Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परमेश्वर उपाय करील

    अनेक लोक स्वत:ला ख्रिस्ताचे अनुयायी समजतात. त्यांच्या हृदयात समस्या आणि चिंता असतात. कारण स्वत:ची काळजी घेण्यासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास घाबरतात. ते स्वत:ला परमेश्वरासमोर पूर्णपणे समर्पित होत नाहीत. कारण यामुळे काय परिणाम होईल या विषयी ते घाबरतात. त्या विषयी ते कल्पनाच करु शकत नाहीत. जोपर्यंत ते परमेश्वराला पूर्णपणे समर्पण होत नाहीत तोपर्यंत त्यांना शांति प्राप्त होणार नाही.MHMar 380.1

    तसेच अनेक जण असेही आहेत की त्यांची हृदये चिंता काळजी यांनी भरलेली असतात. कारण त्यांचे विचार जगासमान असतात. जगाची सेवा करण्याचे त्यांनी निवडीले असते. जगाच्या समस्या त्यांनी स्वीकारल्या असतात आणि जगाच्या रीतिरिवाजाचा अंगीकार त्यांनी केलेला असतो. म्हणून त्यांचे जीवन कलंकित आणि जीवनमध्ये उत्साह राहिला नाही. आमच्या प्रभूची इच्छा आहे की त्यांनी आपल्या गुलामगिरीची सर्व बंधने तोडून टाकावित. तो त्यांना आपले जू उचलण्यासाठी पाचारण करीत आहे. तो म्हणतो, “कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:३०). चिंता अंध असते आणि ती भविष्य समजू शकत नाही. परंतु येशू भूतभविष्य सर्व काही समजतो. प्रत्येक कठिण मार्गावर तो सरळ व सुलभपणा करण्याची तरतुद करतो. “कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो, जे सात्विकपणे चालतात. त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.” (स्तोत्र ८४:११).MHMar 380.2

    आमच्या गरजा पुरविण्यासाठी परमेश्वराजवळ हजार मार्ग आहेत. त्याविषयी आपणास काहीच ठाऊक नसते. जे लोक सर्वस्वी परमेश्वराची सेवा सर्वस्वी आपला सिद्धांत मानतात ते आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याचे आणि मार्ग सरळ त्यांना दिसून येते.MHMar 380.3

    आजचे कार्य इमानदारीने पूर्ण करण्यानेच उद्या निर्माण होणाऱ्या कसोटीची सर्वोत्तम तयारी आहे. उद्या येणाऱ्या चिंता आणि जबाबदाऱ्यासाठी आजचMHMar 380.4

    ओझे वाढवू नका. “ह्यास्तव उद्याची चिंता करु नका आजचे दुःख आजसाठी पुरे.” (मतय ६:३४).MHMar 380.5

    चला तर आपण साहसी आणि आशावादी बनू या परमेश्वरच्या सेवेमध्ये निराशा आणि द:ख हे पापमय आणि निष्फळपणा आहे कारण परमेश्वराला आपल्या गरजा ठाऊक आहेत. राजांचा राजा आमचा सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या वचनाचे पालन करतो. तो दयाळू आहे. मेंढपाळासारखी तो त्याच्या मेंढरांची काळजी घेतो. असे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. त्याची शक्ति अफाट आहे आण जे सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचे अभिवचन पूर्ण होण्याची पूर्ण खात्री असते. त्याच्याकडे सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्याची उत्तरे असतात. म्हणजे जे लोक त्याची सेवा करतात त्याच्या करवी ठरविलेल्या साधनांचा ते सन्मान करतात. त्यांच्यावरील त्याचे प्रेम स्वर्गापेक्षाही उंच असते. तो आपल्या बालकांची अतिप्रेमाने काळजी वाहतो.MHMar 380.6

    अंधकाराने भरलेल्या दिवसामध्ये जेव्हा दर्शन होणे कठीण होते तेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवा तो आपल्या लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे भले करण्यासाठी सदैव तयार असतो. जे त्याची सेवा करतात त्याच्यावर प्रेम करतात त्यांची शक्ति दिवसे न् दिवस वाढत जाते. नवी ....... परमेश्वर आपल्या दासांना सर्व प्रकारचे आवश्यक सहाय्य करण्यासाठी सदैव उत्सुक असतो. परमेश्वर त्यांना ती बुद्धी देईल जी त्यांची आवश्यकता पूरी करण्यासाठी सहाय्यकारी ठरेल.MHMar 381.1

    अनुभवी प्रेषिताने म्हटले आहे, “परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरे आहे कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करुन आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवित ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.” (२ करिथ १२:९-१०).MHMar 381.2

    *****