Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देव पवित्र आत्म्याची देणगी देण्याचे इच्छित

    जेथे आपले लोक राहातात अशा समाजांत अनुभविक कामगारांद्वारे जेव्हां विशेष प्रयत्न केला जातो, त्यावेळी प्रभूकरिता एक विशेष कार्य करण्यास मार्ग उघडावा म्हणून पराकाष्ठा करण्याची जबाबदारी विश्वासणाच्यांवर येऊन पडते. त्यांनी प्रार्थनापूर्वक आपल्या अंत:करणांची तपासणी करावी आणि प्रभूचा राजमार्ग त्यांच्या भावांबरोबर व देवाबरोबर सहकार्य करण्याच्या बाबतींत अडथळा आणणारे प्रत्येक पाप काढून टाकण्याने मोकळा करावा. CChMara 63.5

    देवाच्या लोकांमध्ये फार मोठी सुधारणेची मोहीम चाललेली आहे असा एक देखावा रात्रींच्या दृष्टांतात माझ्या समोरून गेला. पुष्कळजण देवाची स्तुति करीत होतें. आजारी बरे झाले व दुसरे काहीं चमत्कार करण्यांत आलें. मध्यस्थीचा आत्मा दाखविण्यांत आला. पन्नासाव्या दिवशी जसा दाखविण्यांत आला होता त्याप्रमाणे तो होता. शेकडों आणि हजारो जण कुटुंबाना भेटी देऊन देवाचे वचन त्याच्यापुढे उघडतांना दिसलें. पवित्र आत्म्याच्या सामथ्र्थाने अंत:करणाची खात्री झाली होती व पूर्ण पालट झालेली वृत्ति दिसून आली. चोहोंकडे सत्याची घोषणा करण्यासाठी दारे उघडली गेली. स्वर्गाच्या आशीर्वादाने हें जग प्रकाशित झाले होतें. देवाच्या खर्‍य व नम्र लोकांना देवाचा मोठा आशीर्वाद मिळाला होता. देवाची स्तुति करतांना व उपकार मानतांना मी ऐकलें व १८४८ त झालेल्या धर्मसुधारणेप्रमाणे धर्मसुधारणा झालेली दिसून आली. 69T 125, 126;CChMara 64.1

    पवित्र आत्म्याची देणगी देऊन आपल्या लोकांना जागृत करण्यास देव इच्छितो व त्याच्या प्रीतींत नवीन असा बाप्तिस्मा देण्यासहि इच्छितों मंडळीमध्ये आत्म्याची उणीव असण्याची गरज नाहीं. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर वाट पाहात असणार्‍य व प्रार्थना करून विश्वास ठेवणाच्या प्रत्येकाच्या अंत:कणाराला पूर्णपणे व सामथ्याने तो आत्मा भिडला. भविष्यकाळांत हीं पृथ्वी देवाच्या गौरवाने प्रकाशित होणार आहे. सत्याद्वारे जे पवित्र केले गेले आहेत. त्याच्यापासून पवित्र वजन जगाला प्राप्त होणार आहे. ही पृथ्वी कृपेच्या वातावरणाने वेढली जाईल. मानवी अंत:करणावर पवित्र आत्मा कार्य करणार आहे व देवाच्या गोष्टी घेऊन त्यातो मनुष्याला दाखविणार आहे. 79T 40;CChMara 64.2

    जे खर्‍या रीतीनें देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या करता देव महान् कार्य करणार आहे. जर मंडळीचे सभासद जे काम त्यांना करता येणें शक्य आहे तें करण्यास तयार होतील व स्वत:हून लढाई करण्यास पुढे जातील व ख्रिस्ताकरिता किती आत्मे जिकले जातील हें पाहात राहातील तर सैतानाची बाजू सोडून ख्रिस्ताच्या झेंड्याखाली आलेले पुष्कळजण आम्हांला दिसतील. जर आपले लोक योहान १५:४८ मध्ये दिलेल्या वचनांतील प्रकाशाप्रमाणे वागतील तर आम्ही देवाचे तारण पाहूं शकू. अद्भूत धर्मसजीवन होईल, पाप्यांचा पालट होईल व पुष्कळ आत्मे मंडळीत मिळतील. जेव्हां आम्ही आपली अंत:करणे ख्रिस्ताशी संयुक्त करतो व त्याच्या कार्यानुसार आमची जीविते जगतों तर पन्नासाव्या दिवशीं जो पवित्र आत्मा शिष्यांवर आला तो आत्मा आम्हांवर येईल. 88T 246;CChMara 64.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents