Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    “मी निरंतर तुझी स्तुति करीन”

    कफर्णहूममधील स्त्री तिच्या विश्वासाने येशूच्या वस्त्राला स्पर्श करुन ती बरी झाली होती. येशूची इच्छा आहे की ज्यांना त्याचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत त्यांनी ते जाहीरपणे कबूल करावेत. सुवार्तमुळे जी देणगी आपणास मिळते ती गुप्तपणे घ्यायची नसते किंवा एकांतात तिचा आनंद घ्यायचा नसतो तर, “म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो.” (यशया ४३:१२).MHMar 59.3

    परमेश्वराचा विश्वास योग्यतेचा स्वीकार करणे स्वर्गामधून स्थापन केलेले ते साधन आहे. या माध्यमातून ख्रिस्ताला जगामध्ये प्रगट केले जाते. जुन्या काळामध्ये त्या काळाच्या पवित्र लोकांवर देवाने केलेल्या कृपेचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. एवढेच नाही तर आमच्या जीवनाच्या अनुभवाची वैयक्तिक साक्षच यापेक्षा अधिक प्रभावी होऊ शकतात. जेव्हा आमच्या स्वत:च्या जीवनामध्ये स्वर्गीय शक्तिचा प्रभाव दिसून येतो तेव्हा आपण परमेश्वराचे साक्षी बनतो. प्रत्येक व्यक्तिचे जीवन इतरांपेक्षा वेगळे असते आणि प्रत्येकाला येणारा अनुभव वेगळा असतो. परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या व्यक्तिगत स्वभावाबरोबर आम्ही केलेली त्याची स्तुति त्याच्या आसनापर्यंत पोहोचावी. ख्रिस्तासारखे आचरण करणारे जीवनात त्याच्या सामर्थ्याने त्याच्या कृपेची केलेली स्तुति त्याच्या स्वीकृतिचे सामर्थ्य आहे. आणि याचा नकार केला जाऊ शकत नाही आणि परिणामी अशा आत्म्यांचा उद्धार होतो.MHMar 59.4

    परमेश्वराकडून प्राप्त झालेली प्रत्येक देणगी आमच्या हृदयात ताजी करीत राहिल्यास यामध्ये आपला लाभ होतो. असे केल्याने आणखी आशीर्वादाची मागणी केल्यास तो मिळतो आणि त्याद्वारे त्याच्यावरील आपला विश्वास अधिक दृढ होतो. आमच्या जीवनामध्ये एक छोटा आशीर्वाद मिळविण्यासाठी आम्हांला इतके अधिक प्रोत्साहन मिळते की जितके इतरांमध्ये विश्वास आणि अनुभव वाचून मिळू शकत नाही. परमेश्वराच्या कृपेचे प्रति उत्तर देणारा आत्मा एक पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. त्याचा प्रकाश अंधारात चमकतो आणि त्यावर ख्रिस्ताचा महिमा दिसून येतो.MHMar 60.1

    “परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ? मी तारणाचा याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीत परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.” (स्तोत्र ११६:१२-१४)MHMar 60.2

    “माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगाण गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.” (स्तोत्र १०४:३-३४)MHMar 60.3

    “परमेश्वराचे पराक्रम कोणी करु शकेल ? त्याची सर्व स्तुति कोण ऐकविल? (स्तोत्र १०६:२).MHMar 60.4

    “परमेश्वराचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. त्याचे गुणगान करा त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्योच वर्णन करा.” (स्तोत्र १०५:१-२).MHMar 60.5

    “तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन, तुझ्या नावाने मी माझे हात उभारीन मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरीत होऊन तुझे स्तवन करील. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस. म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन.” (स्तोत्र ६३:३-७).MHMar 61.1

    “देवावर मी भरवसा ठेविला आहे मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार ? हे देवा तुझ्या नवसाचे ऋण माझ्यावर आहे. मी तुला आभार रुपी अर्पणे वाहीन कारण तू माझा जीव मरणापासून रक्षिला आहे. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाही काय ?’ (स्तोत्र ५६:११-१३). MHMar 61.2

    “मी तर सतारीवर तुझी स्तुति स्तोत्रे गाईन, हे माझ्या देवा मी तुझ्या ... त्याचे स्तवन करीन. हे इस्राएलाच्या पवित प्रभू मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझे स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील. माझी जी भक्ति दिवसभर तुझी न्याय परायणता गुणगुणत राहील. कारण माझे वाईट करु पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत. कारण हे प्रभू परमेश्वरा तूच माझे आशास्थान आहेस, माझ्या तारुण्यापासून माझे श्रध्दास्थान आहेस.” (स्तोत्र ७१:२२-२४,५). MHMar 61.3

    “तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यान पिढ्या राहील असे मी करीन म्हणजे लोक तुझे युगानुयुग स्मरण करितील.” (स्तोत्र ४५:१७).MHMar 61.4