Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    संस्थेकरवी काळजी

    रुग्णालयामध्ये ज्या परिचारीका काम करतात त्यांना सतत अनेक रुग्णांची काळजी घ्यावी लागते. अशावेळी त्यांना सतत शांत, आनंदी आणि हसत मुख राहावे लागते. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द साधव गिरीचे असणे आवश्यक आहे आणि त्यांचे कार्यही मनविचलित व गोंधळलेले असू नये. रुग्णालयामध्ये प्रत्येक परिचारी केले आपले कार्य काळजीपूर्वक व बुद्धीन करावे. त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की त्या आपले कर्तव्य करीत असतांना रुग्णांची जी सेवा करतात ती ईश्वर सेवा आहे.MHMar 169.3

    प्रत्येक परिचारीके ते रुग्णाशी बुद्धीचातुर्याने बोलणी करावीत रुग्णासाठी ते महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी रोज धर्म शास्त्राचे अध्ययन करावे. यामुळे त्या असे शब्द बोलतील की रुग्णासाठी ते चांगले असतील. ज्या खोलीमध्ये रुग्णाची सेवा केली जाते तेथील वातावर प्रसन्न आणि सुगंधीत असावे. कारण परमेश्वराच्या दुतांचा वास तेथे असतो. रुग्णाची सेवा करणाऱ्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन दिसणे आवश्यक आहे. मग ते जे काय करतील रुग्णाला ते परमेश्वराच्या सानिध्यात आणतील.MHMar 170.1

    ख्रिस्ती परिचारीका जेव्हा जेव्हा प्रसन्नतापूर्वक रुग्णाला आरोग्यदान देण्यासाठी त्याची शुश्रुषा करते तेव्हा ती सहजते ने रुग्णाला दयाळू ख्रिस्ताकडे रुग्णाला घेऊन येते. रुग्णाचा आत्मा अशा प्रकारे प्रसन्न व आनंदी करुन रुग्णाचा आजार सुद्धा बरा होतो. विचार थोडे इकडे थोडे तिकडे केले तर त्यांचे परिणाम दिसून येतात. जी परिचारीका वृद्ध असेल तर तिने कोणतीही सुसंधी व्यर्थ जाऊ देऊ नये. ती रुग्णाचे लक्ष ख्रिस्ताकडे आणू शकते. आत्म्याचे आरोग्य आणि शरीराचे आरोग्य एकत्र करुन रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी परिचारीकेने सदैव तयार असावे.MHMar 170.2

    मोठ्या ममतेने आणि कोमलतेने परिचारीकेने रुग्णाला सांगायचे असते की ज्या लोकांना बरे होण्याची इच्छा आहे त्यांनी परमेश्वराच्या योजने विरुद्ध पाप करु नये. त्याने अपराधाचे जीवन बंद करणे आवश्यक आहे. कारण परमेश्वर अशांना आशीर्वाद देऊ शकणार नाही. जे समजून उमजून स्वर्गाविरुद्ध पाप करतात त्यांना क्षमा मिळणार नाही. तर त्यांना रोग आजार पछाडतात. परंतु ख्रिस्ता पवित्र आत्म्याकरवी आरोग्यदानाची शक्ति देऊ करतो. जे वाईट करण्याचे सोडून देतात आणि चांगला मार्ग धरतात त्यांना परमेश्वर आशीर्वाद देऊन शारीरिक व मानसिक आजार बरे करतो. जे लोक परमेश्वरावर प्रेम करीत नाहीत ते सतत देह आणि प्राणाच्या सर्वोत्तम लाभाच्या विरुद्ध जाऊन कार्य करतात. परंतु जे लोक वाईटाने भरलेल्या या जगा जगामध्ये परमेश्वराच्या आज्ञा पालनाचे महत्व समजून घेतात ते आपल्या सर्व वाईट संवयी सोडून त्यापासून अलिप्त होतात व धन्यवाद आणि प्रीतिने त्यांची हृदये भरुन येतात त्यांना ठाऊक आहे की येशू त्यांचा एक बंधू आहेत. त्यांना जाणीव होते की येशू ख्रिस्त आजारातून बरे करण्यासाठी सर्वात उत्तम उपचारापेक्षाही अधिक महत्व देतो. परंतु सेवेच्या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. त्या एकमेकीच्या हातात हात घालून चालतात.MHMar 170.3

    “प्रिय बंधोजसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो.” (इयोहार २).MHMar 171.1

    “रोग्यास बरे करा, मेलेल्यांस उठवा.कुष्ट्यास शुद्ध करा. भुते काढा तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या.” (मत्तय १०:८).MHMar 171.2

    “म्हणून बंधुजन हो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्थ करावी ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरस होऊ नका तर आपल्या मनाच्या नविनीकरणाने स्वत:चे रुपांतर होऊ द्या.” (रोम १२:१-२).MHMar 171.3

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents