Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्तासारखे शील बनविणें

    ख्रिस्ताचा धर्मं, तो स्वीकारणान्यांना खालच्या पायरीला केव्हाही आणीत नाहीं; तो त्यांना कठोर किंवा निर्दयी, असभ्य किंवा रागिष्ट व कठीण मनाचा बनवीत नाही. उलटपक्षी तो त्याची रूची शुद्ध करतो, त्यांचा सारासार विचार पवित्र करतो व त्यांचे विचार शुद्ध करून त्यांना चालना देतो व ख्रिस्तासाठी त्यांना ताब्यात आणतो. आपल्या मुलांकरता देवाचा दर्जा मनुष्याचे विचारापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यानें आपल्या शीलाचा उतारा आपल्या पवित्र नियमांत दिला आहे. 16T 9, 12;CChMara 139.5

    ख्रिस्ती शीलाचा दर्जा ख्रिस्तासारखा असतो. आमच्यापुढे अखंड प्रगतीचा मार्ग उघडा आहे. आम्हांला उद्दीष्ट व प्रमाण गाठायचे आहे. त्यांत सर्व चागल्या, शुद्ध व श्रेष्ठ आणि थोर अशा गोष्टींचा समावेश होतो. पूर्ण शील प्राप्त करून घेण्यासाठी सततची खटपटे व वाढ असली पाहिजे. 28T 63, 64;CChMara 139.6

    आम्ही आमच्या ज्या प्रकारच्या संवयी असतील त्याप्रमाणे सार्वकाळ राह. ज्यांना चांगल्या सवयी लागल्या आहेत व तें प्रत्येक काम करण्यांत विश्वासू आहेत, तें तेजस्वी प्रकाश बनून इतरांच्या मार्गावर तेजस्वी किरण पाडतील; पण जर अविश्वासूपणाच्या संवया जडल्या असतील व ढिलेपणा, आळस व निष्काळजीपणाच्या संवया वाढत जाण्यास संधि मिळाली असेल तर या जीवितातील वाढीच्या गोष्टीवर मध्यान्हीं काळोखापेक्षा अधिक अधारे ढग येतील आणि भावी आयुष्यापासून व्यक्तीला कायमचे मुकावे लागेल. 3.4T 452; CChMara 140.1

    सार्वकालिक जीवनाच्या शब्दाप्रमाणे जो वागतो तो धन्य आहे. सत्याच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शन झाल्यामुळे तो सर्व सत्यांत जाईल. त्याची जगाकडून स्तुति होणार नाहीं कीं, प्रेम व मान मिळणार नाहीं. पण तो स्वर्गाच्या दृष्टीने मौल्यवान् ठरेल. आपल्याला देवाची मुलें हें नाव मिळाले यांत पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदिन दिले आहे. तें पाहा; यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यानें त्याला ओळखिलें नाहीं. १ योहान ३:१. 45T 439; CChMara 140.2

    आज चैयने जगा CChMara 140.3

    देवाच्या सत्याचा अंत:करणात स्वीकार केल्यावर, तें तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. त्यावर विश्वास ठेवून त्याचे पालन केल्यावर तुम्हांला त्याची कृपा भरपूर मिळून आजचे कार्य व त्रास याकरिता त्याचा उपयोग होईल. उद्याकरिता तुम्हांला दयेची गरज नाही. आजचीच तुम्हांला गरज आहे असें वाटले पाहिजे. आजच विजय मिळवा. आजच स्वनाकार करा; आजच सावध राहून प्रार्थना करा. आजच देवासाठी विजय प्राप्त करून घ्या. आमची परिस्थिती व वातावरण व आमच्या आसपास घडणारे बदल व देवाचे शब्द म्हणजे ज्याकडून सर्व गोष्टी कळून येतात व सिद्ध होतात या सर्वांकडून रोज आम्ही काय करावे यासंबंधाने शिकविण्यास पुरेशा आहेत. ज्याकडून कांहीं फायदा नाहीं अशा गोष्टींत आपले मन गुंतवून त्याला त्रास देण्यापेक्षा तुम्ही रोज पवित्रशास्त्राचा शोध करावा व रोजच्या जीवितातील त्रासदायक वाटणाच्या गोष्टी करीत राहावे.CChMara 140.4

    पुष्कळजण भयकर दुष्टाईवर आपली दृष्टी खिळवितात. एवढेच नव्हें पण त्यांच्या आसपास असणारा धर्मत्याग व दुर्बलता यावरही दृष्टि लावतात व त्यांच्या अंत:करणात संशय व दु:ख भरून जाईपर्यंत त्याविषयी बोलत राहातात. तें आपल्यासमोर सैतानचे महत्त्वाचे कृत्य प्रामुख्याने ठेवून त्यांच्या अनुभवांतील निराशेच्या गोष्टीवर विचार करतात आणि स्वर्गीय पित्याची शक्ति व त्याचे विपुल प्रेम हें विसरून जातात. हें सर्व सैतानाच्या इच्छेप्रमाणे घडणाच्या गोष्टी आहेत. देवाच्या प्रीतीविषयी व त्याच्या सामर्थ्याविषय कमी विचार करून धार्मिकतेचा शत्रु सैतान त्याच्या महान् शक्तीविषयी आपण विचार करतो ही चूक आहे. आम्ही ख्रिस्ताच्या मोठेपणाविषयी बोलले पाहिजे. आम्ही सैतानाच्या कचाट्यांतून निसटून जाण्यास पूर्णपणे दुर्बल आहों; पण देवाने निसटण्याचा मार्ग घालून दिला आहे. परात्पराच्या पुत्राला आम्हांसाठी लढण्यास सामर्थ्य आहे. ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे आम्ही विजय मिळविणाच्यापेक्षा अधिक प्रमाणात वर येऊ.” CChMara 140.5

    आपल्या स्वत:च्या अशक्तपणावर आणि धर्मत्यागावर ध्यान करून सैतानाच्या शक्तीबद्दल शोक करण्यांत आत्मिक शक्ति नसते. हें महान सत्य जीवत तत्त्व या नात्याने आमच्या मनांत व अंत:करणात रुजले पाहिजे आणि त्यानें आम्हांसाठी केलेल्या यज्ञाचा परिणामही स्थापन झाला पाहिजे; अशा साठीं कीं देव अति प्रमाणात जे त्याच्या वचनाप्रमाणे अटी कबूल करून त्याच्याकडे धाव घेतात त्यांना तारू शकतो. आम्ही आमची इच्छा देवाच्या इच्छेच्या बाजूला राखणे आमचे काम आहे. मग प्राय:श्चिताच्या रक्ताद्वारे आम्ही त्याच्या दैवी स्वभावाचे भागीदार बनतों. ख्रिस्ताद्वारे आम्ही देवाची मुलें बनतों आणि आम्हांला अशी खात्री आहे कीं, जशी देवाने आपल्या पुत्रावर प्रीति केली तशी तो आम्हांवर प्रीति करतो. आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहों. ख्रिस्त जेथे आम्हांला नेतो तिकडे आम्ही जातो. आमच्या मार्गावरील सैतानाच्या अंधाराची सावली तो घालवून देतो आणि निराशेच्या व अंधाराच्या ठिकाणी त्याच्या गौरवाचा प्रकाश आमच्या अंत:करणात प्रकाशतो. 537 333;CChMara 140.6

    भावांनो व बहिणींनों, त्याच्याकडे पाहण्याकडून आम्ही बदलून जातों. देवाच्या प्रीतीवर व तारणाच्याच्या प्रीतीवर विचार करून, दैवी शीलाचे मनन करून आणि ख्रिस्तीची धार्मिकतेची विश्वासाने मागणी करून आम्ही त्याच्यासारखे बदलून गेले पाहिजे. आम्ही निराश होईपर्यंत दु:खी देखावा, सर्व अधर्म, भ्रष्टता व निराशा, सैतानाच्या सामर्थ्याचा पुरावा आपल्या स्मरणांत वागविण्यासाठी एक करूं नये व त्यावर बोलून शोक करूं नये. निराश आत्मा हा अंधाराचे शरीर आहे. तो देवाचा प्रकाश धारण न करण्यास व इतरांना तो मिळू नये म्हणून झाकून ठेवितो. स्वत:चा जय झालेला पाहाण्यास सैतानाला आवडतो व त्याकरता तो मनुष्याला अविश्वासू व निराश बनवितो. 65T 741-745;CChMara 141.1