Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    स्वभावगुणाची परीक्षा

    “गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करिता येते, परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीचा आहे असे नाही.” (मार्क १४:७).MHMar 154.1

    “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.” (याकोक १:२७). MHMar 154.2

    असहाय्य आणि गरीबांना त्यांच्यामध्ये त्यांच्या देखरेखीवर अवलंबून आहे. याद्वारे ख्रिस्त आपल्या शिष्यांची परीक्षा घेतो. परमेश्वराच्या मुलांची सेवा करून आम्ही परमेश्वर प्रती आपले प्रेम वास्तवामध्ये सिद्ध करतो. अशा गरीब व अनाथ मुलांकडे दुर्लक्ष करुन आम्ही स्वत:ला ख्रिस्ताचे खोटे शिष्यसिद्ध करतो. या कृत्याने परमेश्वराने प्रेम ओळखीत नाही असे दिसून येते.MHMar 154.3

    अनाथांना आपल्या कुटुंबामध्ये सामील करुन घेण्यासाठी काहीतरी करावे लागते. एवढे करुनही आणखी काही गोष्टी शिल्लक राहतात व त्या म्हणजे अशी अनेक मुले ज्यांना मदतीची गरज आहे मदती विना राहून जातात. त्यांना आपल्या मदतीची गरज असते. अनेकांना त्यांच्या वारशाने वाईट दिवस येतात. ते अयोग्य हट्टी आणि वाईट सवयींचे असू शकतात. परंतू ख्रिस्ताच्या रक्तांने ते विकत घेतलेले असतात. म्हणून तेही तितकेच मोलवान असतात जितके तुम्ही आहात त्याच्या दृष्टीने तेसुद्धा त्याची मुले आहेत. आपण जर त्यांना मदतीचा हात दिला नाही तर ते सुद्धा अज्ञानामुळे वाईटामध्ये फसले जाऊन अपराधी मार्गाला लागतात. अशा अनेक अनाथ मुलांसाठी अनाथा श्रमाकरवी त्यांच्या वाईट सवयी सुटू शकतात किंवा त्यांना कोणीतरी दत्तक घेतल्यास अति उत्तमच होईल.MHMar 154.4

    अनाथसंस्था जेथे जेथे आहेत तेथील अनाथांना परिवारातील वातावरण निर्माण करुन योग्य गोष्टींचे सहाय्य उपलब्ध करुन द्यावे हे आपले घर आहे कुटूंब आहे जसे वातावरण निर्माण करुन त्यांना तस विश्वास निर्माण करावा. अनाथालयासाठी एकच मोठी इमारत बनविण्याऐवजी ठिकठिकाणी छोट्या-छोट्या इमारती बनविणे आवश्यक आहे असे केले तर प्रत्येक बालकावर वैयक्तिकपणे लक्ष देणे शक्य होईल. मोठ्या शहरांमधून अनाथ संस्था स्थापन करण्याऐवजी खेड्यामध्ये इमारती बांधाण्यात ज्या ठिकाणी शेती करण्यासाठी जमिनी उपलब्ध असाव्यात. यामुळे निसर्गामध्ये मुलांची वाढ होऊन तेथील वातावरणात त्यांना उद्योगधंद्यांचे शिक्षण देणे सोपे जाईल.MHMar 154.5

    अनाथाश्रमाच्या देखरेखीसाठी असणारे कर्मचारी हे प्रेमळ स्वभावाचे सुसंस्कृत, सेवेसाठी वाहून घेतलेले सुशिक्षित आणि प्रशिक्षित असावेत. मुलांना धार्मिक, बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञान देणारे असावेत. अनेक बेघर, दुर्लक्षित अनाथ असे सोडलेली मुले या ठिकाणी येऊन त्यांना सुशिक्षित व देशासाठी जबाबदार नागरिक बनवावे. स्वत:च्या कटू अनुभवाने इतर असाह्य लोकांना मदत करण्यासाठी ते पुढे सरसावतील. अनेक लोक कंजूषीपणामुळे कडेत्या बुद्धीचे असल्यामुळे अनाथ मुलांचा द्वेष करतात. परंतु बचत करणे ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु बचत करण्याचे कारण उदारपणाचे असावे. असाह्य लोकांसाठी मदतीचा उद्देश असावा. आम्हाला बचत करणे आवश्यक आहे म्हणजे इतरांना मदत करु शकतो.MHMar 155.1

    वास्तविक पाहता स्वनकार केल्याशिवाय माणसाच्या मनात उदारपणा येत नाही. परमेश्वराने ख्रिस्तीलोकांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते स्वनकार करुन अनाथांचे व गरीबांचे सहाय्य करु शकतात. कारण ते देवाला भिऊन वागतात व त्यांच्यामध्ये प्रामाणिक पणा असतो. केवळ साधेपणाचे जीवन जगून व असहाय्य अनाथांच्या मदतीच्या हेतूने बचत करुन त्यांना मदत करणे शक्य होते ख्रिस्ताने दिलेली प्रतिनिधी या नात्याने त्याच्या अनुयायांना दिलेली ती जबाबदारी आहे. घमेंड, मोठेपण, जगाशी समरस व संसारिक गोष्टीमध्ये आवड धरण्याने परोपकारी बुद्धी नष्ट होते. आपले जीवन ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीनुसार साधे व परोपकारी असावे.” तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे तू लाचारास व निराश्रीतांस आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त द्यावे तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. हाच उपास नव्हे काय ?” (यशया ५८:७). आमच्यासमोर उपयोगी पडणारे हजारो मार्ग आहेत परंतु आपल्याकडे ज्या कमतरता आहेत त्यामुळेच आम्ही दुःखी होतो. परंतु ख्रिस्ती लोक या प्रकाराच्या कार्यामध्ये त्यांच्याकडे जे काय आहे त्यामध्ये हजार पटीने वाढ करु शकतील. अतिभोग आणि स्वार्थ यामुळे आमच्या जवळील गोष्टी संपतात आणि सब मार्ग बंद होतात.MHMar 155.2

    कित्येकजण अशा संस्थांवर आपली संपत्ती खर्च करतात की त्या केवळ मूर्तिच असतात. गरीब लोक रस्त्यावर उघडे वागडे भुकेले असतात. त्यांना सहाय्य करण्याऐवजी मूर्तिला आपले धन अर्पण करतात. श्रीमंत लोक घरांमध्ये किमती सामान भरुन ठेवतात. ते विलासात व आनंदात जीवन जगतात, त्यांची कपाटे कपड्यांनी भरलेली असतात तर गरीब अनाथ रस्त्यावर थंडीमध्ये त्रास भोगतात. श्रीमंतांच्या घरात अन्नाची रेलचेल असते. अन्नाची नासाडी होते तर गरीब भूकेने कासावीस होतात. ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनाच उपहार देण्यात येतात. गरज नसतांना अशा गोष्टींवर पैसा खर्च केला जातो. जीवनाला घातक असणाऱ्या अनेक गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. अनेक ख्रिस्ती लोक जे केवळ नावाचेच ख्रिस्ती आहेत ते स्वत:च्या कपड्यांसाठी खूप पैसे खर्च करतात. यामुळे गरजवंतांना देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच उरत नाही. जे साधारण लोक आहेत त्यांना सुद्धा वाटते की आपणाकडे दागदागीने असावेत महागडे कपडे असण्याची स्वप्ने ते पाहतात.MHMar 156.1

    माझ्या बहिणींनो वरील पेहरावाची तुम्ही अपेक्षा करता परंतु बायबलमध्ये दिलेली साधी राहाणी आत्मसात केली तर तुमच्या गरीब भगिनींना मदत करण्यासाठी तुमच्याकडे खूप काही असेल. यासाठी तुमच्याकडे केवळ साधनेच नाही. परंतु भरपूर वेळही असेल आणि यासाठी वेळेची अधिक गरज असते म्हणजे गरीबांना बऱ्याच गोष्टी शिकविता येतील. बहुतेक महिला परमेश्वराच्या मंदिरापासून दूरच असतात. कारण इतर महिलांच्या तुलनेने त्यांच्याकडे चांगली कपडे नसतात. यासारखेच अनेक फरक बहुतेक लोकांमध्ये असतात. आपल्या परिस्थितीच्या कारणामुळे ते आतल्या आत धुसमटत असतात. अपमान आणि मानहानीच्या भावनेने आतल्या आत कुढत असतात. आणि यामुळेच बरेच बंधु सुवार्तेवर विश्वास ठेवीत नाहीत आणि धार्मिकतेकडे ते दुर्लक्ष करुन आपली हृदये कठीण करतात.MHMar 156.2

    ख्रिस्त आम्हास सांगतो की “सर्व पाचहजार लोक जेऊन तृप्त झाल्यावर उरलेले तुकडे गोळा करुन घ्या काही वाया जाऊ देऊ नका.” (योहान ८:१२). आजजगामध्ये हजारो लोक दुष्काळ, रक्तपात, आग व मारामारीने मरत आहेत. मानवतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुरुषावर काही नुकसान होऊ नये म्हणून बचत करणे अति आवश्यक आहे.MHMar 156.3

    आमचे विचार आणि वेळेचा सदुपयोग करा. ज्या गोष्टींचा आम्ही स्वार्थीपणाने विचार करतो तो प्रत्येकक्षण आम्ही गमाऊन बसतो. जर प्रत्येक क्षणाचे मोल समजून आपण त्याचा सदुपयोग करण्यात खर्च करु लागलो तर आपण जे काय चांगले करु तर त्यासाठी भरपूर वेळ मिळेल. आपल्या पैशाचा खर्च, वेळेचा उपयोग, शक्ति आणि योग्य वेळेचा वापर करतांना प्रत्येक ख्रिस्ती मानवास मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वास उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५). “तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीति करा, त्यांचेबरे करा, निराश न होता उसणे द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. कारण तो कृतघ्न व दुर्जनावरही उपकार करणारा आहे.” (लूक ६:३५).” जो दरिद्रयास देतो त्याला काही उणे पडणार नाही पण जो त्याकडे डोळे झाक करतो त्याला शापावर शाप मिळतात.” (नीति २८:२७).” द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याचमापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” (लूक ६:३८).MHMar 157.1

    “सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो. (नीति १०:४).MHMar 157.2

    जो आपले शेत स्वत: करितो त्याला भरपूर अन्न मिळते परंतु जो निरर्थक गोष्टी मागे लागतो तो अक्कल शून्य होतो.” उद्योग्याच्या हाती अधिकार येतो पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.” “आळस हा आपली शिकार धरीत नाही पण उद्योग हा मनुष्याचे धन आहे.” (नीतिवर १२:११,२४,२७). “आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय ? त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही.” (नीति २२:२९).MHMar 157.3

    “जो वाटा पाहात राहतो तो पेरणी करणार नाही. जो मेघाचा रंग पाहात बसतो तो कापणी करणार नाही. वाऱ्याची गति कशी असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही तसेच सर्व काही घडविणाऱ्या देवाची कृति तुला कळत नाही. सकाळी आपले बी पेर संध्याकाळीही आपला हात आवरु नको कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नसते.” (उपदेशक ११:४-६).MHMar 157.4

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents