Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १०—परीक्षेमध्ये फसलेल्यांचे सहाय्य

    “जेव्हा आम्ही पापीच होतो.” तो आमच्यासाठी मेला. त्याने आमच्याकडून आमचे गुण-अवगुणांप्रमाणे व्यवहार केला नाही, जरी आमच्या पापाने आम्हांला नाशाला योग्य असे बनविले होते, परंतु तरीही त्याने आम्हांला अपराधी ठरविले नाही. अनेक वर्षांपासून तो आमचा दुर्बळपणा, हट्टीपणा, अज्ञानता आणि दुर्लक्ष व कृतघ्नपणा सहन करीत आहे. आमचा हट्टीपणा, आमच्या हृदयाची कठोरता, उपकार विसरलेले. त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करणे या सर्व गोष्टी आमच्यामध्ये असूनही त्याचे हात आमच्यासाठी पसरलेले आहेत. दया हा परमेश्वराचा गुण आहे. त्याचा वापर तो त्यांच्यासाठी करतो जे त्याचे हकदार नाहीत. आम्ही त्याला शोधले नाही, परंतु तो आम्हास शोधवयास आला. परमेश्वर आपली कृपा दाखविण्यासाठी आनंदी होतो. ते अशासाठी नाही की आम्ही त्यासाठी योग्य आहोत. परंतु तुझ्यासाठी की आम्ही पूर्ण रुपाने दोषी व अयोग्य आहोत. त्याची दया आमच्यासाठी केवळ आमची मोठी गरज आहे.MHMar 113.1

    प्रभु परमेश्वर येशू ख्रिस्ताकरवी पूर्ण दिवस पाप्यांसाठी त्याचे हात पसरलेले असतात. आमंत्रण देत असतात. तो सर्वांचा स्वीकार करील. तो सर्वांचे स्वागत करतो. त्याचा महिमा सर्वात महापाप्याला क्षमा करण्याचा आहे. बलवान हातातून तो शिकार सोडवितो, बंदीवानांना स्वतंत्र करतो, जळणारांना आगीतून सोडवितो. साखळदंडाने बांधलेल्या अभाग्यांना मुक्त करतो. त्यांना वाचविण्यासाठी अगदी खोलवर उतरुन पापामुळे कलंकित झालेल्यांना तो वर काढतो. पापी आत्म्यांना वाचवितो.MHMar 113.2

    सर्व मानव जातीला वाचविण्यासाठी ज्याने आपला प्राण अर्पण केला तो प्रत्येक मानवावर प्रेमळ दृष्टी लावितो. मनुष्याला परत परमेश्वराकडे आण्याचे त्याचे प्रयत्न असतात. अपराधी आणि असहाय्य आत्मे सैतानाच्या जाळ्यामध्ये फसलेले. त्याच्या हल्ल्याने घायाळ झालेले. त्याच्या जाळ्यामध्ये फसून नष्ट होत असलेले त्यांची देखरेख अशाप्रकारे केली जाते तसे एक मेंढपाळ आपल्या मेंढरांची राखण करतो तशा प्रकारे ख्रिस्त सर्व पाप्यांची काळजी वाहतो.MHMar 113.3

    आणि चुका करणाऱ्यांची सेवा करण्यासाठी ख्रिस्ताचा आदर्श आपले उदाहरण असायला हवे. त्याने जो धीर, कोमलता आणि रुची आमच्यामध्ये दाखविली आहे आणि आम्हीही तशाच प्रकारे इतरांमध्ये दाखविला पाहिजे. तो म्हणाला, “जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीति करावी.” (योहान १३:३४). जर ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो तर आम्ही त्याचे नि:स्वार्थी प्रेम जे आमच्या संपर्कात येतात त्यांच्याशी वाढून द्यावे. जेव्हा आपण स्त्री-पुरुषांकडे सहानुभूतिपूर्वक पाहतो तेव्हा आम्ही विचारु शकत नाही की ते त्यासाठी योग्य आहेत किंवा नाही परंतु मी त्यांच्याशी कशाप्रकारे उपयोगी पड़ शकतो ?MHMar 114.1

    श्रीमंत-गरीब, लहान-मोठे, स्वतंत्र-गुलाम हे सर्व परमेश्वराचे वारस आहेत. त्याने आपले जीवन प्रत्येक मनुष्य मौल्यवान आहे. त्यांची संख्या इतकी आहे की मोजदाद करता येणार नाही. वधस्तंभाचे रहस्य आणि त्याच्या महिमाकरवी आपण प्रत्येक आत्म्याचे मोल करायला हवे. जेव्हा आम्ही असे करु तर आम्हाला दिसून येईल की लोक कितीही पापी असोत त्यांची किंमत इतकी अधिक असेल की त्यांचा द्वेष किंवा त्यांच्या विषयी थंडपणा आम्ही दाखवू शकणार नाही किंवा तसा व्यवहार सुद्धा करु शकत नाही. आम्ही आमच्या या बंधूसाठी असे कार्य करावे की त्यांनीही पश्चात्तापी अंत:करणाने परमेश्वराच्या आसनापर्यंत यावे.MHMar 114.2

    मुक्तिदात्याच्या दाखल्यामधील हरवलेले नाणे धुळीत, कचऱ्यात पडले होते तरीही ते चांदीचेच नाणे होते त्याच्या मालकिणीने त्याचा शोध अशासाठी घेतला की ते मौल्यवान होते. म्हणून कोणताही आत्मा पापामध्ये कितीही कलंकित होऊ दे तो परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवानच आहे. ज्याप्रकारे नाण्यावर सरकारचा छाप आणि नाव असते त्याच प्रकारे मनुष्यावर सुद्धा परमेश्वराचा छाप व शिक्षा असतो. प्रत्येक मनुष्यावर त्याचा हक्क आहे. अशा सर्व आत्म्यांना पुन्हा आपल्या हक्कामध्ये घेऊन पवित्रता आणि धार्मिकता यांचा शिक्का मारण्याची त्याची इच्छा आहे.MHMar 114.3