Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण १२ वे - पृथ्वींतील मंडळी

    देवानें निवडलेल्या व त्याच्या आज्ञा पाळणार्‍य लोकांची या पृथ्वीवर त्याची एक मंडळी आहे. तो अधूनमधून निर्माण होणार्‍य गटाना किंवा येथे थोडे तेथें थोडे असलेल्यांना नव्हें तर आपल्या लोकांना मार्गदर्शन करीत आहे. सत्य ही पवित्र करणारी शक्ति आहे. जी मंडळी झगडत आहे ती मंडळी विजयी नव्हें. गव्हामध्ये निदण असतें. “मग आम्ही त्याला गोळा करावे काय?’ असें सेवकांनी विचारलें होतें. पण धन्याने उत्तर दिले. “नाहीं कदाचित् त्याबरोबर गहहि उपटाल.” मत्तय १३:२८. २९. सुवार्तचे जाळे फक्त चागल्या माशानाच ओढीत नाहीं, तर वाईट माशांनाही ओढिते आणि प्रभूला त्याचे कोण आहेत तें माहीत होतें.CChMara 104.1

    आमचें व्यक्तिवाचक कर्तव्य म्हणजे नम्रपणे देवाबरोबर चालणे होय. आम्हांला एखादा नवीन किंवा औपचारिक संदेश शोधायचा नाहीं. देवाचे जे निवडलेले आहेत त्यांनी असें वाटून घेऊ नये कीं, जे उजेडात चालतात त्यांचा बाबेलोनमध्ये समावेश होतो. 12TT 362;CChMara 104.2

    जरी मंडळीत दुष्टता माजली आहे व जगाच्या शेवटापर्यंत ती असणार तरी मंडळी जगाचा प्रकाश असणार कारण जग भ्रष्ट होऊन पापाने नीतिभ्रष्ट झाले आहे. जरी मंडळी दुर्बल, व्यंगयुक्त असून इशारा, सल्ला व कान उघाडणी करण्याची आवश्यकता असली तरी या जगांतील केवळ याच संस्थेला खिस्त आपला अमूल्य मान देतो. हें जग एक कारखाना असून मानवी व दैवी हस्तकांच्या सहकार्याद्वारे येशू आपल्या कृपेने व दैवी प्रीतीने मानवी अंत:करणांवर प्रयोग करीत आहे. 22TT 355; CChMara 104.3

    देवाचे लोक जगावेगळे आहेत म्हणजे त्याची पृथ्वीवरील मंडळी अतुल्य असून सत्य शिकविण्याच्या बाबतींत सर्वश्रेष्ठ व देवाच्या नियमाची सत्यता स्थापन करण्यांतहि सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना तो मार्गदर्शन देतो, जे दिवसाचे ओझे व ऊन सहन करतात व जे स्वर्गीय हस्तकांशी या जगांत ख्रिस्ताचे राज्य वाढविण्यासाठी सहकार्य करतात. अशाची ती मंडळी आहे. सर्वांनी या निवडलेल्या हस्तकांशी ऐक्य करावे आणि जे देवाच्या आज्ञा पाळतात व येशूची साक्ष देतात अशांचा धीर दिसून येतो त्यामध्ये शेवटी त्यांनी आढळावे. 32TT 361, 362;CChMara 104.4