Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    परमेश्वराचा स्वभाव ख्रिस्तामध्ये दिसून आला

    “परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरुन नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टि लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे” (लूक ४:१८). “परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे” (यशया ६१:२).MHMar 327.1

    “मी तर तुम्हांस सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो. आणि नीतिमानावर आणि अनीतिमानावर पाऊस पाडितो” (मत्तय ५:४४-४५). “जैसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा” (लूक ६:३६).MHMar 327.2

    “आपल्या देवाच्या परम देयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदय प्रकाश वरुन आमच्याकडे येईल. यासाठी की, त्याने अंधारात व मृत्यु छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गाला लावावे.” (लूक १:७८-७९).MHMar 327.3