Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परिवर्तन आणणारे ज्ञान

    परमेश्वराचे ज्ञान जे ख्रिस्तामध्ये प्रगट करण्यात आले. तेच ज्ञान आहे जे उद्धार पावणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. हे असे ज्ञान आहे ज्याने स्वभाव बदलला जातो. हे ज्ञान तुम्ही मिळवा, ते आपल्या आत्म्याला परमेश्वरा समान बनविल.MHMar 329.3

    “परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभुच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो. आणि जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रुपांतर होत असता आपण त्याच्याशी समरुप होत आहो’ (२ करिथ ३:१८).MHMar 329.4

    आपल्या जीवना बाबतीत उद्धारकर्त्याने म्हटले आहे, “जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञापाळून त्याच्या प्रीतित राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तर माझ्या प्रीतित राहाल” (योहान १५:१०).MHMar 329.5

    “ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे त्याने मला एकटे सोडले नाही कारण त्याला जे आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ९:२९). ज्याप्रकारे ख्रिस्त मानव स्वभावामध्ये होता. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या मागे जाणारे ही त्याच्यासारखे होवो. परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये राहून आम्हीही त्याच्यासारखेच जीवन व्यतीत करु ज्या प्रकारे उद्धारकर्ता जगत होता. पौल म्हणतो, मी या कारणासाठीच पित्यासमोर गुडघे टेकतो ज्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर प्रत्येक घराण्याचे नाव ठेवले जाते की तो आपल्या महिमाच्या धनानुसार तुम्हाला हे दान देण्यात येईल की त्याच्या आत्म्या करवी तुम्ही तुमच्या आतील मनुष्याने सामर्थ्य मिळवून बळकट व्हाल आणि विश्वासाकरवी ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये वसती करील आणि त्या प्रेमाखातर तुम्ही मनुष्यांना त्याच्या प्रेमाची खात्री करुन द्याल. परमेश्वराचे ज्ञान मानवाला त्याच्या पापापासून मुक्त करतो तेच ज्ञान सैतान मानवापर्यंत पोहोचू नये याची सतत योजना करीत असतो.MHMar 329.6