Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पाप कबुली :

    जे लोक स्वत:ला रोगमुक्त करु पाहतात त्यांनी स्पष्टपणे समजून घ्यावे की देवाच्या नैसर्गिक किंवा आत्मिक नियमांचा भंग करु नये कारण तसे करणे पाप आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर पापांची कबूली करुन ते सोडून द्यावे.MHMar 175.1

    पवित्र शास्त्र आपणास सांगते, “तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.” (याकोब ५:१६). जे प्रार्थनेसाठी निवेदन करतात त्यांच्यासमोर हा प्रश्न ठेवावा. “आम्ही तुमचे हृदय वाचू शकत नाही किंवा आपल्या जीवनाती गुप्त भे जाणू शकत नाही. ते केवळ तुम्हीच जाणता किंवा परमेश्वर जाणतो. जर तुम्ही आपल्या पापांविषयी पश्चात्ताप करता तर ते आपले कर्तव्य आहे की तुम्ही आपली पापे कबूल करा.’ वैयक्तिक व पापांची कबूली केवळ ख्रिस्तासमोरच करावयाची असतात. कारण तोच केवळ मनुष्य आणि परमेश्वरामधील एकाच मध्यस्थ आहे.”.... जर कोणी पाप केले तर नीति संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. (योहान २:१). प्रत्येक पाप परमेश्वराविरुद्ध अपराध आहे, आणि ख्रिस्त येशूच्या माध्यमात पापाची कबूली देणे आवश्यक आहे. सर्वांसमोर केलेले पाप सर्वांसमोर स्वीकारणे आवश्यक आहे. आपण केलेल्या पापामुळे ज्याचे नुकसान झाले आहे त्याच्यासमोर कबूली द्यावी. जो आजारी आहे ज्याला बरे व्हायचे आहे त्याने ज्याच्याविरुद्ध वाईट बोलून पाप केले आहे. घरामध्ये, शेजारी आणि मंडळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असेल, एकमेकांमध्ये भेदभाव पसरविला आहे. त्याने जर आपल्या चुकीच्या सवयीमुळे इतरांना पापामध्ये फसविले आहे. तेव्हा या गोष्टींमध्ये परमेश्वराबरोबर त्या लोकांसमोर ही कबूली दिली पाहिजे. “जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (१ योहान १:९).MHMar 175.2

    जेव्हा आपण चुकीची सुधारणा केली आहे तेव्हा आपल्या आजारपणा विषयी गरजेच्या आत्म्याच्या मागणीनुसार व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रभूसमोर विश्वासाने आपल्या मागण्या प्रस्तुत करु शकतो. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने ओळखतो आणि त्याची अशा प्रकारे काळजी घेतो की त्याच्याशिवाय पृथ्वीवर कोणी मनुष्यच नाही. जसे काय त्या एकट्यासाठीच देवाने आपला एकूलता एक पुत्र दिला आहे. कारण परमेश्वर इतका महान व प्रेमळ आहे यासाठी आजारी व्यक्तिने प्रसन्न राहावे म्हणून परमेश्वराने त्याला विश्वासदेज केला. जर त्याच्यामधील दुःख व निराशा नाहीशी झाली तर तो लवकर बरा होईल. कारण “पाहा जे परमेश्वराचे भय धरितात त्याच्या दयेची अपेक्षा करितात. (स्तोत्र ३३:१८).MHMar 175.3

    रुग्णासाठी प्रार्थना करतांना आपण लक्षात ठेवले पाहिजे की.... “कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मास्वतः अनिर्वाच्य कष्टण्याने मध्यस्थी करितो” (रोम ८:२६). आम्हाला ठाऊक नाही की ज्या आशीर्वादाची इच्छा आम्ही करतो तो रुग्णासाठी सर्वात चांगला असेल किंवा नाही. म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये असे विचार हवेत की “हे प्रभू तू प्रत्येक व्यक्तिची गुप्त गोष्ट जाणतोस. या लोकांविषयी तुला सर्वकाही ठाऊक आहे. त्यांच्यासाठी येशूने आपले जीवन अर्पण केले आहे. येशूचे त्यांच्यावरील प्रेम आमच्यापेक्षा अधिक आहे. अधिक महान आहे म्हणून तुझी स्तुती आणि या आजारी व्यक्तिच्या हिताची असावी. आम्ही प्रार्थना करतो ती येशूच्या नावाने करतो. रुग्णाला पूर्ण आरोग्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना असते आणि त्याने बर होऊ नये असे तुला वाटत असेल तर आम्ही विश्रांती करतो की तुझा अनुग्रह त्याला समाधान देवो आणि तुझी उपस्थिती त्यांचे दुःख हलके करो.MHMar 176.1

    परमेश्वर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही जागतो. तो सर्व माणसांच्या मनातील गोष्टी जाणतो मनुष्याच्या सर्व गुप्त गोष्टी त्याला ठाऊक आहेत. ज्या रुग्णासाठी प्रार्थना करण्यात येत आहे आणि त्याला जिवंत राहायचे असेल तर तो जीवनाच्या परीक्षाला तोंड देऊ शकेल काय ? त्याला ठाऊक आहे की त्यांचे जीवन त्यांच्यासाठी जगासाठी आशीर्वादाचे कारण होईल व नंतर शाप हेच कारण आहे की जेव्हा आपण रुग्णासाठी प्रार्थना करतो की त्याने बरे व्हावे तरीही आम्ही प्रार्थनाक करावी की “आमच्या इच्छेने नाहीतर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (लूकर २२:४२). गेथसेमेनी बागेमध्ये येशूने सुद्धा अशीच प्रार्थना केली होती. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणा स्वत:ला समर्पित करतांना येशू म्हणाला होता की “हे पित्या तुझी इच्छा असेल तर हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९). परमेश्वराचा पुत्र असून ही हे शब्द जर त्याच्या मुखातून आले हे उचित असेल तर आपण जगातील पापीमानव असून आपल्या मुखात किती उचित असतील?MHMar 176.2

    आम्ही नेहमी जो आमच्या इच्छा जाणणाऱ्या आणि बुद्धीमान परमेश्वराला आमच्या इच्छा सादर करतांना पूर्ण विश्वासाने सर्व काही त्याच्या वस सोपवून देण्याची सवय ठेवावी. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही परमेश्वराच्या इच्छेने आम्ही त्याला जे काय मागू ते तो आम्हाला देतो, आमचे तो ऐकतो. परंतु समर्पणाशिवाय आपण देवाला जबरदस्तीने काही मागू शकत नाही. आमच्या प्रार्थना विनंत्याच असावण्यात आदेश नाही.MHMar 177.1

    बऱ्याच रुग्णांसाठी परमेश्वर खात्रीने आपली स्वर्गीय शक्ति वापरतो त्यांना आरोग्यदान प्रदान करतो. परंतु सर्वच रुग्ण बरे होत नाहीत. बरेच रुग्ण असे असतात की त्यांना ख्रिस्तात झोपी जाऊ दिले जाते. पात्मस बेटावर योहानाला असे लिहिण्यास सांगितले. “प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.” (प्रकटी १४:१३). यावरुन आपण पाहातो की जर कोणी मनुष्य बरा होत नसेल तर आम्ही असा विचार करु नये की रुग्ण किंवा त्याच्यासाठी प्रार्थना करणारांचा विश्वास कमी पडला आहे.MHMar 177.2

    आम्ही सर्वांची इच्छा असते की आमच्या प्रार्थनेच उत्तर आमच्या इच्छेने मिळावे आणि जर आमच्या प्रार्थनेचे उत्तर उशीराने मिळाले किंवा आमच्या इच्छे विरुद्ध मिळाले तर आम्ही निराश होऊ लागतो. परंतु आमचा परमेश्वर आमच्या प्रार्थनांची उतर आमच्या इच्छेप्रमाणे वेळेनुसार देण्यासाठी अति बुद्धीवान आणि दयाळू असा आहे. आमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याऐवजी आमच्यासाठी तो सर्व काही पूर्ण करील. कारण आम्ही त्याची बुद्धी आणि प्रीतिवर विश्वास ठेवतो तेव्हा नेहमीच आमच्या इच्छ पूर्ण कराव्यात म्हणून प्रार्थना करु नये परंतु त्याचे उद्देश आणि त्याच्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी विनंती करावी. आमची रुची आणि आमच्या इच्छा त्याच्या इच्छेनुसार असाव्यात जे अनुभव आम्ही पाहातो. आमची विश्वासाची जी कसोटी होते ती आमच्याच भल्यासाठी असते. या करवीच असे प्रगट होते की आमचा विश्वास खरा आणि निष्कपट आहे. केवळ परमेश्वराच्या इच्छेवर आधारीत किंवा परिस्थितीवर आधारीत आहे. अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार आपला विश्वास दृढ होतो. आपण आपल्या धैर्याला कार्य करु द्यावे. यासाठी हे लक्षात ठेवावे की आपण केलेल्या विनंतीनुसार धीर धरुन उतराची वाट पाहावी. हा सिद्धांथ सर्वच लोक समजू शकत नाहीत. अनेक लोक असे आहेत की परमेश्वराने देऊ केलेले दयापूर्ण आरोग्य रुग्णाला त्यांच्या प्रार्थनानुसार लगेचा मिळावे आणि जर तसे घडले नाही तर त्यांना वाटते की आपल्या विश्वासामध्ये कमतरता आहे. यामुळे जे लोक आजारामुळे कमजोर झालेले असतात त्यांना सावधगिरीचा सल्ला देणे आवश्यक आहे आहे. यामुळे ते समजूतदारपणे आपले कार्य करतील. त्यांना आपल्या लोकांच्या त्यांच्यासाठी केलेल्या सेवेकडे दुर्लक्ष करु नये व त्यांना सहकार्य करावे त्यांनी नैसर्गिक उपचार करण्यामध्ये निष्काळजीपणा करु नये.MHMar 177.3

    सहसाया ठिकाणी चुक होण्याचे धोके असतात ते विश्वास ठेवतात की केवळ प्रार्थनेनेच रुग्ण बरा होईल. यामुळे इतर काही करण्यात आपला विश्वास कमी होईल अशी त्यांना भीती वाटते. परंतु त्यांनी हे लक्षामध्ये ठेवावे की मृत्युने जर त्यांना वेगळे केले तर ते करीत असलेले कार्य अर्धेच राहील हे कार्य पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करु नये. जगाचा निरोप घेतांना आपल्या प्रियजनांशी आशा आणि प्रोत्साहीत शब्द बोलतांना त्यांनी भयभीत होऊ नये.MHMar 178.1

    प्रार्थनेद्वारे जे लोक बरे होऊ पाहतात त्यांनी जी औषधे त्यांच्यासाठी उपलब्ध असतात त्यांनी त्याचा वापर करण्यास निष्काळजीपणा करु नये. अशी औषधे वापरल्यास तुमचा विश्वास कमकुवत होत नाही. कारणे ही औषधे परमेश्वराने रुग्णाला बरे वाटणे आणि दु:ख कमी करण्यासाठी दिली आहेत. परमेश्वराशी सहकार्य करुन सर्व परिस्थिती अनुकूल केल्यास पूर्ण आरोग्य प्राप्त होऊ शकते. हा विश्वास नाकारु नये. परमेश्वराने आम्हाला जीवनाचे नियम शिकण्याची बुद्धी दिली आहे हे ज्ञान आपण आत्मसात करण्याची शक्ति आत्मसात करु शकतो. आपल्याला आरोग्य दान मिळण्यासाठी निसर्गातील सुविधांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निसर्ग नियमांचा ताळमेळ ठेवणेही आवश्यक आहे. म्हणजे सर्व सुविधांचा योग्य वापर करणे. असे केल्यास रुग्ण बरे होऊ शकतात आणि मग परमेश्वराचा धन्यवाद करावा कारण परमेश्वराने प्राप्त करुन दिलेले निसर्ग नियम, आरोग्याचे नियम आणि निसर्गोपचार या सर्व सुविधा त्याने प्राप्त करुन दिल्या आहेत.MHMar 178.2

    परमेश्वराचे वचन आपणास उपचाराच्या साधनांचा वापर करण्यासाठी परवानगी देते. इस्राएलचा राजा हिकिया आजारी होता आणि परमेश्वराच्या एका संदेष्ट्याने संदेश दिला की तो मरेल. त्याने परमेश्वराला विनंती केली आणि प्रभूने आपल्या दासाची विनंती ऐकली आणि संदेश दिली की त्याच्या जीवनाची पंधरावर्षे वाढविण्यात आली आहेत. आता केवळ एकवचनाने हिन्कियाराजा राजा बरा झाला. परंतु त्यासाठी काही संदेश देण्यात आला. “अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांधावी म्हणजे तो बरा होईल.” (यशया ३८:२१). एकदा येशूने एका अंधळ्याच्या डोळ्यांना तोंडातील थुकीने मातीचा चिखल करुन लावला आणि शीलोह तळ्यात जाऊन धुण्यास सांगितले. त्याने जाऊन आपले डोळे धुतले व त्याला दृष्टी आली. (योहान ९:७). हे आरोग्यदान त्या महान आरोग्य दात्याच्या मुखातूनच मिळालेली शक्तिने मिळू शकत होती. पण तरीही ख्रिस्ताने निसर्गातील साध्या साधनांचा वापर केला. परंतु त्याने कोणत्या औषधांचा वापर करण्याचे समर्थन केले नाही. त्याने निसर्गातील साध्याच साधनांचा वापर करण्याचे समर्थन केले नाही. त्याने निसर्गातील साध्याच साधनांचा वापर करण्यास सांगितले.MHMar 179.1

    जेव्हा आम्ही आजार बरे होण्यासाठी प्रार्थना केली. परिणाम काहीही होवो परमेश्वरावरील आपला विश्वास कमी होऊ देऊ नये. आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तिच्या मृत्युचा प्रसंग जरी आला तरी लक्षा असू द्या की आम्ही पीत असलेला विषयाचा कडू प्याला आपल्या पित्याच्या हातात आहे. परंतु जर आरोग्यामध्ये सुधारणा होत असेल तर आरोग्याची दया मिळालेल्या रुग्णाने हे हे विसरु नये की त्याने सृष्टीकर्त्याचे आभार मानण्यास तो बांधील आहे. जेव्हा प्रभूने दहा कुष्ट रोग्यांना बरे केले तेव्हा एकच त्याचे आभार मानण्यासाठी परत आला. आपणापैकी कोणीही त्या नऊ रोग्याप्रमाणे होज नये. त्याचे आभार मानण्याचे विचारही त्यांच्या मनात आले नाही. त्यांची हृदयांना परमेश्वराच्या दयेचा स्पर्श झाला नाही. “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक उत्तमदान वरुन आहे. ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याकोब १:१७).MHMar 179.2

    *****