Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १६—आजाऱ्यासाठी प्रार्थना

    पवित्र शास्त्र सांगते की, “त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये” (लूक १८:१). आणि त्यांना प्रार्थनेची गरज असते ती त्यावेळी जेव्हा त्यांची शक्ति क्षीण होते व जीवाची दोरी त्यांच्या हातातून निसटत आहे. अशावेळी जे लोक निरोगी असतात आणि त्यांच्यावर परमेश्वर कृपेने वर्षानूवर्षे निरोगीपणाच्या आशीर्वाद असतो. परंतु त्या परमेश्वराचे ते कधी उपकार मानत नाहीत ते त्याला विसरुन जातात. परंतु जेव्हा आजारी पडतात तेव्हाच त्यांना परमेश्वराची आठवण होते. जेव्हा मानवाची शक्ति कमकुवत होते तेव्हा त्यांना स्वर्गीय शक्तिची याचना करतात आणि तेव्हा आपला करुणाकर त्यांना कधी निराश करीत नाही. जे विश्वासाने त्याच्याकडे सहाय्य मागतात तो आजार आणि आरोग्य या दोन्हीमध्ये आहे.MHMar 172.1

    “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करितो. कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१३-१४).MHMar 172.2

    “मूर्त्यांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्टकृत्यांमुळे पीठा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. ते मृत्युदारापर्यंत पोहोचतात.” (स्तोत्र १०७:१७-१८).MHMar 172.3

    “ते संकट समयी परमेश्वराचा धावा करितात आणि तो त्यांस क्लेशातून मुक्त करितो. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करितो नाशापासून त्यांचा बचाव करितो.’ (स्तोत्र १०७:१९-२०).MHMar 172.4

    आजही परमेश्वर अगदी तशाच प्रकारे आजारी लोकांना बरे करण्यासाठी उत्सुक आहे. जसे त्या काळी पवित्र आत्म्याने स्तोत्रकर्त्यांच्या मुखी हेMHMar 172.5

    तो आपली सेवा करीत होता प्रत्येक रुग्णाला तो बरे करीत होता त्यांचा त्याला कळवळा येत होता. तसाच आताही येतो. त्याच्याजवळ प्रत्येक रोगाचे उपचार करण्याची शक्ति आहे. त्याचे अनुयायी आजही रुग्णांसाठी प्रार्थना करु शकतात जसे त्याचे शिष्य करीत होते. त्यांच्या प्रार्थनेमुळे रुग्ण बरे होत होते. “विश्वासाची प्रार्थना दुखवणाईतास बरे करते.” आमच्याजवळ पवित्र आत्म्याची शक्ति आणि विश्वास आहे. विश्वासाच्या आधारावर आपण आम्ही परमेश्वराच्या प्रतिज्ञोचा दावा करु शकतो. प्रभूचे वचन “ते रुग्णावर हात ठेवतील व ते बरे होतील.” (मार्क १६:१८). आजही तसेच अटळ आहे. जसे प्रेषितांच्या दिवसात होते. परमेश्वराच्या मुलांसाठी ते एक सौभाग्य प्रदान करते आणि आम्हाला विश्वासा करवी ते दृढ धरुन ठेवले पाहिजे. ख्रिस्त आपल्या सेवकांकरवीच कार्य करतो आणि त्यांच्या करवीच रुग्ण बरे होण्याची अपेक्षा करतो हे आमचे कार्य आहे की रोग्यांच्या हाताला धरून त्यांच्यामध्ये विश्वास भरून त्यांना उभे करुन ख्रिस्तापुढे सादर करावे. आम्हाला त्यांना हे शिकवायचे आहे की येशू ख्रिस्त महान वैद्य आहे त्याच्यावरील विश्वासाला धरुन राहा. MHMar 172.6

    मुक्तिदात्याची अपेक्षा आहे की आम्ही त्याचे विश्वासु या नात्याने आजारी लोक आशाहीन आणि दुःखीतांना परमेश्वरावरील विश्वासाला धरुन राहण्याचे शिकवावे. त्याची शक्ति धरून राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. विश्वास व प्रार्थने करवी रुग्णाची खोली बेथेलामध्ये बदलले वचन आणि कार्याद्वारे चिकित्सक व परिचारीकायांच्या प्रेमाच्या शब्दाने त्याचे अस्तित्व रुग्णाला धीर देऊन जाते. त्यांचे शब्द असे असावेत की परमेश्वर या ठिकाणी आहे तो नाश करण्यासाठी नाही परंतु वाचविण्यासाठी आहे आणि रुग्णाचाही विश्वास बसेल की दयाळू मुक्तिदात्याची येथे उपस्थिती आहे आणि तो माझा रोग नाहीसा करुन मला बरे करणारा आहे.MHMar 173.1

    आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकतो. ख्रिस्ताने म्हटले आहे “तुम्ही माझ्या नावाने काही मागाल ते मी देईन.” (योहान १४:१४). तो आणखी म्हणतो “जर कोणी माझी सेवा करील... तर पिता त्याचा आदर करील. (योहान १२:२६). जर आम्ही त्याच्या वचनानुसार जीवन जगलो तर त्याच्या करवी दिली गेलेली प्रत्येक अनमोल प्रतिज्ञा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. तसे पाहता आम्ही त्याच्या दयेच्या योग्यतेचे नाही. परंतु जेव्हा आम्ही आपले जीवन त्याच्या हाती सोपवून देतो तेव्हा तो आमचा स्वीकार करतो. जे लोक त्याला अनुसरतात तो त्यांच्यासाठी व त्यांच्या करवी कार्य करील.MHMar 173.2

    परंतु जर आपण त्याच्या वचनाचे पालन करीत जीवन जगत असू तेव्हाच आम्ही आमच्या जीवनात त्याच्या आज्ञा पालन करण्याचा दावा करु शकू स्तोत्र कर्ता म्हणतो. “माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐको. (स्तोत्र ६६:१८). जर आम्ही शंका घेऊन आणि अपूर्ण मनाने त्याच्या आज्ञांचे पालन करु तर त्याचे वचन आमच्यासाठी पूरे होणार नाही.MHMar 173.3

    रुग्णाने बरे होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्याविषयी परमेश्वराने वचनामध्ये सांगितले आहे परंतु अशी प्रार्थना करणे ही हे एक गंभीर कार्य आहे व अविचारीपणाने यामध्ये हात घालता येत नाही. आजाऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रार्थनामध्ये विश्वासासंबंध येतो आणि पूर्वानुभवाशिवाय हा विश्वास येत नाही. अनेक लोक स्वत:चे लाड करुन स्वत:वर रोग आजार आणतात. त्यांनी आपल्या जीवनाच्या सिद्धांताचे पालन केलेले नसते. दृढतेने पावित्र्याचा वापर केलेला नसतो. पवित्र नियमांचे पालन केलेले नसते. इतरांनी आरोग्य नियमांच्या दृष्टीने खाण्यापिण्याच्या नियमांचे पालन केलेले नसते. आपल्या मन मानेल अशा सवयी सोडलेल्या नव्हत्या म्हणजे आपले शरी मन आणि बुद्धीच्या दृष्टीने काहीना काही तर दोष असतातच. यासाठी शरीर व मनाची दुर्बलता कारणीभूत आहे. काही लोकांना त्याच्या विश्वासाकरवी बरे होण्याचा आशीर्वाद मिळेल. परंतु इतर काही विचार न करताच आपल्या जुन्या संस्कृतिनुसार परमेश्वराच्या नैसर्गिक आणि आत्मिक सिद्धांताचे उल्लंघन करतात आणि आरोग्य हानीकारक असणाऱ्या संवया सोडणार नाहीत संवयीचे लाड करुन त्यामध्ये रममाण होतात आणि अशाप्रकारे पापाला ते उत्तेजन देतात.MHMar 174.1

    जर त्यांना वाईट संवयांपासून सावधगिरीचा इशारा न देता परमेश्वर चमत्कार करुन आजार बरे करतो असे सांगितले तर त्यांचे श्रम व्यर्थ नाते प्रार्थनेमध्ये परमेश्वराचे उतर हवे असेल तर वाईट गोष्टी व वाईट संवयी सोडून द्याण्यालागतील आणि चांगले तेच करण्याची संवय लाऊन घ्यावी त्यांच्या भोवतीचे वातावरण स्वच्छ व शुद्ध आणि त्यांचे जीवन वाईट संवयींपासून दूर असावे. त्यांनी नैसर्गिक आणि आत्मिक अशा दोन्ही रुपामध्ये परमेश्वराच्या नियमांशी ताळमेळ राखावा.MHMar 174.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents