Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २४—मांसाहार

    “परंतु सुरुवातीपासून असे नव्हते.”MHMar 237.1

    सुरुवातीला मानवाला जे भोजन दिले होते त्यामध्ये मांसाहाराचा समावेश नव्हता. जलप्रलयानंतर पृथ्वीवरील हिरवळ नाहीशी झाली. तोपर्यंत मनुष्याला मांसाहार करण्याची परवानगी नव्हती.MHMar 237.2

    एदेन बागेमध्ये मनुष्याच्या भोजनासाठी जी निवड होती ती परमेश्वराने दाखविली होती की मानवासाठी सर्वोत्तम आहार काय होता. जेव्हा इस्राएल लोकांना आहाराविषयी शिकविले, देवाने इस्राएल लोकांना मिसरदेशातून बाहेर काढले आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य स्वतःकडे घेतले म्हणजे तो त्यांना स्वतःची प्रजा बनवणार होता. त्यांच्याकरवी तो जगाला शिकविणारे आणि आशिर्वाद देण्याची त्यांची इच्छा होती. या उद्देशाने त्याने त्यांना सर्वात उत्तम भोजन स्वर्गीय मान्ना दिला. परंतु इस्राएल लोकांच्या कुरकुरीमुळे थोडा काळ त्यांना मांस खाण्याची अनुमती देण्यात आली. यामुळे हजारो लोक आजारी पडले आणि त्यांना मृत्यु आला. परंतु तरीही लोकांना शाकाहार आवडला नाही. याविषयावर नेहमी कुरकुर आणि असंतोष चालूच राहिला. कारण त्यांना मनापासून शाकाहाराचा स्वीकार केला नाही.MHMar 237.3

    कनान देशामध्ये त्यांचे वास्तव्य झाल्यानंतर इस्राएल लोकांना मांसाहार करण्याची अनुमती देण्यात आली. परंतु त्याविषयी काही सावधगिरी आणि काही गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला. यामुळे काही प्रमाणात वाईट परिणामांपासून मानवाचा बचाव करणे शक्य झाले होते. डुकराचे मांस खाणे निषिद्ध करण्यात आले. तसे इतरही काही पशूपक्षांचे मांस खाण्यासाठी देवाने मनाई केली कारण ते अपवित्र असे मानले गेले होते. जे मांस खाण्याची परवानगी दिली त्यामध्ये रक्त आणि चरबीचा समावेश नसावा अशी सूचना देण्यात आली असा इशारा देण्यात आला होता.MHMar 237.4

    जे पशू उत्तम अवस्थेमध्ये असतात केवळ ते मांस खावे जे पशू आपोआप मरण पावले किंवा हिंस्त्रपशुंनी त्यांना फाडले असेल ते खाऊ नये. किंवा रक्तासहित मांस खाऊ नये.MHMar 237.5

    स्वर्गाच्या दारात त्यांचा ठरविलेला आहाराची योजना डावलल्याने इस्राएल लोकांना खूप कष्ट उचलावे लागले. त्यांनी मांस खायला मागितले व त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. परमेश्वराच्या पातळीपर्यंत पोहोचणे आणि त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मुकले होते. “परमेश्वराने त्यांच्या मागणीप्रमाणे दिले पण त्यांचा जीव झुरणीस लावला.” (स्तोत्र १०६:१५). त्यांना जगिक वस्तुंना स्वर्गातील वस्तुंना तुच्छ लेखिले. आणि ज्या आत्मिक गोष्टींकडे प्रभु त्यांना घेऊन जाऊ इच्छित होता. ते त्यांना प्राप्त करता आले नाही.MHMar 238.1