Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ४३—एक उच्च अनुभव

    “तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये.”

    आम्हला ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाचा रोज नवीन अनुभव सतत यायला हवा. हा अनुभव त्याच्या शिकवणी नुसारच असावा. उंच आणि पवित्र उपलब्धता आमच्या हाताला येण्यासारख्या आहेत. ज्ञान आणि सद्गुणात आपला सतत विकास व्हावा अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. आमच्यासाठी परमेश्वराचा हा मुख्य उद्देश आहे. त्याची व्यवस्था हीच त्याच्या आवजाचा प्रतिध्वनी आहे. यामुळे सर्वांवर नियंत्रण होते. “वर या, पवित्र व्हा व आणखी पवित्र व्हा.’ ख्रिस्ताच्या चरित्र्याची सिद्धता आमच्यामध्ये पुढे पुढे जाऊ शकते.MHMar 403.1

    जे लोक गुरुच्या सेवेमध्ये आहेत त्यांना अधिक उंच आणि खोल आणि विस्तृत अनुभवाची आवश्यकता आहे. या विषयी आतापर्यंत अनेकांना अनभवही आला नसेल. अनेक लोक जे सुरुवाती पासूनच परमेश्वराच्या महान कुटूंबाचे सभासद आहेत ते त्याचे गौरव पाहणे ते त्याच्या गौरावातून गौरवाकडे बदलत जाण्याचा अर्थ खूपजन समजत नाहीत. अनेकांजवळ ख्रिस्ताच्या महानतेविषयी खूप कमी माहिती आहे. अगदी अंधुक कल्पना त्यांना आहे आणि त्यांची हृदये आनंदाने भरुन जातात. मुक्तिदात्याला ते आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छितात. त्याचे प्रेम जाणू इच्छितात. या लोकांच्या आत्म्याची प्रत्येक इच्छा परमेश्वरावर केंद्रित असते. पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर राहतो जे त्याला अनुमती देतात. पवित्र आत्मा त्यांना वळवितो जे वळू इच्छितात. ज्यांना सुधारण्याची इच्छा आहे त्यांची तो सुधारणा करतो. स्वत:ला आत्मिक विचार आणि पवित्रतेच्या विषयाने जागृत राहा. तुम्ही त्याच्या गौरवाच्या सकाळच्या सूर्याची पहिली किरणेच पाहिली आहेत आणि जेव्हा तुम्ही प्रभूची ओळख करुन घेण्यासाठी त्याच्या मागेमागे जाता तेव्हा तुम्हाला जाणवेल की, “परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान पर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. (नीतिसूत्रे ४:१८).MHMar 403.2

    ख्रिस्ताने म्हटले, “माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान १५:११).MHMar 403.3

    ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाचे स्वरुप नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवले आहे. पृथ्वीवर परिक्रम आणि बलिदान देऊन त्याच्या कष्टाचे दुःखाचे परिणाम व्यर्थ गेले नाही याचे त्याला समाधान वाटत आहे. जे कष्ट व दुःख त्याने सहन केले होते त्याचे पूर्ण सार्थक झाले आहे. मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी त्याने आपले जीवन समर्पण करुन त्याने मनुष्याच्या हृदयात परमेश्वराची प्रीति पूर्ण प्रतिमेची स्थापना केली आहे. आम्हांला तो मातीतून उठविल. आमचा स्वभाव तो स्वत:च्या स्वभावाप्रमाणे करील. यामुळे त्याचे गौरव अधिकच सुंदर होईल.MHMar 404.1

    ख्रिस्ताने आपल्या आत्म्याच्या वेदना पाहिल्या आणि तो संतुष्ट झाला. त्याने अनन्त विस्तारावरुन आपली दृष्टी फिरविली आणि त्या लोकांचा आनंद पाहिला ज्यांच्या पापांसाठी क्षमा आणि सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी त्याने अपमानाप्रद आपले प्राण अर्पण केले. जगाच्या पापासाठी त्याला ठेचले., तो घायळ झाला. जगाच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. जगाला शांति मिळण्यासाठी त्याला शिक्षा झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी त्यांना आरोग्य प्राप्त झाले. तारण झालेल्यांच्या मुखातून त्याचा जय जयकार ऐकण्यात आला. त्याने क्षमा मिळालेल्यांना त्याने मोशेचे आणि कोकऱ्याचे गीत गाताना ऐकले. त्याला रक्ताचा बाप्तिस्मा धेणे भाग पडले. जगाच्या पापांचा भार त्याच्यावर लादला गेला होता. तरीही त्याचा चेहरा शांत होता. त्याने वधस्तंभ स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:ची लज्जा तुच्छ मानण्याचे त्याने ठरविले हाते.MHMar 404.2

    त्याच्या सर्व शिष्यांना या आनंदामध्ये सन्मानीत करण्यात येईल. या शिवाय आम्ही येथेसुद्धा आमच्या विश्वासाकरवी मुक्तिदात्याच्या गौरवामध्ये आनंद भोगू शकतो. ओशेसारखेच आम्हालाही अदृष्य परमेश्वरासाठी दुःखातही आनंद मानायचा आहे.MHMar 404.3

    आता मंडळ्या एक प्रकारच्या आक्रमक अवस्थेमध्ये आहेत आता आम्ही या अंधारामध्ये अशा जगाशी सामना करीत आहोत जो पूर्णपणे मूर्तिपूजेच्या अधिन झाला आहे.MHMar 404.4

    पंरतु तो दिवस लवकरच येत आहे. जेव्हा लढाई संपली आहे. विजय मिळाला आहे. पृथ्वीवर परमेश्वराची इच्छा पूर्ण होत आहे जशी स्वर्गामध्ये नेहमी होते. देशांमधून तारण केलेले लोक परमेश्वराच्या नियमांशिवाय कोणतेच नियम ते जाणत नाहीत. सर्वजण एक सुखी कुटूंबासारखे एकच प्रकारचे धन्यवाद आणि स्तुतियुक्त वस्त्र ख्रिस्ताची धार्मिकता त्यांनी पांघरली आहे. संपूर्ण निसर्ग आपल्या सौंदर्याने परमेश्वराची स्तुती, भक्ति गाईल आणि सन्मानाची भेट चढविल. स्वर्गाच्या प्रकाशामध्ये सर्व सृष्टी न्हाऊन निघेल. चंद्र आणि सूर्य प्रकाशाचा प्रकाश अधिक होईल. सूर्याचा प्रकाश सध्याच्या मानाने सातपट प्रकाशित होईल. चंद्राचा प्रकाश सूर्यासारखा होईल. वर्षे आनंदाने जातील. सकाळचे तारे आनंदाने गीत गातील. परमेश्वराची मुले आनंदाने गीते गातील. परमेश्वराचा जयजयकार करतील. तेव्हा परमेश्वर आणि ख्रिस्त एकत्रित घोषणा करतील की येथून पुढे कधीच “पाप असणार नाही आणि मृत्यु राहणार नाही.”MHMar 405.1

    भविष्यात येणाऱ्या या गौरवाचे दर्शन त्याच्या मुलांना प्रिय होतील कारण ही सर्व परमेश्वराने स्वत:च्या हातांनी घडविली आहेत.MHMar 405.2

    सार्वकालिक उंबरठ्यावर उभे राहून भव्य सजावट व स्वागताचा आवाज ऐका आणि ही संधी त्या लोकांना मिळेल ज्यांना ख्रिस्तासाठी व त्याच्या नावासाठी द:ख, त्रास व वेदना सहन केल्या. शेवटी तर मरणही पत्करले. त्या ऐवजी त्यांना अशा प्रकारचा सन्मान व स्वागताची संधी मिळणार आहे. स्वर्गदतांबरोबर देवाचे लोकसुद्धा आपले मुगूट ख्रिस्ताच्या चरणाजवळ ठेवतील व मोठ्याने घोषणा करतील की “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास तो योग्य आहे.MHMar 405.3

    राजासनावर बसलेला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानयुगे आहेत.” (प्रकटीकरण ५:१२-१३).MHMar 405.4

    येथे असलेले लोक जे तारलेले आहेत ते त्यांचे स्वागत करतात ज्यांनी येशूचा झेंडा उंच उंचावला आहे. अनेकांना त्यांनी मुक्तिदात्याकडे मार्गदर्शन केले आहे. ते सर्व एकत्र मिळून त्याचे गौरव करतात कारण तो मनुष्यासाठी आला, दुःख सहन केले व वधस्तंभावरील मरण सोसले. म्हणजे त्यांच्या स्वर्गाचे राज्य प्राप्त व्हावे, सार्वकालिक जीवन मिळावे. संघर्ष संपला आहे. सर्व क्लेल, त्रास, भांडणे संपली आहेत. जेव्हा तारण झालेले सर्व लोक परमेश्वराच्या आसना भोवती उभे राहतात, विजयी गीतांना सर्व स्वर्ग दमदमता. सर्वजण या आनंदात सामील होतात. “तो कोकरा बलिदान झाला होता तोच योग्य आहे. आणि आम्हाला परमेश्वराची मुले होण्याचा हक्क दिला आहे.MHMar 405.5

    “यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्र, वेश, लोक व निरनिराळे भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्या समोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उंच स्वराने म्हणत होते. राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.” (स्तोत्र ७:९-१०).MHMar 406.1

    “ते हेच आहेत जे, त्या महाक्लेशातून बाहेर आले आहेत. त्यांनी आपापली वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केली आहेत म्हणूनच ते परमेश्वराच्या आसनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात रात्रं-दिवस त्याची सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसला आहे तो त्यांच्यासाठी तंबू ताणील. ते कधीही भुकेले व तहानेले राहणार नाहीत. त्यांच्यावर सूर्याचा ताप कधीच त्रास देणार नाही. कारण कोकरा जो सिंहासनावर आहे. तो त्यांचे रक्षण करील आणि त्यांना तो जिवंत पाण्याजवळ घेऊन जाईल आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटी ७:१४-१७). “यानंतर मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटी २१:४).MHMar 406.2

    या न पाहिलेल्या गोष्टी आम्ही सतत आपल्यासमोर ठेवल्या पाहिजेत. अशाप्रकारे आम्ही सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आणि पृथ्वीवरील वस्तुची योग्य किंमत लावू शकतो. अशाप्रकारे आम्ही दुसऱ्या लोकांनाही प्रभावित करण्याची शक्ति देऊ शकतो.MHMar 406.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents