Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मनाचे मनावर नियंत्रण :

    ही एक प्रकारची मानसिकतेवरील चिकित्सा आहे. वाईटावर याचा योग्य परिणाम होतो. याला विज्ञान म्हणतात यामध्ये एका व्यक्तिची मानसिक स्थिति दुसऱ्या व्यक्तिच्या नियंत्रणामध्ये असते. यामध्ये दुर्बळ व्यक्तिचे व्यक्तिमत्व सशक्त व्यक्तिच्या बुद्धीमध्ये विलीन होते. एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिची इच्छा पूर्ण करते. या गोष्टीवर असा दावा केला जातो की विचारांची गती बदलून आरोग्य देणाऱ्या विचारांना रुग्णाच्या डोक्यामध्ये प्रवेश करण्याने रुग्ण बरा होतो. यामुळे आजाराशी लढून रुग्ण बरा होतो. तशी शक्ति त्याला प्राप्त होते.MHMar 187.3

    उपचाराच्या या विधिचा प्रयोग त्या रुग्णावर केला जातो. ज्याची वास्तविक प्रकृति आणि प्रवृत्ति याची त्यांना जाणीव होते. तसेच ज्यांचा विश्वास असेल की या उपचाराने आजार बरा होईल. परंतु हा सिद्धांत केवळ खोटा असून काल्पनिक आहे. हा उपाय ख्रिस्त आणि आत्मायांच्या विरुद्ध आहे. जो जीवन आणि उद्धारक आहे त्याच्याकडे हे विचार घेऊन जात नाहीत.MHMar 188.1

    परमेश्वराचा उद्देश असा मुळीच नाही की कोणी आपली बुद्धी आणि मन इतरांच्या ताब्यात देऊन त्यांच्या नियंत्रणाखाली राहावे आणि त्यांच्या हातची कळसूत्री बाहूली बनावे. कोणालाही आपले व्यक्तिमत्व इतरांना देऊन त्यांच्यामध्ये विलीन होण्याची गरज नाही. कोणत्याही व्यक्तिकडे तीच आपल्या आरोग्यदायी जीवनाचे स्तोत्र असल्याचे पाहण्याची आवश्यकता नाही. तर त्याची निर्भरता परमेश्वरावर असणे आवश्यक आहे. परमेश्वराकरवी मानवाला दिलेले त्या श्रेष्ठत्व दिले आहे. प्रतिष्ठा दिली आहे ती केवळ परमेश्वराकरवीच नियंत्रित करणे आवश्यक आहे. कोणा मनुष्याच्या बुद्धीवर नाही.MHMar 188.2

    परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याने सरळ त्याच्याशीच संबंध ठेवावेत. मनुष्याबरोबर असणारे सर्व व्यवहारामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन असणारे सिद्धांत तो स्वीकारतो. व्यक्तिगत अवलंबावर तो प्रोत्साहन देतो आणि व्यक्तिगत मार्गदर्शनावरील अवश्यकतेवर तो जोर देतो. मनुष्याला तो स्वर्गीय संगतीत आणण्याची व्याची इच्छा आहे. यामुळे मनुष्यचे परिवर्तन स्वर्गीय समानतेमध्ये व्हावेअसे परमेश्वराला वाटते. आणि सैतान याच उद्देशाला बिघडविण्याचे कार्य करीत आहे. तो एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्यावर अवलंबून राहण्याचे कार्य करीत आहे. तीच संधी तो पाहात असतो. जेव्हा मनुष्याचे मन परमेश्वरावरुन दुसरीकडे जाते तेव्हा परीक्षा घेणारा त्याला आपल्या नियंत्रणात ठेवतो तो मानवतेला नियंत्रित करु शकतो.MHMar 188.3

    एका मनाला दुसऱ्या मनाने नियंत्रित करण्याच्या सिद्धांताची निर्मिती सैतान करीत असतो ते अशासाठी की तो स्वत:ला मुख्य कार्यकर्ता म्हणून प्रगट करु शकेल. म्हणजे जेथे स्वर्गीय विचाराची स्थापना व्हायला पाहिजे तेथे मनुष्याच्या विचारांची स्थापना होईल असा सैतानाचा कावा आहे. ख्रिस्ती लोकांना ज्या चुका कबूल केल्या आहेत त्यामध्ये जास्त अक्ष्यम्य अशा कोणत्याच चुका नाहीत आणि अशी कोणतीच चुक नाही जी मनुष्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकते. परंतु मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या अधीन झाला तर तो विनाशाकडे जातो. यामुळे त्याचे आरोग्य सुधारणार नाही तर तो देवापासून दूर जाईल व त्याचा नाश होईल. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे मन स्वत:च्या नियंत्रणात ठेवतो आणि त्या दोघांवर सैतानाचे नियंत्रण राहते. अशा प्रकारे वाईट बुद्धीच्या स्त्री पुरुषांना दिलेली शक्ति भयावह असते. इतरांचा दुबळेपणा किंवा मूर्खपणाचा फायदा असे लोक घेतात व त्यांच्याकडून आपले कार्य करुन घेतात. अशी अनेक दबळी मने आहेत जी वाईटाच्या नियंत्रणाखाली येतात व ते आपली वासनाव लालसा पूरी करतात.MHMar 188.4

    आमच्यासाठी मानवाकडून मानवासाठी एकाने दुसऱ्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुसरे काहीतरी चांगले आहे. चिकित्सकांनी लोकांना शिकविले पाहिजे की मानवाकडे पाहण्यापेक्षा परमेचराकडे पाहा. रुग्णांना आजार आणि शरीरासाठी लोकांकडे पाहण्यास शिकविले जाते. त्याऐवजी त्यांनी त्या परमेश्वरावर अवलंबून राहण्यास शिकवावे ज्याच्याजवळ पूर्णपणे उद्धार होऊ शकतो. ज्या परमेश्वराने मनुष्याची बुद्धी बनविली त्याला ठाऊक आहे की बुद्धीची आवश्यकता काय आहे? केवळ परमेश्वरच आहे जो मनुष्याला त्याच्या सर्व आजारातून बरे करील. ज्या लोकांची मानसिकता आणि शरीर आजारी आहे त्यांनी ख्रिस्ताकडे पाहावे. “मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.” (योहान १४:१९). तोच एक जीवन आहे जो आम्हाला जीवन देतो. त्यांना सांगायला हवे की जर ते आजार मुक्त करणाऱ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतील तर ते आरोग्यदायी नियमांचे पालन करुन त्याच्या भयामध्ये पूर्ण पावित्र्य मिळविण्याच्या प्रयत्नामध्ये परमेश्वराला पूर्ण सहयोग करावा असे केले तर परमेश्वराचे जीवन त्यांच्यामध्ये प्रवेश करील. जेव्हा आम्ही ख्रिस्तासमोर स्वत:ला अशा प्रकारे प्रस्तुत करतो तर त्यांना एक शक्ति एक बळ देऊ जे मोलवान आहे. कारण ही शक्तिवरुन येते. शरीर आणि आत्मायांना बरे करणारे हेच खरे ज्ञान आहे.MHMar 189.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents