Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण २१ वें - पवित्रशास्त्र

    पवित्र शास्त्रांतील सत्याचे हजारों मोती वर वर शोध करणार्‍यपासून लपले आहेत. सत्याची खाण कधीही संपत नाहीं. जितक्या अधिक नम्र रीतीने शास्त्राचा शोध कराल तितकी अधिक गोडी लागेल आणि अधिक प्रमाणांत पौलाबरोबर म्हणाल, “अहाहा ! देवाची संपत्ति, बुद्धि के ज्ञान किती अगाध आहेत! त्याचे संकल्प किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत.” (रोम ११:३३.) 15T 266;CChMara 151.1

    ख्रिस्त व त्याचे वचन यांची नेहर्मी सागड असतें. त्याचा स्वीकार करून पालन केल्याने ख्रिस्त जसा प्रकाशात आहे तसे प्रकाशांत चालण्यास जे इच्छितात त्यांच्या पायासाठी खात्रीचा मार्ग उघडतात. जर देवाच्या लोकांना देवाचे वचन पटले तर खालीं पृथ्वीवर आपल्याला स्वर्ग प्राप्ति होईल. ख्रिस्ती लोकांनी देवाच्या वचनाचा शोध करण्यांत उत्सुक व भूकलेले असावे. शास्त्र शास्त्राशी जुळवून त्याचे मनन करण्यास तें उत्सुक असतील. वर्तमानपत्रें, मासिकें व कादंबर्‍य यापेक्षा तें देवाच्या वचनाच्या प्रकाशाविषयीं जास्त उत्सुक असतील, त्याची मोठी इच्छा म्हणजे देवाच्या पुत्राचे शरीर खाणे व रक्त पिणे ही असणार. त्याचा परिणाम म्हणून त्याची जीवित देवाच्या वचनांतील आश्वासने व तत्त्वे यांशी जुळती असणार. त्यातील शिक्षण जीवनी झाडाच्या पानासारखे असणार. त्याच्यामध्ये तें पाण्याच्या झर्‍यप्रमाणे सार्वकालिक जीवन देणारे असणार. कृपेचा वर्षाव आत्म्याना संजीवन देऊन ताजेतवाने करणार व त्याकडून त्यांचे श्रम व थकवा नाहींसा होणार. आत्म्याच्या प्रेरित शब्दांद्वारे त्यांना धैर्य प्राप्त होऊन शक्ति मिळेल. 28T 193;CChMara 151.2

    पवित्र शास्त्रांतील विषय व पद्धति याविषयीचा टप्पा इतका विस्तृत आहे कीं, प्रत्येक मनाला व अंत:करणाला तो आकर्षन घेतो. त्यामध्ये प्राचीन काळचा इतिहास आढळतो. खर्‍या जीवितांची चरित्रे आहेत. राज्य चालविण्यास उपयोगी पडणारी तत्त्वे आहेत व कौटुंबिक सुव्यवस्थेसाठीं तत्त्वे म्हणजे मानवी ज्ञानाने त्याच्या तोडीच कधींही शोधिलीं नाहींत अशीं तीं आहेत. त्यामध्ये अगाध तत्त्वज्ञान, गोड व अति उत्कृष्ट काव्य, म्हणजे करुणजन्य व तल्लीन करून सोडणारें काव्य भरले आहे. पवित्रशास्त्राचे लिखाण, मानवी पुस्तककत्र्यांच्या कल्पनेपेक्षा किंमतीने अति मौल्यवान आहे. याप्रकारे विचार केला तर असें आहे पण अमर्याद रितीने विस्तृतता व अमर्यादा श्रेष्ठ किंमत याबाबतींत त्यांतील श्रेष्ठता केंद्रित विचाराच्या दृष्टीने पाहिलें असतां मौल्यवान आहे. यारितीने विचार केल्यास, प्रत्येक मुद्याला महत्त्व आहे. अगदीं साध्या रीतीनें विदीत केलेल्या सत्यांत स्वर्गाइतकी उंच व सर्वकाळाला जाऊन पोहचणारी तत्त्वे दिली आहेत. 3Ed. 125;CChMara 151.3

    पवित्रशास्त्रांतून कांहींतरी रोज नवीन शिकले पाहिजे. गुप्त ठेव्याप्रमाणे त्याचा शोध केला पाहिजे. कारण त्यात सार्वकालिक जीवनाचें शब्द आहेत. त्या पवित्र लिखाणाचा समज मिळण्यासाठी ज्ञान मिळावे म्हणून प्रार्थना करा. असें जर कराल तर देवाच्या वचनात तुम्हांला नवीन गौरव आढळेल. सत्याला धरून असणाच्या विषयांबद्दल तुम्हांला नवीन व मौल्यवान प्रकाश मिळाला म्हणून आनंद वाटेल. तुमच्या विचारांत पवित्रशास्त्राला सतत महत्त्व राहील. 45T 266CChMara 152.1

    पवित्रशास्त्राच्या सत्यामुळे जगिकपणापासून व त्याच्या भ्रष्टतेपासून तुमचे मन उंचावले जाईल. जर देवाच्या शब्दाचा जसा करावा तसा आदर केला तर वृद्ध व तरुण यांना तत्त्वाची शक्ति व आतरीय नीत्तिमता प्राप्त होऊन त्याद्वारे त्यांना मोहाचा प्रतिकार करण्यास सामर्थ्य प्राप्त होईल. 587 319;CChMara 152.2