Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३०—घराची निवड आणि तयारी

    “यहोवाने एदेनामध्ये बाग लावली
    आणि आदमाला तेथे ठेवले”

    सुसमाचार हे जीवनाच्या समस्यांचे अद्भूत प्रकारे समान ध्यान करते. याच्या निर्देशाकडे लक्ष दिल्यास कठीण समस्या सोप्या होतील आणि अनेक चुकांपासून आपणास सुरक्षित करील. काही योग्य गोष्टींचे योग्य मोल करण ठरले जाईल. सर्वात मौल्यवान वस्तू टिकावू होतात. त्यांच्यासाठी जास्त परिश्रम करावे लागते. ज्यांच्यावर घराची निवड करण्याची जबाबदारी आहे त्यांना शिक्षणाची गरज आहे. त्यांना स्वत:ला त्यांच्या लक्ष्यावरुन आपले लक्ष ढळू द्याचे नाही. त्यांना लक्षात ठेवावे की पृथ्वीवरील त्यांचे घर हे स्वर्गीय घराचा एक नमूना आहे आणि स्वर्गीय घरासाठी तयारी करण्याचे ठिकाण आहे. जीवन ही एक शिक्षण घेण्याची शाळा आहे. ज्यामध्ये माता-पिता आणि मुले परमेश्वराचे स्वर्गीय निवासस्थान स्वर्गीय शाळेत प्रवेश घेण्याची तयारी करीत आहेत. जेव्हा घर तयार करण्यासाठी जागा शोधली जाते तेव्हा निवड करण्याच्या वेळी आपला हेतु लक्षात ठेवणे आवश्यक आहे. धन, फॅशन किंवा समाजाच्या रीतिरिवाजामध्ये गुंतून राहू नका विचार करा की सरळ मार्ग शुद्धता, आरोग्य आणि वास्तविक मुल्यामध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट आहे.MHMar 282.1

    जगभरामध्ये शहरे वाईटांची केंद्रे बनली आहेत. सर्वत्र वाईट दृष्य आणि आवाज आहेत. प्रत्येक ठिकाणी वायफळ खर्च आणि लैंगिकता वाढत आहे. भ्रष्टाचार, अपराध व गुन्ह्यांच्या लाटा सतत उठत आहेत. दर दिवशी हिंसाचार, मारामाऱ्या, खून, आत्महत्या, अत्याचार अशा अपराधांच्या बातम्या येतच असतात.MHMar 282.2

    शहरातील जीवन खोटे आणि बेगडीपणाचे आहे संपत्ती मिळविण्याची तीव्र लालसा, उत्तेजन आणि आनंद शोधण्याच्या मृगजलामागे लोक धावत आहेत. विलासी जीवन वायफळ खर्च यामागे अनेकजण धावत आहेत. ही संख्या भयंकर मोठी आहे आणि असे लोक वास्तव जीवनापासून भरकटत जात आहेत. हजारो वाईट गोष्टींसाठी दरवाजे उघडले जात आहेत. तरुणांवर या गोष्टींचा असाच प्रभाव पडत आहे आणि ते त्यामध्ये वाहवत चालले आहेत कारण प्रतिकार करणे कठीण आहे.MHMar 282.3

    शहरांमध्ये मुले आणि तरुणांवर आकर्षकतेचा व पैशाचा मोह, भरपूर सुट्ट्या असतात. खेळ व मनोरंजनाच्या हजारो गोष्टी हजारो लोकांना याकडे आकर्षण असते. मनोरंजन आनंद, सुख चैन या गोष्टीमुळे जीवानातील गांभीर्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. सुखा चैनीकडे लक्ष लागले असल्यामुळे स्वत:ची व इतरांची जबाबदारी ते विसरुन गेले आहेत. जो पैसा चांगल्या कार्यासाठी खर्च केला जाऊ शकतो तो वायफळ गोष्टींसाठी वापरला जातो. MHMar 283.1

    व्यापारी संघटना, मजदूर संघटना त्यांचे संप, महागाई अशा गोष्टींमुळे शहरी जीवन कठीण झाले आहे. आमच्यासमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही कुटुंबांना या सर्व समस्यांमुळे शहरामधून बाहेर जाणे गरजेचे ठरले आहे.MHMar 283.2

    शहरातील वातावरण आरोग्यासाठी अति धोकादायक झाले आहे. सतत आजारी पडण्याचे भय, हवा, पाणी प्रदुषण वाढतच आहे. भोजनसुद्धा प्रदुषित झाले आहे. त्याचबरोबर चोऱ्या लबाड्या फसवणूक याही गोष्टी आहेतच आणि गर्दीच्या ठिकाणी साथीचे आजार होतात अशा सर्व प्रकारच्या गोष्टींना सामना करावा लागतो.MHMar 283.3

    परमेश्वराचा उद्देश असा नव्हता की मानवाने गर्दी करुन राहावे. एकावर एक घरे बांधून राहावे. सुरुवातीला त्याने मानवाला सुंदर दृष्य मधूर नैसर्गिक संगीताच्या व निसर्गाच्या सान्निध्यात ठेवले होते. त्याची इच्छा आहे की आपण आजसुद्धा तसल्या प्रकारच्या वातावरणामध्ये राहावे. आपण परमेश्वराच्या योजनेच्या जितके जवळ जाऊ तितके आपले शरीर, मन व प्राण आरोग्यदायी जीवन मिळविण्यासाठी आपली स्थिति उत्तम राहील.MHMar 283.4

    एक महागडे घर, शानदार सजावट, दिखाऊपणा, चैन व आराम असले जीवन आरोग्य प्राप्ति करुन देत नाही. मनुष्यामध्ये सर्वात महान कार्य करण्यासाठी या जगात येशू आला. तो एक परमेश्वराचा दूत बनून मनुष्याचे आपले जीवन कसे जगावे हे शिकविण्यासाठी आला सार्वकालिक पित्या करवी त्याच्या पुत्रासाठी त्याने महान कार्य करण्यासाठी या जगात येशू आला. तो एक परमेश्वराचा दूत बनून मनुष्याने आपले जीवन कसे जगावे हे शिकविण्यासाठी आला सार्वकालिक पित्याकरवी त्याच्या पुत्रासाठी त्याने महान कार्य दिले होते तो देवाचा पुत्र गालीलाच्या डोंगरावर एकांत घरामध्ये सन्मानीत जीवन जगला. रोजच्या कठीण समस्या शारीरिक कष्ट, संघर्ष, आत्मत्याग, त्रास या सर्वांशी संघर्ष करीत जनसेवा करण्याचे कार्य केले त्यामध्ये त्याला आनंद वाटत असे. आपल्या आई शेजारी बसून धर्मशास्त्राच्या गोष्टी, त्यांची शिकवण त्या शांत वातावरणामध्ये सकाळ-संध्याकाळी धर्मशास्त्राच्या प्रत्येक पानाचे अध्ययन करणे. हिरव्या निसर्गात पित्याशी हितगुज (प्रार्थना) करणे त्याच्या सान्निध्यात राहणे ही येशूची रोजची सुरुवात असे त्याच्यासाठी हे सुअवसर असे होते.MHMar 283.5

    सर्व युगांमध्ये सर्वांत चांगल्या सज्जन लोकांमधून बहुतेक लोक अशाच मोकळ्या वातावरणामध्ये राहत होते. आब्राहाम, याकोब, योसेफ, मोशे, दावित, एलिया यांचा इतिहास वाचा. नंतरच्या वर्षातील लोकांच्या जीवनाविषयी अभ्यास करा. ज्या लोकांचा जगाच्या विकासाचा प्रभाव सर्वाधिक होता. ज्यांनी योग्यप्रकारे विश्वास आणि जबाबदारीच्या पदाची शोभा वाढविली. यांच्यापैकी किती लोक खेड्यातील घरामध्ये जन्मली व तेथेच त्यांचे जीवन व्यतीत झाले ? भोगविलास व चैन बाजी विषयी ते अति कमी जाणत होते. त्यांनी आपले तारुण्य जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी खर्च केले नाही, परंतु यापैकी अनेक जणांना गरीबी आणि खडतर जीवनाशी संघर्ष करावा लागला. कमी वयातच त्यांना कामे करावी लागली. मोकळ्या हवेमध्ये मेहनत व कष्ट करुन त्यांनी आपली शरीरे काटक व कणखर बनविली होती. आपल्या उद्देशावर अवलंबून राहण्यासाठी अनेक कठीण समस्यांना त्यांनी तोंड दिले. मध्ये येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यास ते शिकले. यामुळे त्यांना धाडस आणि गंभीरता प्राप्त झाली. त्यांनी आत्मनिर्भरता आणि आत्मसंयमाचे धडे शिकून घेतले होते. सर्वप्रकारचे वाईट मोहापासून व तशा मित्रांपासून ते दूर राहिले. त्यांनी निसर्गाचा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. आपल्या पसंती आणि सवयांवर त्यांचे नियंत्रण होते. सिद्धांताकरवी नियंत्रित झाल्यामुळे ते निष्कलंक बलवान आणि आपल्या ध्येयावर अटळ राहिल्यामुळे ते वाढत गेले. जेव्हा त्यांना जीवनाच्या कार्यासाठी पाचारण करण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्या कामात शारीरिक व मानसिक शक्ति, प्रफुल्लता, योजना तयार करण्यासाठी आणि वाईट अडथळ्यांशी दोन हात करण्याची त्यांची नेहमी तयारी असते. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी एक सकारात्मक शक्ति बनविलेली असते.MHMar 284.1

    संपत्ती व धना ऐवजी जर कोण आपल्या मुलांना काही देऊ शकेल तर ते आहे निरोगी शरीर, उत्तम बुद्धी, सकारात्मक व चांगले विचार, उत्तम संस्कार व चारित्र्याचे पारितोषिक देऊ शकतात. जे लोक जीवनातील योग्य यश व सफलतेचा अर्थ समजतात ते योग्यवेळी आपल्या बुद्धीचा वापर करतील. आपल्या घराची निवड करताना मनामध्ये सर्वोत्तम गोष्टी आणतील. जेथे केवळ वाईट विचार मनात येतात. जेथे भ्रम, थकवा, अशांती निर्माण होते अशा ठिकाणी जा जेथे परमेश्वराचे कार्य दिसून येईल. निसर्गाची शांति, सुरक्षा, सुंदरता आणि एकांत ठिकाणी विश्रांतीचा शोध घ्या. आपले डोळे, निसर्ग, हिरवीगार शेते फुलांच्या बागा आणि डोंगर पाहू द्यात. शहरातील धुर, धूळ आणि प्रदुषित हवेपेक्षा निसर्गातील निरभ्र आकाश स्वच्छ वातावरण व डोंगर झाडी पाहा. स्वच्छ व शुद्ध हवेत श्वास घ्या शहरातील बेगडी आकर्षण आणि प्रदुषित वातावरणातील हवेपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात जा. तेथे तुम्ही आपल्या मुलांना, पत्नीला भरपूर वेळ देऊ शकाल. तेथे तुम्ही आपल्या मुलांना परमेश्वराचे कार्य व त्याच्या प्रीतिविषयी सांगू शकाल. त्यांना परमेश्वराचा विश्वास, त्याची दया आपल्या मुलांना शिकवा.MHMar 285.1