Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३९—परमेश्वराच्या वचनाकरवी ज्ञान प्राप्त करणे

    “तुझे वचन उघडल्यावर प्रकाश होतो.आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त होते...”

    संपूर्ण पवित्रशास्त्र येशू ख्रिस्ताकरवी परमेश्वराचा महिमा प्रगट करतो. पवित्रशास्त्र येशू ख्रिस्ताकरवी परमेश्वराचा महिमा प्रगट करतो. याचा स्वीकार केला. विश्वास केला आणि त्याचे पालन केले तर स्वभावामध्ये परिवर्तन करण्यासाठी ते एक शक्तिशाली साधन आहे. ते एक महान प्रेरणादायी आणि आकर्षकपणे देणारे बळ आहे ते शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्ति जागृत करुन जीवनाच्या योग्य मार्गावर मार्गदर्शन करते.MHMar 361.1

    तरुण आणि प्रौढ पाप आणि परीक्षेत फार लवकर आकर्षित होतात त्याचे कारण म्हणजे ते परमेश्वराच्या वचनाचे म्हणावे तसे अध्ययन करीत नाहीत आणि मनन करीत नाहीत. जीवन आणि स्वभावामध्ये दृढ आणि निश्चित इच्छा शक्तिची कमतरता अशासाठी दिसते की परमेश्वराच्या वचनातून चुकीचे अध्ययन केले जाते. ते गंभीरपणे आपले अशुद्ध आणि अपवित्र विचारांना बदलून शुद्ध आणि पवित्र विचारांकडे वळविण्यात यशस्वी होत नाहीत. अनेक लोक असे आहेत जे चांगल्याची निवड करतात, परंतु यांची सुख्या थोडी असते. जे उत्तम तेच निवडतात. जो कोणी नेहमी येशूच्या चरणाजवळ बसतात जशी मरीया स्वर्गीय गुरुपासून शिकण्यासाठी त्याच्या पायाशी बसली होती. अति थोडे लोक आहेत जे परमेश्वराचे वचन आपल्या अंत:करणात ठेवतात आणि व्यवहारामध्ये वापरतात.MHMar 361.2

    बायबलचे सत्य जेव्हा स्वीकारले जाते तेव्हा ते हृदय आणि मनाला उत्तेजित करते. जर परमेश्वराच्या वचनाची तशी प्रशंसा केली जात आहे जशी करायला हवी. तरुण आणि वृद्धांच्या हृदयामध्ये इमानदारी आणि शक्ति प्राप्त होते की सर्व प्रकार परीक्षांचा ते तोंड देऊ शकतात. पवित्रशास्त्रातील अनमोल वचने वाचावित व त्यावर मनन करावे लिहावीत आणि त्या ज्ञानाचे विचार करावेत. त्या ज्ञानाचे सामर्थ्य डोक्यामध्ये ठेऊन त्याप्रमाणे आचरण करावे. मानवाने आपल्या सर्व शक्तिचा वापर करुन त्याचा अभ्यास करावा. मनुष्याच्या कल्पनेवर नाही परंतु परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करुन त्या सत्य ज्ञानावर विचार सर्व शक्तिनीशी करावा. इतर कोणतेच साहित्य देवाच्या पवित्र वचनाची तुलना करु शकत नाही.MHMar 361.3

    जगिक बुद्धीला परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये मुळीच आनंद वाटत नाही. परंतु जी बुद्धी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परिवर्तीत झाली आहे त्याच्यावर पवित्र पृष्ठांनी स्वर्गीय सौंदर्य आणि स्वर्गीय प्रकाश चमकतो. जगिक बुद्धीला जे वचन उजाड रानासारखे वाटते तर आत्मिक विचार करणारांना परमेश्वराचे वचन एक जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे वाटते. परमेश्वराचे ज्ञान जसे त्याच्या वचनामध्ये प्रगट झाले आहे. जीवनाच्या पाण्याच्य झऱ्याचा तो एक देश बनतो.MHMar 362.1

    परमेश्वराचे ज्ञान जसे त्याच्या वचनामध्ये प्रकट केले आहे तेच ज्ञान आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे. मुले जशी मोठी होतील विचार करणं आणि समजून घेण्यास शिकतील त्यांना येशूचे नाव आणि त्याच्या कार्याची ओळख करुन देणे आवश्यक आहे. त्यांना पहिला धडा हाच शिकविला पाहिजे की परमेश्वर त्यांचा पिता आहे. त्यांचे पहिले प्रशिक्षण असे असेल की त्यांनी प्रेमाने आज्ञापालन करावे. परमेश्वराचे वचन हे मोठ्या आदराने आणि लीनपणे वाचावे. ते वचन असे असावे की त्याची पुनरावृत्ति व्हावी. मनामनामध्ये परत परत वाचावे त्यामध्ये त्यांना रुचि असावी. आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराने ख्रिस्ताकरवी आपली प्रीति मानवावर प्रगट केली आणि त्याच्या करवीच त्याने लोकांना शिक्षण दिले.MHMar 362.2

    “प्रिजयन हो, देवाने आपल्यावर जर अशाप्रकारे प्रीति केली तर आपणही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” (१ योहान ४:११).MHMar 362.3

    तरुण लोक परमेश्वराच्या वचनाला त्यांची बुद्धीला भोजना समान समजायला हवे आणि प्राणापेक्षा प्रिय मानावे ख्रिस्ताचा वधस्तंभ त्यांच्या अध्ययनाचा विषय असावा. सर्व व प्रशिक्षणाचा मुख्य केंद्र भाग असावा. प्रत्येकाच्या रोजच्या जीवनामध्ये दैनिक व्यवहारामध्ये ख्रिस्ताच्या शिकवणीचा प्रभाव दिसणे आवश्यक आहे. अशाप्रकारे मुक्तिदाता ख्रिस्त तरुणाचा मित्र व साथीदार असावा. प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञाकारी असावा. प्रेषित पौलाविषयी असे म्हटले जो तकी, “आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळला आहे व मी जगाला वधस्तंभाला खिळलेला आहे.” (गलती ६:१४). अशाप्रकारे विश्वासाकरवी ते आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये परमेश्वराच्या ज्ञानाचे शिक्षण घेतील. ते स्वतः परमेश्वराच्या ज्ञानाचा अनुभव घेतील आणि त्याची वास्तविकता जाणून घेतात. त्यांना अनुभव घेतला की ख्रिस्त भला व चांगला आहे.MHMar 362.4

    प्रिय योहानाने आपल्या स्वत:च्या अनुभवाने नाव प्राप्त केले होते. तो साक्ष देऊ शकला. “जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो वे सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांस प्रगट झाले ते तुम्हास कळवितो ते अशासाठी की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.” (१ योहान १:१-३).MHMar 363.1

    अशाप्रकारे प्रत्येकजण आपल्या अनुभव या गोष्टीवर शिक्कामोर्तब करु शकतात, ते म्हणजे ” देव सत्य आहे.” (योहान ३:३३). अशाप्रकारे त्याने जे काय ख्रिस्ताच्या शक्तिविषयी पाहिले, ऐकले आणि पारखले त्याविषयी तो स्वतः साक्ष देऊ शकतो. मला सहाय्याची गरज होती आणि हे सहाय्य मी येशूकडून प्राप्त केले होते. प्रत्येक गरज पूर्ण केली होती. माझ्या आत्म्याची तृप्ती केली. माझ्यासाठी बायबल परमेश्वराचे प्रकाशन आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो कारण माझ्यासाठी तो स्वर्गीय मुक्तिदाता आहे मी पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवतो कारण मी त्यामध्ये परमेश्वराचा आत्माचा आवाज ऐकला.MHMar 363.2

    ज्याने वैयक्तिक अनुभवा करवी परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करुन घेतले आहे आता तो नैसर्गिक ज्ञान घेण्यास तयार आहे. ख्रिस्ताविषयी असे लिहीले आहे. “त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.” (योहान १:४).MHMar 363.3

    जगामध्ये पापाचा प्रवेश होण्याआधी एदेन बागेत आदाम आणि हवेभोवती स्वच्छ व सुंदर प्रकाश होता आणि तो प्रकाश परमेश्वराचा प्रकाश होता. ते ज्या वस्तुजवळ जात ती वस्तु त्यांच्यामुळे प्रकाशित होत होती. परमेश्वराचा स्वभाव आणि त्याचे कार्य व त्याच्या प्रकाशापासून कोणतीच वस्तू लपू शकत नाही, परंतु जेव्हा आदाम व हवेने पाप केले तेव्हा त्यांच्याभोवती असणारा प्रकाश त्यांना सोडून गेला. पवित्रतेची वस्त्रे सोडून गेल्यामुळ त्यांनी प्रकाशसुद्धा हरविला. MHMar 363.4

    आता ते निसर्गाला योग्यप्रकारे ओळखू शकत नव्हते. आता ते परमेश्वराचे कार्य व स्वभाव ओळखू शकत नव्हते. अगदी त्याच प्रकारे आज ही मनुष्य परमेश्वराचा स्वभाव व त्याचे कार्य ओळखू शकत नाही. जोपर्यंत स्वर्गीय बुद्धी मनुष्याचे मार्गदर्शन करीत नाही तोपर्यंत मनुष्याला परमेश्वराचा स्वभाव समजणार नाही हेच कारण आहे की वैज्ञानिक ज्या परमेश्वराने निसर्ग निर्मिती केली त्याला सोडून ते निसर्गालाच जास्त महत्त्व देतात. म्हणूनच ते परमेश्वराच्या वचनाला विरोध करतात, परंतु जे लोक ख्रिस्ताच्या प्रकाशाचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी निसर्ग प्रकाशित होतो. वधस्तंभावर प्रकाशणाऱ्या प्रकाशामध्ये आम्ही निसर्गाचे शिक्षण योग्य पद्धतीप्रमाणे समजतो. जो कोणी वैयक्तिकपणे अनुभवा करवी परमेश्वर आणि त्याच्या स्वर्गीय वचन असण्यामध्ये मुळीच संशय नाही. त्याने जाणले आहे की परमेश्वराचे वचन सत्य आहे आणि त्यांना ठाऊक आहे की सत्य कधीही आपला विरोध करीत नाही. जो बायबलला मनुष्याच्या वैज्ञानिक विचाराशी कधीही तुलना करीत नाही. त्याला ठाऊक आहे की विज्ञानासमोर परमेश्वराचे ज्ञान कधीच खोटे ठरु शकत नाही. कारण दोन्हीचा सृष्टीकर्ता व निर्माता एकच आहे. कारण विज्ञान हे केवळ मानवी ज्ञान आहे.MHMar 364.1

    अशा विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक संशोधनात्मक विचार आणि विस्तृत क्षेत्र उघडले जाईल. जेव्हा तो नैसर्गिक वस्तूंचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये सत्याची एक नवी समजूत उघडली जाते. निसर्गाचे पुस्तक आणि लिहीलेली वचने हे दोन्ही एकमेकांवर प्रकाश टाकतात. परमेश्वराचा स्वभाव व त्याचे नियम त्याद्वारेच परमेश्वराचे कार्य होते आणि या शिक्षणाकरवीच परमेश्वर व त्याच्या प्रेमाची खरी ओळख होते. स्तोत्रसंहितेचा लेखक व त्याचा अनुभवच याकरवीच सर्व काही समजून येते. ज्याला निसर्ग आणि प्रकाशनाकरवी परमेश्वराचे वचन प्राप्त होते, तो म्हणतो -MHMar 364.2

    “कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करितो. (स्तोत्र ९२:४). “हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहे हे परमेश्वरा तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाल करतोस, हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे मानवजाति तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करिते.” (स्तोत्र ३६:५-७).” कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.” (स्तोत्र ३६:९).MHMar 364.3

    “जे आपले वर्तन चोख ठेऊन परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य जे त्याचे नियम पाळून अगदी मनापासून त्याचा शोध घेतात ते धन्य.” (स्तोत्र ११९:१-२).MHMar 365.1

    “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील ? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.” (स्तोत्र ११९.९).MHMar 365.2

    “मी सत्याचा मार्ग निवडिला आहे. मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेविले आहेत.” (स्तोत्र ११९:३०).MHMar 365.3

    “मी तुझ्याविरुद्ध पाप करु नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.” (स्तोत्र ११९:११).MHMar 365.4

    “तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.” (स्तोत्र ११९:१८). MHMar 365.5

    “तुझे निर्बंध आनंददायी आहेत व ते माझे मंत्री आहेत. (११९:२४).MHMar 365.6

    “मी राजरोसपणे चालेन, कारण मी तुझ्या विधांचा आश्रय केला आहे.’ (११९:४५).MHMar 365.7

    “माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गोतरुप झाले आहेत.” (स्तोत्र ११९:४४).MHMar 365.8

    “सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे.” (स्तोत्र ११९:७२). “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे.” (स्तोत्र ११९:९७). “तुझे निबंध आश्चर्यकारक आहेत म्हणून माझा जिव ते पाळीतो.” (स्तोत्र ११९:१२९). MHMar 365.9

    “तुझे वचन अगदी शुद्ध आहे. ते तुझ्या दासाला अगदी प्रिय आहे.” (स्तोत्र ११९:१ ६०).MHMar 365.10

    “माझा जीववाचो, म्हणजे तो तुझी स्तुति करील, तुझे निर्णय मला सहाय्य करो.” (स्तोत्र ११९:१७५).MHMar 365.11

    “तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तोत्र १९९:१६५). “माझा जीवन तुझे निबंध पाळितो व ते अत्यंत प्रिय आहेत.” (स्तोत्र ११९:१६७).MHMar 365.12

    “तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.” (स्तोत्र ११-९:१३०).MHMar 366.1

    “दर्जन माझा नाश करावयास टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन.” (स्तोत्र ११९:९५).MHMar 366.2

    “वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते. कारण मी तुझे विधी पाळितो.” (स्तोत्र ११९:१ ००).MHMar 366.3

    “तुझ्या विधीच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करितो.” (स्तोत्र ११९:१०४).MHMar 366.4

    “तुझे निबंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.” (स्तोत्र ११९:१११).MHMar 366.5