Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ३७ वें - सणावारांच्या व जयन्तींच्या दिवसांत कौटुंबिक हालचाली

    जगरूढीला चिकटून आमचे सणावरांचे दिवस पाळण्यात येऊ नयेत, हें माण्या लक्षात आलें आहे. तथापि त्यांच्यांकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. कारण त्यामुळे आमची मुलें नाखुष राहातील. अशा प्रसंगी जगांतील सुखात व चैनीत सापडून आपली मुलें वाईट वातावरणात सापडून बिघडण्याचा संभव असतों में आईबापांनी लक्षात ठेवावे. तसल्या घातक वातावरणात न पडू देता त्यांची मने दुसर्‍य गोष्टींकडे वेधून घेण्याची योजना करावी. त्यांचे हित व सौख्य हेच आपल्या नजरेसमोर असतें, हें मुलांना समजून येऊ द्या. सणवार पाळण्यांत जगांतील व मंडळीमधील लोकांस असेच शिक्षण देण्यांत येते कीं असले कामचुकार दिवस आरोग्यासाठीं व सौख्यप्राप्तीसाठी अवश्य असतात, परंतु त्यांत खेचून दुर्धिकार भरलेलें असतात हें परिणामी आढळून आलेले आहे.CChMara 223.1

    कांहीं फेरफार करून सणावारांचे दिवस तरुणांसाठी व मुलांसाठी शक्य तितके चित्तवेधक करण्याचे आम्हीं आस्थेवाईक प्रयत्न केलेले आहेत. ख्रिस्ती नाहींत अशांच्या मोज-क्षेत्रापासून त्यांना दूर ठेवावे हाच त्यातला एक उद्देश असतो. CChMara 223.2

    चैनबाजीचा दिवस निघून गेल्यावर चैन-शोधकाचे समाधान कोठे असतें ? ख्रिस्ती सेवक म्हणून त्यानी इतरांची चरित्रे अधिक चांगली, अधिक थोर आणि अधिक शुद्ध करण्यास साह्य केले आहे का ? देवदताने आपल्याविषयी काय नोंद केली हें त्यांना पाहावयास मिळाल्यावर त्यांना काय आढळून येईल? एक गमावलेला दिवस ! त्यांच्या आत्म्यासाठी निघून गेलेला एक दिवस, ख्रिस्ताच्या सेवेपासून हिरावून गेलेला एक दिवस कारण त्या दिवसांत कांहींच सार्थक्य झालेले नाही. असें दुसरेही दिवस गेलेले असतील परंतु मुलींनी मुलांसह व मुला मुलींसह इतक्या निरर्थक व अविचारात कदापि न घातलेला असा हा एक दिवस असू शकेल.CChMara 223.3

    असल्या संधि परत केव्हाही यावयाच्या नाहीत सणाच्या दिवशी त्यांनी भरपूर कष्टाचे परिश्रम केले असतें तर बरे झाले असतें. त्या सणाच्या दिवसाचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला नाहीं व शाश्वत काळांत तो गणला गेलेला राहील न्यायदिनीं दुररुपयोग केलेल्या ह्या दिवसाचा जबाब देतांना तुम्ही गोधळून जाल.CChMara 223.4