Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    एखाद्याची चूक दाखविणे :

    एखाद्याच्या चुकीवर बोट दाखविणे हे नेहमी अपमान जनक आहे. अनावश्यकपणे त्यांची निंदा करुन त्यांच्या अनुभवात अधिक कडवट बनवू नये. एखाद्याला नवे ठेऊन त्यांचे उणेपण दाखवून अपमान करण्याने कोणाचेही चांगले होत नाही. किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही, परंतु अशाप्रकारे लोकांनी आपले दोष न स्वीकारता त्यावर कठोर विरोधच केला, परंतु कोमल व सौम्य वर्तणुकीने त्यांचे दोष झाकता येतात. त्यांची पापे सुधारुन त्यांची क्षमा करता येते. प्रेषित पौलाने चुक केलेल्याला रागावणे योग्य समजतो, परंतु किती सावधपणे चुका दाखविणे आवश्यक आहे हेही समजणे आवश्यक आहे. कारण चुका करणारे आपले बंधु असतात. किती उत्सुकतेने त्याने आपले मत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना समजाविले की त्यांना दुःख देऊन तो स्वत:ही दुःखी होता. त्याने त्यांना समजाविले की त्यांना दुःख देऊन तो स्वत:ही दुःखी होता. त्याने त्या लोकांवर विश्वास ठेवला. कारण तो विजयी होण्यासाठी संघर्ष करीत होते. MHMar 118.4

    “मी फार संकटात मनस्तापात असताना अश्रु गाळीत तुम्हास लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे तर तुम्हांवर माझी जी विशेष प्रीति आहे ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.” (२ करिथ २:४). मी आपल्या पत्राने तुम्हांला दुःख या बद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते कारण त्या पत्रापासून तुम्हाला काहीवेळ तरी दुःख झाले असे मला दिसते. तरी आता मी आनंदात आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे कारण देवानुसार तुमचे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ...... प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा तुमचे हे दुःख दैवी होते. ह्याच एका गोष्टीने तुम्हांमध्ये केवढी कळकळ, केवढे दुःख निवारण, दोष निवारण, केवढे संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली ह्याबाबतीत तुम्ही सर्व सर्व प्रकारे निर्दोष आहा. ह्याचे प्रमाणे तुम्ही पटवून दिले. ह्यामुळे आमचे सान्तवन झाले आहे. (२ करिंथ ७:८-११,१३).MHMar 118.5

    “मला सर्व बाबतीत तुमचा भरवसा वाटतो म्हणून मी आनंद करितो.” (२ करिथ ७:१६).MHMar 119.1

    “मला तुमची जी आठवण आहे तिच्यावरुन मी आपल्या देवाचे आभार मानितो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करितो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करितो.” (फिलिपैकरास १:३-५). “ज्याने तुमच्या ठायी काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. हा मला भरवसा आहे. आणि तुम्हां सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबधिच्या प्रत्युतरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी माझ्या अंत:करणात तुम्हाला बाळगून आहे.” (फिलिपैकरास १:६-७).” म्हणून प्रियजनहो, ज्या तुम्हांकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधुनो तुम्ही प्रभुमध्ये तसेच स्थिर राहा.’ (फिलिपै ४:१). “कारण जर तुम्ही प्रभुमध्ये ..... असला तर आता आमच्या जिवात जीव असल्यासारखे होईल.” (१ थस्सलनी ३:८). MHMar 119.2

    या बांधवांना पौल लिहिताना “ख्रिस्तामध्ये संत’ असे लिहीतो, परंतु तो त्यांना ज्यांचे चारित्र्य कलंकित आहे त्यांना लिहीत नव्हता तर जे पाप आणि मोहाविरुद्ध संघर्ष करीत होता त्यांना लिहीत होता. त्यांना निर्देश करुन तो लिहीत होता. “आता ज्या शांतीच्या देवाने सार्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याला मेलेल्यातून परत आणिले तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.” (इब्री १३:२०-२१).MHMar 119.3

    चुका करणारा जर आपली चूक कबूल करतो तर सावध राहा नाहीतर असे होऊ नये की तुम्ही त्याच्या आत्मसन्मानाला दुखवाल. उपेक्षा आणि अविश्वासाकरवी त्याला निराश करु नका. असं करु नका. “त्याच्यावर भरवसा करण्या अगोदर मी पाहिन की तो भरवशाच्या लायकीचा आहे किंवा नाही.’ असे मुळीच करु नका. त्याच्यावरील अविश्वासाची चूक करु नका. त्याच्या मार्गावरील तो धोंडा होईल. त्याच्या सुधारणेमध्ये अडथळा होईल. इतरांच्या दुर्बळपणा आपण समजून घेतला पाहिजे. ज्यांची हृदये त्रासलेली आणि गडद अंधारामध्ये असतात, परंतु ती आपणास समजत नाही. यामध्ये संकल्प आणि नैतिक शक्ति कमी असते. त्याची अवस्था अति दयनीय असते. पश्चातापाने तो पीडित व दुःखी राहतो. धुळीत मिसळण्यासारखी त्याची अवस्था असते. त्याला स्पष्टपणे काहीच दिसू शकत नाही. त्याच्या बुद्धीवर पापाचा व पश्चातापाचा पडदा आलेला असतो. अशावेळी त्याला समजत नाही कोणत्या बाजूला पाऊल टाकावे. अशा अवस्थेमध्ये अनेक आत्म्यांविषयी चुकीची समजूत झालेली असते. भरकटलेल्या मेंढराप्रमाणे त्यांची अवस्था झालेली असते. त्याच्या मनाला शांती नसते. परमेश्वरापासून तो दूर गेलेला असतो. अशाच अवस्थेत त्याला कमी लेखण्याची चुक होते.MHMar 120.1

    चला तर आपण अशी कोणतीच गोष्ट बोलू नये की त्यांना खोल दुःख होईल. तो तर जर पापाच्या ओझ्याने वाकलेला जीव असेल तर त्यालाही ठाऊक नसते यातून कोठे सुटका मिळेल. तेव्हा त्याच्यासमोर दया करणाऱ्या उद्धारकाला ठेवा. त्याचा हात धरुन धाडस आणि आशा देऊन त्याला उठवा, आधार द्या. मुक्तिदात्याचा हात धरण्यास त्याला सहाय्य करा.MHMar 120.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents