Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परीक्षा करवी अनुशासन

    अशा प्रकारचे जीवन जगणे आणि अशा प्रकारचा प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पावलावर प्रयत्न, आत्मबलिदान आणि अनुशासनाची शिस्तीची अति आवश्यकता आहे. यामुळेच ख्रिस्ती जीवनामध्ये सहज निराशा येते. ही गोष्ट लोकांना समजत नाही. बहुतेक लोक इमानदारी आणि प्रामाणिकपणे स्वत:ला देवाच्या कार्यासाठी वाहून देतात, परंतु लवकरच त्यांच्या पदरी निराशा येऊन धडकते. त्यांच्या जीवनामध्ये असे प्रकार कधीच घडले नव्हते हे पाहन त्यांना नवल वाटते व ते निराश होतात. ख्रिस्ता समान आपले चरित्र ते बनविण्याचा प्रयत्न करतात व प्रभुची सेवा करण्याची योग्यता मिळविण्याचे प्रयत्न करतात. प्रार्थना करतात. अशा अवस्थेत त्यांना आणले जाते की त्यांच्यामधील सर्व वाईट गोष्टी बाहेर येतात. असे दोष प्रगट केले जातात की त्यांच्या उपास्थितीचा संशयही त्यांना नसतो. प्राचीन काळातील इस्त्राएल लोकांप्रमाणे ते प्रश्न विचारतात, “जर परमेश्वर आमचे मार्गदर्शन करीत आहे तर या सर्व गोष्टी आम्हांवर का येतात ?’MHMar 370.1

    कारण परमेश्वर त्यांचे मार्गदर्शन करीत आहे म्हणून या गोष्टी त्यांच्यावर येतात. त्यांच्यावरील परीक्षा, अडथळे या सर्व गोष्टी त्यांना शिस्त लावण्यासाठी प्रभुने निवडलेल्या या पद्धती आहेत. म्हणूनच आपण जितके प्रभुच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करु तितक्या जास्त परीक्षा आपणावर येतात. आपणास यश येण्यासाठी या सर्व अटी असतात. जो मनुष्याची हृदये वाचतो आणि मानवाचे चरित्र जो जाणतो त्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखतो, पाहतो. काही लोकांमध्ये अशी शक्ति आहे, अशा भावना आहेत त्यांना जर योग्य दिशेला मार्गदर्शन केले तर ते प्रभुचे कार्य पुढे चालविण्याच्या कामी येऊ शकतात. प्रभु आपल्या योजनांतर्गत अशा लोकांना विभिन्न परिस्थिती आणि दशेमध्ये आणतो की ते आपले चरित्र आणि ते दोष पाहू शकतात जे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसून येतात. प्रभु त्यांना त्या दोषांपासून सुधारण्यासाठी व आपल्या सेवेसाठी तयार करण्याची संधी देतो. तो त्यांना कष्टाच्या भट्टीत टाकून काढतो. म्हणजे त्यांनी शुद्ध व्हावे अशी त्याची इच्छा असते.MHMar 370.2

    आम्हाला कष्ट सहन करण्यासाठी पाचारण केले आहे. प्रभु आमच्यामध्ये काही मौल्यवान गोष्टी पाहातो आणि ते सत्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यातील हे मौल्यवान सत्य तो विकसीत करु पाहतो. जर तो आमच्यामध्ये तसे काही पाहात नाही तर आम्हाला शुद्ध करण्यासाठी तो आपला वेळ खर्च करीत नाही. प्रभु आपल्या भट्टीमध्ये वायफळ धोंडे शुद्ध होण्यासाठी टाकीत नाही. तो मौल्यवान व कच्चे दगड टाकून ते शुद्ध करीतो. लोहार लोखंड आणि पोलाद अग्निमध्ये टाकतो म्हणजे कोणत्या प्रकारचा धातू बनतो. प्रभु आपल्या निवडलेल्या कष्टाची भट्टीमध्ये हे पाहण्यासाठी टाकले जाते की ते कशा स्वभवाचे आहेत आणि काय ते प्रभुचे कार्य करण्यास तयार होतील ?MHMar 371.1

    कुंभार माती घेतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे त्याला आकार देतो. तो माती मळतो, तुडवितो व त्यार करतो. तो तीचे तुकडे करतो परत मिसळतो, एकजीव करतो. तो माती भिजवतो व सुकवितो आणि काही वेळ स्पर्श न करता तशीच ठेऊन देतो. पूर्णपणे माती मऊ झाल्यावर मग तो मातीची भांडी (मडकी) करण्यास घेतो. आपल्या चाकावर ठेऊन लहान मोठी वेगवेगळी भांडी तयार करतो. मग ती भांडी तो उन्हामध्ये सुकवितो आणि मग भट्टीत टाकून भाजून काढतो. अशाप्रकारे मातीचा वापर करुन तो उपयोगी भांडी तयार करतो. अशाप्रकारे आपला परमेश्वर सुद्धा आम्हांला सुद्धा चाळतो, मळतो, एकजीव करतो, मऊ करतो. माती जशी कुंभाराच्या हातात असते तसेही आम्हीही प्रभुच्या हाती असतो. आम्ही आमच्या प्रभुच्या हाती असावे. आपण कुंभार होण्याचे प्रयत्न करु नये. तर कुंभाराच्या हातातील मातीसारखे आपण स्वत:ला प्रभुच्या हाती समर्पित करावे. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने आमची घडण करावी.MHMar 371.2

    “प्रियजन हो तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांवर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्याअर्थी आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही उल्हास आणि आनंद कराल.” (१ पेत्र ४:१२-१३).MHMar 371.3

    दिवसाचा प्रकाश आणि दुसऱ्यांच्या संगीताचा आवाज ऐकून असे वाटत नाही की पिंजऱ्यात बंद असणाऱ्या पाखराला त्याचा मालक गीत शिविण्याचा प्रयत्न करीत आहे. ते पाखरु त्या गीताच्या काही ओव्या शिकते. त्या पाखराचा आवाज कंप पावतो परंतु पूर्ण गीत शिकू शकत नाही. आता त्या पाखराला पिंजऱ्यात बंद करुन त्या पाखराला त्या ठिकाणी ठेवले जाते जेथे ते गीत त्याला ऐकू येते जे गीत मालक पाखराला ते गीत शिकवून पाहण्याची इच्छा धरीत आहे. अंधारामध्ये ते गीत पाखरु अंधारामध्ये ते पूर्ण गीत शिकण्याचे प्रयत्न पाखरु करते आणि मग ते गीत उत्तम प्रकारे शिकते. मग त्या पाखराला प्रकाशात आणले जाते आणि त्यानंतर प्रकाशामध्ये सुद्धा न अडखळता ते पाखरु ते गीत गाते. अशाप्रकारे परमेश्वरसुद्धा आपल्या मुलांशी अशाच प्रकारचा व्यवहार करतो. तो आम्हांला एक गीत शिकवू पाहतो. जेव्हा आम्ही दुःखी छायेत हे गीत शिकतो तेव्हा ते गीत आपण सतत गात राहातो. MHMar 372.1

    अनेक लोक त्यांच्या जीवनाच्या कार्याला असंतोषि असतात. कदाचित त्यांचे वातावरण अनुकूल नसावे. त्यांचा वेळ साधारण कामे करण्यात जातो. त्याचवेळी त्यांना वाटत असते की ते एक मोठ्या जबाबदारीचे, लायकीचे आहेत. त्यांची तशी योग्यता आहे. तसे पाहता त्यांचे ते प्रयत्न बऱ्याचदा अपयशी असते आणि त्यांची कोणी प्रशंसाही करीत नाही. त्यांना त्यांच्या भविष्याची अनिश्चितता दिसते.MHMar 372.2

    आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे जे कार्य आम्हाला देण्यात आले आहे ते आम्हाला आवडत नसावे. म्हणून ते कार्य आम्हाला परमेश्वराची निवड म्हणून स्वीकारायची आहे. आम्हाला पसंत पडो किंवा न पडो ते आपण आपले कर्तव्य म्हणून करायचे आहे व जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करुन कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग युक्तिप्रयुक्ति, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:१०). जर प्रभुची इच्छा आहे.MHMar 372.3

    जर परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही नवे शहरात जाऊन संदेश द्यावा. मग तार्सेस किंवा कफर्न हमला आपले जाणे त्याला कसे आवडेल ? ज्या दिशेला आपली पाऊले पडावीत अशी परमेश्वराची इच्छा आहे त्यामागे त्याचे काहीतरी कारण असणार. त्या ठिकाणी अशी कोण व्यक्ति असू शकेल की जिला आपली गरज भासत असणार. तो स्वामी ज्याने फिलिपाला इथोपियाचा सल्लागाराजवळ, पेत्राला रोमी सुभेदारकडे आणि ती लहान मुलगी तिला आपली गरज भासत असणार. तो स्वामी ज्याने फिलिपाला इथोपियाचा सल्लागाराजवळ, पेत्राला रोमी सुभेदाराकडे आणि ती लहान मुलगी तिला नामानाच्या घरी मदतीसाठी पाठविण्यात आले होते. तो स्त्री-पुरुष व तरुणांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकांकडे पाठवितो. ज्यांना स्वर्गीय सहाय्याची गरज असते.MHMar 372.4