. त्यांच्या घरात त्याने विश्रांती घेतली. त्यांनी दिलेले जेवण त्याने खाल्ले, त्यांच्या समाजात त्याने शिक्षण दिले. त्यांच्याशी नम्रतापूर्वक आणि दयेचे व्यवहार केले. मानवी सहानुभूतीने त्याने त्यांना स्वत:कडे आकर्षित केले. यहूद्यांनी शमरोनी लोकांना ठोकरले होते, परंतु येशूने त्यांना ईश्वरी अनुग्रहाने आपलेसे केले.MHMar 7.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents