Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विश्रांताची वेळ

    त्यांच्या कार्याचा पहिला प्रवास संपल्याबरोबर येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की “चला थोडावेळ बाजूला जाऊन आपण विश्रांती घेऊ.” लोकांना सुवार्ता सांगितल्यावर शिष्य खूष होत असत. परंतु जेव्हा हेरोद राजाकरवी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ठार मारल्याच्या बातमीने ते निराश झाले होते. ती वेळ त्यांच्यासाठी अति कडू होती. येशूला ठाऊक होते की योहानाला तुरुंगामध्ये ठार मारल्यानंतर त्याच्या शिष्यांच्या विश्वासाला धक्का बसला होता. त्यांना फार दुःख झाले होते. येशून त्यांचे दुःखी आणि अश्रृंनी भिजलेले चेहरे पाहिले होते. येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हणाला, “तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या.” (मार्क ६:३१)MHMar 25.2

    बेथसदा जवळील गालील समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर एक शांत एकांत ठिकाण होते. तेथे हिरवळ होती. येशू आणि त्याच्या शिष्यांसाठी ते एक उत्तम विसाव्याचे ठिकाण होते. तेव्हा ते मचव्यातून पलिकडे त्या रानात गेले. या ठिकाणी गर्दीपासून ते दूरवर जाऊन शांत ठिकाणी विश्रांती घेऊ शकतील. या ठिकाणी येशू आणि त्याचे शिष्य शास्त्री व परुशांपासून त्यांच्या टीका व दोषारोपापासून दूर असत. या ठिकाणी त्यांना प्रभुच्या सान्निध्यात काही क्षण राहण्याचा आनंद मिळत असे.MHMar 26.1

    येशूला आपल्या शिष्यांसोबत अगदी थोडा वेळच या ठिकाणी विश्रांती मिळत असे. परंतु हे क्षण त्यांच्यासाठी फार मोलाचे होते. त्यांनी सुवार्ता प्रसाराच्या कार्याविषयी अधिक प्रभावितपणे लोकांसमोर सादर करण्याविषयी चर्चा केली होती. येशूने त्यांच्यासाठी सत्याचा खजिना उलगडला तेव्हा त्यांना जीवन देणारी ईश्वरीय शक्ति प्राप्त झाली आणि नव्या जोमाने व आशेने ते भरुन गेले.MHMar 26.2

    परंतु लवकरच गर्दी त्यांना शोधीत येशूपर्यंत लोक येऊन पोहोचले. अशाप्रकारे एक तासभर विश्रांती घेण्याची त्याची योजना असफल झाली. परंतु शुद्ध आणि दयापूर्ण हृदयामध्ये एक उत्तम मेंढपाळाप्रमाणे अशांत आणि दुःखी व तहानलेल्या आत्म्यासाठी केवळ दयाच होती, प्रीति होती. दिवसभर त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी त्यांची सेवा केली आणि त्यांना संध्याकाळी विश्रांती घेण्यासाठी घरी पाठविले.MHMar 26.3

    दुसऱ्यांच्या भल्यासाठी पूर्णरुपाने समर्पित जीवनामध्ये मुक्तिदात्याने वाहून घेणे आवश्यकते पासून काही वेळ वेगळे होऊन विश्रांती घेण्याच्या मनसुब्यान तो वेगळा झाला होता. तो थकलाही होता आणि पित्याबरोबर त्याला संभाषणही करायचे होते. जशी गर्दी त्याच्यापासून दूर होत असे तेव्हा लगेच तो डोंगरामध्ये जाऊन पित्याला लोकांच्या अडचणी आणि दुःख परिहारासाठी विनंत्या करीत असे.MHMar 26.4

    जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. त्याने त्यांना सतत काम करण्याचा आदेश दिला नाही, परंतु त्यांना आज्ञा केली की, “ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३८). परिश्रम करुन थकलेल्या कार्यकर्त्यांना तो आजसुद्धा जसे त्याने आपल्या शिष्यांना दयापूर्ण शब्दामध्ये सांगितले होते की “तुम्ही एकांतस्थळी जाऊन थोडी विश्रांती घ्या.” तेच सांगतो.MHMar 26.5

    ते सर्व जे परमेश्वराबरोबर शिक्षण घेत आहेत. त्यांना एकांतात आपल्या हृदयाबरोबर निसर्गामध्ये परमेश्वराबरोबर संभाषण करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांना असे जीवन दिसेल की जगाची रीतिरिवाजाप्रमाणे नसणार. कारण जगाच व्यवहार अति भिन्न आहे. म्हणून त्यांना वैयक्तिक अनुभवा करवी परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये परमेश्वराची वाणी वैयक्तिक रूपाने ऐकण्याची गरज आहे. जेव्हा आपल्यामध्ये दुसऱ्यांचे आवाज ऐकण्यासाठी कान बंद होतात आणि पूर्ण शांतीने आपला आत्मा परमेश्वराचा आवाज स्पष्टपणे ऐकण्यासाठी सहाय्य मिळते. तो आम्हाला म्हणतो, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.” (स्तोत्र ४६:१०)MHMar 27.1

    हे त्या सर्वांसाठी जे परमेश्वरासाठी कार्य करतात ही एक अति प्रभावी तयारी आहे. या अस्वस्थ गर्दीच्या मध्ये आणि जीवनाच्या धावपळीच्या तणावामध्ये प्रत्येक व्यक्ति पुन्हा स्वत:ला ताजातवाणा करु शकतो. असे केल्यास तो प्रकाश आणि शांतिच्या वातावरणाने भरुन जाईल. तो शारीरिक व मानसिक दोन्ही शक्तिंनी भरुन जाईल. त्याचा तो उपहार असेल त्याचे जीवन सुगंध पसरेल आणि अशी ईश्वरी शक्ति प्रगट करील की ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल.MHMar 27.2

    *****