Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३५—परमेश्वराचे सत्य ज्ञान

    “परमेश्वराच्या ज्ञानाकरवी आम्हाला सर्व वस्तु दिल्या आहेत”

    आमच्या मुक्तिदात्यासारखी आम्हाला या जगात परमेश्वराची सेवा करायची आहे. येथे आम्हाला परमेश्वराच्या स्वभावाचे व्हायचे आहे. आणि सेवेच्या जीवनाकरवी आम्हाला परमेश्वराला प्रगट करायचे आहे. परमेश्वराबरोबर त्याचे सहकारी बनून परमेश्वराचा स्वभाव प्रगट करण्यासाठी परमेश्वराला जाणणे आवश्यक आहे. परमेश्वर स्वतःला जसे प्रगट करतो तसेच आम्हीही त्याची ओळख करुन घेणे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे स्वतःला जगाला प्रगट व्हायचे आहे.MHMar 317.1

    परमेश्वराचे ज्ञान हेच खरे शिक्षण आणि सर्व प्रकारच्या सेवेचा आधार आहे. कसोटीपासून सुरक्षित राहण्याचा हाच एख उपाय व कवच आहे. याकरवीच आपण परमेश्वरासमान बनू शकतो.MHMar 317.2

    या सर्व गोष्टी आपले साथीदार यांच्या प्रगतीसाठी कार्य करण्यास योग्य आहे. त्यांच्यासाठी हे ज्ञान प्राप्त करून घेणे अतिआवश्यक आहे. जीवनाची शुद्धी, स्वभाव बदलणे, सेवेमध्ये तत्पर्यता, दक्षता आणि योग्य सिद्धांताची गोडी या सर्व गोष्टी परमेश्वराच्या योग्य ज्ञानावर अवलंबून असतात. हे ज्ञान हे जीवन आणि येणाऱ्या जीवनासाठी योग्य तयारीसाठी उत्तम आहे. आणि परमपवित्र्याला ओळखणे हीच खरी सुज्ञता आहे.” (नीतिसूत्रे ९:१०). परमेश्वराच्या ज्ञानाबाबतीत आम्हाला त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तिस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.” (२ पेत्र १:३) आणि “सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो खरा एकच देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३).MHMar 317.3

    “परमेश्वर म्हणतो, ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये बाळगावयाचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो.’ (यिर्मया ९:२३-२४).MHMar 317.4

    आम्हाला परमेश्वराच्या त्या प्रकाशनाचे अध्ययन करण्याची गरज आहे जे त्याने आम्हाला दिले आहे. “त्याच्याशी सख्य कर आणि शांति जोड अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म तू दूर केलास तर तुझी पुन्हा उभारणी होईल. तू आपले सुवर्ण धुळीत टाक ओफीचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे. म्हणजे सर्वसमर्थ तुला सुवर्ण व राशीच्या राशी रुपे असा होईल. मग सर्व समर्थाच्या ठायी तू आनंद पावशील तू आपले मुख देवासमोर वर करशील तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल. आणि तू आपले नवस फेडशील. तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल त्यामार्गानी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील कारण देव नम्रवृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील.” (ईयोब २२:२१-२९).MHMar 318.1