Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    नवजात शिशुची कपडे

    मुलांच्या कपड्यांची तयारी करताना फॅशन किंवा आकर्षकतेपेक्षा कपडे आरामदायी व आरोग्यवर्धक असावीत याकडे जास्त लक्ष द्यावे. लहान कपड्यांना सुंदर व आकर्षक बनविण्यामध्ये आईने जास्त वेळ घालवू नये. कारण या अनावश्यक कामामुळे आई थकून जाते. यामुळे आई आणि तिचे बाळ दोघांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याउलट तिला प्रसन्न आणि शुद्ध हवेमध्ये हलका व्यायाम करण्याची गरज आहे तिच्या डोळ्यांना थकवा देणारे शिवण किंवा विणकाम तिने करु नये. तिने आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपली जबाबदारी समजून घ्यावी. म्हणजे आपले काम ती यशस्वीपणे पार पाडू शकते. कारण परमेश्वराने तिच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविलेली असते.MHMar 294.2

    मुलांच्या कपड्यांमध्ये उबदारपणा, सुरक्षा आणि आरामदायीपणा असेल तर बाळाची चिडचिडेपणा आणि बेचैनी नाहीशी होईल. यामुळे मुल हसरे खेळकर व आनंदी राहील त्यामुळे त्याचे आरोग्यसुद्धा चांगले राहील. आईलासुद्धा तिच्या बाळाची योग्य काळजी घेण्यामध्ये त्रास, दुःख व कष्ट राहणार नाही. तिला जास्त शक्ती खर्च करण्याची गरज वाटणार नाही.MHMar 294.3

    घट्ट किंवा आवळून बांधलेले बंद किंवा नाड्या यांनी हृदय किंवा फुफ्फुसांच्या कार्यामध्ये बाधा येते म्हणून बाळाला आवळ कपडे कधीच घालू नयेत. शरीराच्या कोणत्याही भागावर कपड्यांचा दाब वाढेल अशी कपडे त्याला घालू नयेत. बाळाची कपडे अशी असावीत की ते मोकळेपणाने सर्व अवयवे व शरीर फिरवू शकेल. सर्वच मुलांची कपडे अशी दिली असावीत की ती शरीराला घट्ट नसावीत व जडही नसावीत. कपड्यांचा भार केवळ त्यांच्या खांद्यावरच असावा.MHMar 295.1

    काही देशातील मुलांचे खांदे आणि इतर भाग उघडे ठेवण्याचा रिवाज आहे. या रिवाजाची आम्ही अधिक कठोरपणे निंदा करू शकत नाही. रक्तप्रवाह केंद्रापासून दूर असणाऱ्या अवयवांना अधिक सुरक्षिततेची गरजMHMar 295.2

    आहे. शरीराच्या दूरच्या अवयवांच्या रक्तवाहिन्या मोठ्या असतात. या रक्तवाहिन्या योग्य प्रमाणात रक्त आणि पोषक द्रव वाहून नेतात. परंतु जर ही अवयवे असुरक्षित सोडले गेले तर ते कापडाने झाकले जात नाहीत. असे केले तर रक्तवाहिन्या आखडल्या जातात. शरीरातील संवेदनशील भाग थंड पडतात. आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात.MHMar 295.3

    वाढ होणाऱ्या प्रत्येक मुलांच्या संपूर्ण आणि शारीरिक विकासासाठी सर्व नैसर्गिक शक्तिंचा लाभ घेणे गरजेचे आहे. जर शरीराची सर्व अवयव सुरक्षित नसतील मुलांनी त्यांना जो ऋतु समस्यादायक होत असेल तर त्यांनी बाहेर पडू नये विशेषतः मुलींनी म्हणून थंडीच्या दिवसात त्यांनी घराबाहेर जाऊ नये. जर त्यांनी चांगली कपडे घातली असतील तर त्यांना बाहेर जाऊन मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करु शकतात. MHMar 295.4

    ज्या मातांना आपली मुले आरोग्यदायी असावीत त्यांनी आपल्या मुलामुलींना योग्य कपडे घालून बाहेर खेळण्यासाठी पाठवावीत. त्यांना तसे प्रोत्साहन द्यावे. यासाठी त्यांनी खेळण्यासाठी योग्य ती कपडे द्यावीत मग तो मुलगा असो किंवा मुलगी.MHMar 295.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents