Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण २६ वें - प्रभु भोजन

    प्रभूच्या गृहविषयांच्या खाणाखुणा साध्या व स्पष्ट कळून येण्यासारख्या आहेत. त्यांतून निष्पन्न होणारी सत्ये आम्हासाठी फार अर्थभरित अशी आहेत.CChMara 170.1

    दोन प्रकारच्या आर्थिक घटना व त्याचे दोन महान् सण यांच्या संक्रमणावस्थेच्या काळीं ख्रिस्त उपस्थित झालेला होता. देवाचा निष्कलंक कोकरा पापाबद्द स्वत:चे बलिदान करणार होता. चार हजार वर्षांपासून त्याच्या त्या मरणावर दृष्टि ठेवून जे विधिसस्कार करण्यांत येत होतें, त्याचा, त्याच्या पद्धतीसह ख्रिस्त अंत करणार होता. आपल्या शिष्याबरोबर तो वहांडण सणाचे भोजन करीत असताना त्यानें वेल्हांडणाऐवजी एक नवीन विधि घालून दिला व तो विधि त्याच्या थोर अर्पणाचे स्मारक म्हणून राहावयाचा होता. यहदी लोकांचा हा राष्ट्रीय सण कायमचा नष्ट व्हावयाचा होता. ख्रिस्तानें जो हा विधि प्रस्थापित केला तो त्याच्या अनुयायांनी सर्वत्र व सर्वकाळ पाळावयाचा होता.CChMara 170.2

    मिसरी दास्यांतून इस्राएलाच्या झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ वल्हांडणाची योजना करण्यांत आली. या संस्काराचा अर्थ काय अशी विचारपूस मुलें करतील तेव्हां एतिहासिक निरुपण करण्यांत यावे अशी देवाची अनुज्ञा होती. अशा प्रकारे त्या अभ्दुत सुटकेचा इतिहास सर्वांच्या मनांत ताजातवाना राहावयाचा होता. प्रभू भोजनाचा संस्कार पण अशासाठींच दिलेला आहे कीं ख्रिस्ताच्या मरणाद्वारे जी महान् सुटकी (मुक्ति झाली) तिच्या स्मरणार्थ तो पाळण्यात यावा. आपल्या सामध्यन व गौरवाने त्याचे द्वितीय आगमन होईपर्यंत हा संस्कार पाळण्यात यावयाच्या आहे. त्यानें जें महान् कार्य आम्हांसाठी केलेले आहे तें आमच्या मनांत जिवंत ठेवण्याचे तें एक साधन होय. CChMara 170.3

    प्रभु भोजनाला प्रतिबंध करणे ख्रिस्ताच्या उदाहरणांवरून नाकारण्यात आलें आहे. उघड उघड पाप करणारा गुन्हेगार वगळावा हें रास्तच होय. याविषयी पवित्र आत्म्याचे शिक्षण स्पष्टच आहे. (१ करिंथ. ५:११.) परंतु या पलीकडे कोणालाही न्यायनिवाडा करावयाचा नाहीं. असल्या प्रसंगी कोणीं यावे किंवा येऊ नये हें ठरविणे. माणसांकडे सोपविलेले नाहीं कारण अंतर्याम कोणाला कळते ? गहू व निदण यांचा भेदभाव कोण ओळखू शकतो? “मनुष्याने आपली परीक्षा करावी, आणि मग त्या भाकरींतून खावे व त्या प्याल्यातले प्यावें” कारण “जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल.” त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणितों.” (१ करिथ ११:२८, २७, २९.) CChMara 170.4

    सहभागितेपासून कोणीही दूर राहाता कामा नये. सहभागीता घेणान्यांतही कोणी नालायक असू शकतील म्हणून ख्रिस्त हा माझा स्वत:चा तारणारा अशी साक्ष देण्यासाठी प्रत्येकानें उघडपणे सहभागितेत सामील झाले पाहिजे. CChMara 171.1

    आपल्या शिष्यासह भाकर व द्राक्षारस घेऊन ख्रिस्ताने असें सिद्ध केले कीं तो त्यांचा तारणारा आहे. त्यानें त्याच्याशी नवीन करार केला व तो असा होता कीं जे कोणी त्याचा स्वीकार करतात तें सर्व देवाची मुलें व ख्रिस्तासह वारसदार असें ठरतात. त्यांच्या दैहिक व पारमार्थिक जीवनांत लाभणारा प्रत्येक आशीर्वाद हा त्यांचा होय, असें ह्या करारावरून व्यक्त केले जाते. हा करार ख्रिस्ताच्या रक्ताने परिपूर्ण व्हावयाचा होता. पतित मानवतेचा हा जो मोठा मेळावा आहे त्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी ख्रिस्ताने केलेले हें अगम्य स्वार्पण सहभागिता घेताना शिष्यवर्गाने आपल्या नजरेसमोर ठेवीत जावे.CChMara 171.2

    सेवकांचा सेवकCChMara 171.3

    भोजनाच्या खोलीमध्ये शिष्यांनी प्रवेश केला तेव्हां त्यांची मने ना-खुषीने भरलेली होतीं. डाव्या बाजूला ख्रिस्तांशी लगत असलेली बैठक यहूदाने पटकावली तर योहानाने उजवी जागा पटकावली. थोर मानाचे स्थळ असतें. तर यहदाने तें बळकविण्याचा निर्धार केला असतां. तें ठिकाण ख्रिस्ताच्या नजीकचेच होतें असें त्यांना वाटत होतें यहूदा तर द्रोहीं होता.CChMara 171.4

    त्यांच्यातील मतभेदाला आणखी एक कारण होतें. भोजनाचे वेळी चाकर असेल त्यानें पाहणे मंडळीचे पाय धुवावेत हा त्यांचा शिरस्ता असें वे असल्या सेवेची सर्व काहीं तरतूद करण्यांत आली होती. पाय धुण्यासाठी पाण्याचे भाडे, गंगाळ व पाय पुसायाला रुमाल तयार ठेविलेले होतें पण कोणी चाकर नव्हता व शिष्यांनाच तें कार्य करावयाचे होतें. परंतु शिष्यार्त.ल प्रत्येकजण अहंकाराने भरलेला असल्यामुळे हा नोकराचा भाग करावयाचा नाहीं असा ज्याने त्यानें निर्धार केलेला होता. सर्वांनी या प्रकरणीं बेपरवाईची वृत्ती धारण केली व आपल्याला कांहीं एक करावयाचें नाहीं असें त्यांनी दाखविलें जो तो गप्प बसून नम्रता दाखविण्याचे नाकारीत होता. CChMara 171.5

    एकमेकांची सेवा करण्यासाठी शिष्य कोणी धजेनात. तें काय करतात हें येशू थोडा वेळ पाहात होता. नंतर तो, दैवी गुरु टेबलावरून उठला आपल्या सेवाकार्यात कांही अडथळा होऊ नये म्हणून त्यानें आपली बाह्य वस्त्रे काढून ठेविली आणि रुमाल घेऊन कमरेला गुंडाळिला. शिष्य तर आश्चर्यचकित होऊन पुढे काय होतें तें पाहात होतें. “मग तो गंगाळांत पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने तें पुसू लागला.” हें पाहिल्यावर शिष्यांचे डोळे उघडले व भयंकर लजेनें व नालायकीने त्यांची मने भरून गेली. तो मुका टोमणा त्यांना कळून आला आणि आपण अगदी नव्या प्रकाशात आहोत असें त्यांना दिसून आलें. CChMara 171.6

    आपल्या शिष्यावरची प्रीति ख्रिस्ताने अशा प्रकारे व्यक्त केली. त्यांच्या स्वार्थी वृत्तीने त्याचे मन खिन्न झाले, परंतु त्याच्या मानसिक गोंधळाविषयी विरोधात्मक असें ख्रिस्ताने काहीं एक केले नाही. उलट त्यांना कधीही विसरता येणार नाहीं असें त्यानें उदाहरण घालून दिले. त्याची त्यांच्याविषयींची प्रीति सहसा डळमळत नसे अगर नष्ट होत नसे. त्याला ठाऊक होतें कीं पित्यानें सर्व कांही त्याच्या हवाली केलेले आहे, आपण देवाकडे जाणार हें तो जाणून होता. आपल्या देवत्वाची त्याला पूर्ण जाणीव होती. परंतु सेवकांचे स्वरूप धारण करण्यासाठी त्यानें आपला राजकीय मुगुट व राजकीय पेहराव बाजूला काढून टाकला होता. या जगांतील त्याच्या जीवनचरित्रांतील अखेरच्या कार्यापैकी एक असें होतें कीं सेवकाप्रमाणे त्यानें कबर बाधून सेवकाचेच कार्य करावे. CChMara 171.7

    जरी त्यानें शिष्यांचे पाय धुतले होतें तरी त्यामुळे त्याच्या देवत्वाला कसल्याही प्रकारचा कमीपणा आला नाहीं हें शिष्यांनी ओळखून घ्यावे अशी रिव्रास्ताची इच्छा होती. “तुम्ही मला गुरु व प्रभु असें संबोधन देता, आणि तें ठीक देतां; कारण मी तसाच आहे. “तो एवढ्या अगम्य श्रेष्ठ पदाचा होता म्हणूनच त्यांची सेवा इतकी कृपामय व अर्थसूचक होती. ख्रिस्ताएवढी थोरवी कोणाचीही नव्हती तरी अति नम्र सेवाकर्तव्य करण्यासाठीं तो नम्र झाला. मानवी अंत:करणातील स्वाभाविक स्वार्थ आत्म सुखाची प्रवृत्ति बळावीत राहातो. त्या स्वार्थाने आपल्या लोकांची दिशाभूल होऊ नये यासाठी ख्रिस्ताने स्वत: नम्रतेचा कित्ता आम्हांला घालून दिला आहे. ही एवढी महत्त्वपूर्ण बाब त्यानें मानवाकडे सोपविली नाहीं. त्याला ती इतकी परिणाम कारक वाटली कीं, स्वत: देवासमान असतां आपल्या शिष्यापुढे सेवकाप्रमाणे तो वागला. मोठमोठ्या जागांसाठी तें कलह करीत असतां, ज्याच्यासमोर प्रत्येक गुढघा नमून जाईल व वैभवशाली दृतगणाला ज्याची सेवा करण्यांत मोठा अभिमान वाटेल, त्या ख्रिस्ताने जे त्याला प्रभु, प्रभु म्हणत त्या शिष्यांचे पाय त्यानें विनम्रपणे धुतले. त्याचा घात करणार्‍यचे सुद्धा पाय त्यानें धुतले.CChMara 172.1

    शिष्याचे पाय धुतल्यावर तो त्यास म्हणाला, “जसे मी तुम्हांस केले तसे तुम्हॉहीं करावें म्हणून मी तुम्हांस कित्ता घालून दिला आहे” (योहान १३:१५). या शब्दांत ख्रिस्त नुसती पाहुणचाराची वहिवाट पाळीत नव्हता. प्रवासाने पाहुण्याच्या पायावर बसलेली धूळ धुऊन काढण्यापेक्षा त्यांत अधिक अर्थ होता. या ठिकाणी ख्रिस्ताने एका धार्मिक सेवाकार्याची संस्थापना केली आहे. प्रभूच्या ह्या कार्याने हा विनम्रतेचा विधि एक समर्पणाचा सस्थापना करण्यांत आला. नम्रतेचे व सेवेचे जे धडे यांत घालून दिलेले आहेत तें निरंतर मनीं धरून शिष्यांनी हा संस्कार पाळावयाचा होता.CChMara 172.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents