Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३२—बालक

    जे बालक निर्माण होणार आहे त्याच्यासाठी आम्ही काय काय करावे ते
    आम्हास शिकवा

    केवळ मातांनाच नाही परंतु त्यांच्या सवया आणि बालकांच्या शिक्षणाविषयीसुद्धा स्वर्गदूतांनी इब्री माता पित्यांना निर्देशन केले होते. एवढेच पुरे नव्हते की इस्राएलांची सुटका करणारे बालक शमशोनाला त्याच्या जन्माच्यावेळी एक चांगला वारसा मिळेल. याकडे लक्षपुर्वक शिक्षणाकरवी लागू करायचे होते. बालकाच्या अवस्थेमध्ये संयमाची कडक शिस्त लावायची होती.MHMar 292.1

    बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयीसुद्धा अशाचप्रकारचे निर्देश दिले गेले होते. बालकाच्या जन्माअगोदरच त्याच्या पित्याला स्वर्गातून तशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. कारण तो प्रभुच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. (लूक १:१४) उध्दारकर्त्याने घोषित केले की स्वर्गामध्ये महान व्यक्तिंच्या यादीमध्ये लिहिल्या गेलेल्या नावांच्या यादीमध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे नाव सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा कोणी महान नाही. त्याला जे काय दिले होते त्यासाठी शारीरिक शक्ति आणि सहनशीलतेबरोबरच बुद्धी आणि आत्म्याच्या सर्वोच्च गुणांची सुद्धा गरज होती. या कार्याच्या तयारीसाठी शारीरिक शिक्षण इतके महत्वाचे होते की बालकासाठी आईच्या व पित्याच्या निर्देशनासाठी स्वर्गाचे मार्गदर्शनाची गरज होती. आणि ते त्यांना मिळाले होते. इब्री मुलांना शिक्षणाच्या संबंधाने जे निर्देश दिले होते. ते आम्हाला शिकवितात की जे काय बालकांच्या विकासासंबंधी आहे यामध्ये कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात नाही. यामध्ये काहीच व्यर्थ नसते. प्रत्येक प्रभाव जो मुलांच्या शारीरिक आरोग्याला प्रभावित करतो.MHMar 292.2

    मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर अधिक जोर देणे आवश्यक आहे. नंतरच्या वर्षांमध्ये दिलेले धडे व शिक्षणाऐवजी बालपणी दिलेले शिक्षण व धडे हे त्यांच्या पुढील सर्व जीवनभर साथ देईल. एवढेच नाही तर त्यांचे चारित्र्यही बनते.MHMar 293.1

    आईबापांनी याविषयी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांना मुलांची काळजी व शिक्षणाच्या संबंधामधील सिद्धांताकडे लक्ष देऊन समजून घ्यावे. त्यांना आपल्या मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक व आत्मिक आरोग्याची देखरेख करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांनी नैसर्गिक सिद्धांत हे विषय शिकणे आवश्यक आहे. मानवी शरीराविषयी त्यांनी योग्य ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यांनी विभिन्न इंद्रियांची कार्य आणि एकमेकांवर अवलंबूम राहण्याची कार्ये समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी मानसिक शक्ती आणि शारीरिक शक्तिविषयींचे कार्य याविषयी योग्य काय आहे हे समजणे आवश्यक आहे. या तयारीविना मुलांचे आईबाप बनणे पाप आहे. एवढेच नाही परंतु सभ्य देशांमध्येसुद्धा मृत्यु, आजार आणि दुर्बलता ही आजही आहेत. यांची कारणे समजण्यासाठी अति कमी लक्ष दिले जाते. मानवाचा तीव्रगतीने हास होत आहे. एक तृतिअंश मुले बालपणामध्येच मरण पावतात. आणि जे तरुण होतात त्यांना अनेक प्रकारचे रोग होऊन अकाली मरण पावतात. त्यांच्यापैकी अति कमी लोकच वृद्धत्वापर्यंत जातात. मनुष्यजातीवर अधिकाधिक येणाऱ्या वाईट गोष्टी म्हणजे रोग आजार आणि नुकसान आगण्यांच्या कारणांना रोखले जाऊ शकते आणि ती कारण रोखण्यासाठी लागणारी शक्ति ही बहुतेक करून मातापित्याच्या हातामध्ये असते. ही काय रहस्यमय शक्ती नाही ज्याकरवी लहान मुले मारली जातात. परमेश्वराची इच्छा नाही की त्यांनी मरावे. परमेश्वर आईवडिलांना मुले अशासाठी देतो की त्यांनी या जगामध्ये आणि येणाऱ्या जगामध्ये सेवा करण्यसाठी उपयोगी व्हावे. जर आईवडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचे कार्य करतील तर जगाचे कितीतर चांगले झाले असते.MHMar 293.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents