Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    एक विस्तीर्ण जीवन

    इतरांची सेवा करणे याशिवाय आत्मसमर्पणाचा उत्साह यासारख्या गुणस्वभाचा विकास करण्यास इतर कोणताच मार्ग नाही. अनेक नामधारी ख्रिस्तीमंडळ्या केवळ स्वतः विषयीच विचार करतात. ते चर्चमध्ये भाग घेणे आणि पाळकाची काळजी घेण्यामध्येच आनंद मानतात. ते मोठ्या आणि श्रीमंत मंडळीचे सभासद बनतात आणि इतरांसाठी अति अल्प सहाय्य करतात. त्यामध्ये ते संतुष्ट होतात. अशाप्रकारे ते स्वतः परमेश्वराच्या आशीर्वादाला मुकतात. तसेच अनेक लोक स्वत:च्या आनंदाचा त्याग करुन, विश्रांतीचा आनंद न घेता समाजसेवेचे कार्य करतात. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्यांना जेथे जायचे असेल तेथे स्वखुशीने जातात. कारण ख्रिस्ती कार्यामध्ये त्यांची शक्ति खर्च करुन आपले प्रतिनिधित्व ते पूर्णपणे पार पाडतात.MHMar 103.1

    जी झाडे एकमेकांजवळ किंवा जवळ जवळ लावलेली असतात त्यांचा योग्य विकास होत नाही. एक माळी आपली बाग अशा ठिकाणी लावतो की झाडांचा योग विकास होईल. अशाच प्रकारचे कार्य मोठ्या मंडळीतील सभासदांसाठी लाभदायक होईल. त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की तेथे त्यांच्या ख्रिस्तीगुणांचा उपयोग होईल. कारण आत्म समर्पणा बरोबरच इतरांची सेवा न केल्यामुळे त्यांचे आत्मिक जीवन हरवत चालले आहे. आत्मिक दृष्ट्या ते ठेंगणे आणि दुर्बल होत आहेत. एखाद्या मिशनी कार्यामध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतल्यास ते शक्तिशाली आणि उत्साही बनतील... MHMar 103.2

    इतरांचे सहाय्य करण्यास सुरुवात करण्याआधी एखाद्याला दूरस्थळी बोलविण्यासाठी त्याची वाट पाहण्याची गरज नाही. सेवेसाठी सर्वत्र ठिकाणे उघडण्यात आली आहेत. आपल्या चारीबाजूला असे लोक आहेत त्यांना सहाय्याची गरज आहे. विधवा, अनाथ, आजारी, निराश, अशक्त, गरीब आणि कुटंबातून त्याग केलेले असे सर्व प्रकारचे लोक सर्वत्र आहेत.MHMar 103.3

    जे आपल्या शेजारी राहतात त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी आपले विशेष कर्तव्य आहे असे समजावे व त्याची जाणीव राहावी. जे लोक धार्मिक गोष्टीमध्ये आवड धरीत नाहीत त्यांच्यासाठी कशाप्रकारे सहाय्य करावे या विषयी अभ्यास करा. जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्या भल्याबरोबरच त्यांच्या आत्मिक कल्याणासाठी रस दाखवा. त्यांना त्या ख्रिस्ताविषयी सांगा जो पापांचा क्षमा करुन तारण प्राप्ती करुन देतो. आपल्या शेजाऱ्यांना आपल्या घरी निमंत्रण द्या आणि त्यांना पवित्र शास्त्रातील मौल्यवान गोष्टी सांगा. ख्रिस्ताच्या सत्य वचनाविषयी सांगा. आपल्याबरोबर त्यांना परमेश्वराची स्तुतीभक्ति व बायबल अभ्यासासाठी आमंत्रण द्या. त्यांच्याबरोबर प्रार्थना करा. या छोट्याशा सभेमध्ये ख्रिस्त स्वतः उपस्थित राहील व त्यांची हृदये उघडून त्याच्या सत्य वचनाचा स्पर्श करील.MHMar 104.1

    अशा प्रकारची कार्ये करण्यासाठी मंडळीतील सभासदांनी स्वत:ला सुशिक्षित करणे आवश्यक आहे. हे कार्य त्याचप्रकारे महत्त्वाचे आहे ज्या प्रकारे इतर देशांमध्ये रातआंधळेपणाने लोक पीडिलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेकांचे आत्मे अंध झाले आहेत. त्यांना सत्याचा मार्ग दाखविणे हे मंडळीच्या सभासदांचे काम आहे. आपल्या शेजाऱ्यांना सहाय्य करण्याची तत्परता दाखविणे अति आवश्यक आहे.MHMar 104.2

    बहुतेक लोक एकाकी जीवन जगतात. त्यांनी आपले जीवन विस्तृतपणे जगण्याचे ठरविले तर त्यातील आनंद त्यांना कळून येईल. ज्यांनी आपले तनमन ख्रिस्ताला दिले आहे ते आपल्या शेजाऱ्यांशी प्रेमाने व सन्मानाने वागतील त्यांना ख्रिस्ताची प्रीति काय आहे हे दाखविण्यासाठी व त्याच्या प्रीतिचा प्रभाव पाडण्यासाठी फार मोठे क्षेत्र आहे.MHMar 104.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents