Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३४—खरे शिक्षण हे एक मिशनरी प्रशिक्षण

    “प्रत्येक खरा ख्रिस्ती हा परमेश्वराचा साथीदार आहे.”

    खरे शिक्षण हे मिशनरी प्रशिक्षण आहे. परमेश्वराने प्रत्येक मुलाला व मुलीला मिशनरी होण्यासाठी पाचारण केले आहे. आम्हांला परमेश्वराची आणि आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे आणि आमच्या शिक्षणाचा उद्देश आम्हांला या सेवेच्या योग्य बनविण्यासाठी आहे. ख्रिस्ती आई-वडील आणि शिक्षकांच्या समोर नेहमी हा उद्देश असणे आवश्यक आहे. आम्हांला ठाऊक नाही की आमची मुले कोणत्या प्रकारचे कार्य करु इच्छितात. ते आपले जीवन घरातील मर्यादेमध्ये घालवू इच्छितात किंवा सामान्य व्यवसायामध्ये ते आपले कार्य करु शकतात किंवा इतर समाजामध्ये देवाची सुवार्ता घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे, परंतु सर्वांना एक समानच परमेश्वराच्या कार्याला सहकार्य करायचे आहे मग ती कोणत्याही स्वरुपाची असो परमेश्वराचे मिशनरी म्हणून परमेश्वराच्या सेवा कार्याचे कार्य करण्यासाठी परमेश्वर प्रेमाने पाचरण करतो.MHMar 306.1

    आपले ताजे वरदान, साहस आणि शिकण्याचा उत्साह व योग्यता बरोबर बालक आणि नवतरुणांवर परमेश्वर प्रीति करतो आणि तो त्यांना स्वर्गीय संस्थेशी ताळमेळ राखण्याची इच्छा व्यक्त करतो. मुलांनी असे शिक्षण प्राप्त करुन घ्यावे की त्यांनी ख्रिस्तीपणाची नि:स्वार्थी सेवा करण्यासाठी परमेश्वराला सहाय्य करण्यासाठी त्याच्याबरोबर उभे राहावे. MHMar 306.2

    आपल्या शिष्यांप्रमाणे शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहण्यासाठी सर्व मुलांना ख्रिस्त म्हणतो, “जसे तुम्हांला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगता पाठविले.’” (योहान १७:१८). त्याचे प्रतिनिधी बना त्याच्या भावना प्रगट करा. त्याचे चारित्र्य दाखवा आणि त्याचे कार्य करा.MHMar 306.3

    आमची मुले जसे जीवनाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. प्रभू सुटका करणाऱ्या लोकांसाठी उभे आहे, परंतु जगीक आहे त्यांना या कार्यापासून दूर लोटीत आहेत. त्यांचे जीवन आशीर्वादीत होईल किंवा शापित हे त्यांच्यावर अवलंबून आहे. शक्तिने पूर्ण भरलेले, आपले सामर्थ्य जाणून घेण्यास तयार त्यांच्या सामर्थ्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळणे आवश्यक आहे. ते वाईट किंवा चांगले यापैकी कोणत्याही एकामध्ये कार्यरत राहतील.MHMar 306.4

    परमेश्वराचे वचन क्रियाशीलतेला दाबून धरीत नाही, परंतु योग्य दिशेने मार्गदर्शन करते. परमेश्वर तरुणांना सांगत नाही की त्यांनी महत्त्वकांक्षी बनू नये. चरित्राची अशी तत्त्वे जी मनुष्याला वास्तविक लोकांमध्ये यशस्वी व सन्मानित बनविते. काही महान गोष्टींसाठी न दबली जाणारी इच्छा वीरताच्या कार्यावर वापरात येणारी इच्छा, मोठे धैर्य इत्यादिना निरुत्तर करु नये. परमेश्वराच्या अनुग्रहाने मुलांचा आदर्श केवळ स्वार्थीपणासाठी उंच करु नये, परंतु स्वर्गीय इच्छेनुसार पृथ्वीपेक्षाही उंच त्यांची इच्छा जागृत करण्यासाठी मार्गदर्शन करावे.MHMar 307.1

    ख्रिस्ती आई-बाप या नात्याने आमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आमचे कर्तव्य आहे. त्यांना ख्रिस्ता समान सेवा करण्यासाठी सावधानी, बुद्धीमत्ता आणि नम्रता व कोमलपणासाठी मार्गदर्शन करावे. आपल्या मुलांना परमेश्वराची सेवा करण्याच्या हेतुने आम्ही एक वचनामध्ये परमेश्वराशी बांधले गेलो आहोत. आपण आपल्या मुलांना अशा प्रभावाखाली तयार करावे की त्यांनी सेवाकार्यामध्ये स्वखुशीने तयार व्हावे. तशा प्रकारे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे.MHMar 307.2

    “कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६). ख्रिस्तानेही तुमच्यावर प्रीति केली आणि आमच्यासाठी स्वत:चे सुगंधीत बलिदान देऊन परमेश्वरासमोर दान दिले. म्हणजे आपणही त्याच्या प्रीतित चालावे. जर आपण त्याच्यावर प्रेम करतो तर आपले दान करावे. “ह्या प्रमाणे मनुष्याचा पुत्र सुवा करुन घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मतय २०:२६). हा धडा आहे आम्हांला शिकायचा आहे व शिकवायचा आहे.MHMar 307.3

    या विचाराने तरुणांनी प्रभावित व्हायला हवे की ते स्वत:चे नाहीत तर ते ख्रिस्ताचे आहेत. कारण ते ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतले आहेत आणि प्रभु त्यांच्यावर प्रेम करतो असा त्याचा दावा आहे. ते अशासाठी जीवंत आहेत की तो स्वत:च्या सामर्थ्याने त्यांचा सांभाळ करतो. मुलांची वेळ त्यांची शक्ति आणि क्षमता परमेश्वराची आहे त्याच्यासाठी आहे त्यांचा विकास त्यांचे शिक्षण हे सर्व परमेश्वरासाठी वापरात आणले जावे.MHMar 307.4

    देवदूतांनंतर परमेश्वराने मानवाला आपल्या प्रतिरुपाचा बनविला आहे. मानव हा परमेश्वराच्या सृष्टीतील सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. परमेश्वराची इच्छा आहे की मानवाने त्याचे लक्ष्य गाठावे जे परमेश्वराने ठरविले आहे आणि परमेश्वराने मानवाला जी शक्ति दिली आहे तिचा वापर मानवाने सर्वोत्तम कार्यासाठी करावा ही परमेश्वराची इच्छा आहे.MHMar 308.1

    जीवन हे रहस्यमय आणि पवित्र आहे. तो स्वतः परमेश्वर आहे जो आमच्या जीवनाचे मूळ आहे. त्याच्या सर्व वेळा अनमोल आहेत आणि मन लाऊन यांचा विकास करायला हवा आणि एकदा वेळ हातातून गेली तर ती परत येणार नाही.MHMar 308.2

    परमेश्वर आपल्यासमोर अनंतकाळच्या वास्तविकतेची गंभीरता ठेऊन आम्हांला नाश न पावणाऱ्या अमरतेला समजून घेण्याची वेळ देतो. तो अति मौल्यवान आणि उन्नत करणारे सत्य आपल्या समोर सादर करतो. म्हणजे आम्ही आमच्या सर्व क्षमता वापरुन आम्ही आपले लक्ष गाठण्याचा कसोशिने प्रयत्न करु कारण हाच शाश्वत व सुरक्षित मार्ग आहे. या मार्गावरुनच आपण धैर्याने, धाडसाने प्रार्थनापुर्वक मार्गक्रम करु शकू. MHMar 308.3

    परमेश्वर त्या छोट्या बिजाला पाहातो ज्याची निर्मिती त्यानेच केली आहे आणि त्या बिजामधून सुंदर झाडे उगवून नयनरम्य फुले उमलतात. एक छोट्या बिजापासून झाड तयार होते त्याला सुंदर फुले-फळे येतात, लता वेली पसरतात. अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक मनुष्यामध्ये त्याच्या अशाप्रकारच्या विकासाची अपेक्षा करतो. आम्ही या जगामध्ये एका खास उद्देशासाठी आहे. परमेश्वराने आमच्या जीवनासाठी त्याची योजना दिली आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही आमचा विकास सर्वांपेक्षा उंच करावा. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही पावित्र्यात शुद्धतेमध्ये आणि उपयोगितामध्ये सतत वाढत जावे. सर्वांकडे योग्यता आहे. ज्या विषयी त्यांना शिकविणे आवश्यक आहे की या योग्यतेचा वापर पावित्र्यामध्ये परमेश्वरा करवी परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक तरुणाने आपल्या दानाचा वापर करुन त्यामध्ये प्रगती करावी. प्रत्येक योग्यतेचा त्यांनी सक्रिय सराव करावा. आपल्या जीवनामध्ये उपयोगी आणि बहुमोल आहे त्याचा आनंद घ्यावा. येणाऱ्या जीवनामध्ये जो स्वर्गीय खजिना आहे त्यामध्ये आपला चांगूलपणा जमा करीत जावे अशी देवाची इच्छा आहे.MHMar 308.4

    त्यांची महत्त्वाकांक्षा अशी असावी की त्यांनी सर्व निःस्वार्थपणाची उंची गाठावी. त्यांनी एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे. ख्रिस्ताने आपल्या जीवनाचे उदाहरण जगाला दाखविले त्याप्रमाणे ख्रिस्ती युवकांनी आपले जीवन एक आदर्श, नि:स्वार्थी आणि प्रीतियुक्त जीवन इतरांना दाखवावे. यामुळे अशाप्रकारे तुमचा प्रकाश इतरांनी पहावा व त्यांनी आपले अनुकरण करावे. ख्रिस्ताने त्याच्या जीवनात पवित्र महत्त्वकांक्षा बाळगली हेच आपण ओळखायचे आहे आणि या महत्त्वकांक्षेमध्ये राहिल्यास जग चांगले बनते. हेच ते कार्य आहे. असे करण्यासाठी त्याला जगामध्ये पाठविण्यात आले आहे. म्हणून आपण ख्रिस्ताचे अनुकरण करायचे आहे.MHMar 309.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents