Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    वार्षिक सभा

    देवाच्या लोकांचा मेळा भरतो तेव्हां जास्त तसदी घेऊन तेथें हजर राहाण्याचा प्रयत्न करा.CChMara 112.3

    भावांनों व बहिणींनी, देवापासून तुम्हांकरतां जो संदेश आहे तो ऐकण्याची संधि दवडण्यापेक्षा आपला धंदा बुडालेला बरा. प्रत्येक आत्मिक फायदा मिळण्याची संधि गमावेल अशा प्रकारची कोणतीही सबब सांगू नका. तुम्हांला प्रकाशाच्या प्रत्येक किरणाची गरज आहे. तुम्हांमध्ये सौम्य व गंभीर अशी असलेली आशा तिचे कारण देण्यास तुम्हीं पूर्ण माहिती घेतलेले असें असण्याची मोठी गरज आहे. अशी एकही संधि तुम्ही दवडू शकत नाही.CChMara 112.4

    कोणीही पाळकावर किंवा उपदेशकार अवलंबून राहून आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणून वार्षिक सभेला जाऊ नये. आपल्या पाळकावरच अवलंबून राहावे अशी देवाची आपल्या लोकासंबंधाने इच्छा नाहीं. मदतीसाठी मानवी साहाय्यावर त्यांनी अवलंबून राहूं नये अशी त्याची इच्छा आहे. निराधारी मुलांप्रमाणे कोणावर अवलंबून राहूं नये. देवाच्या कृपेचा कारभारी या नात्याने प्रत्येक मंडळीच्या सभासदाने, स्वत:मध्ये मूळावले जाण्यास व जीवनप्राप्ति होण्यास वैयक्तिक जबाबदारी ओळखावी. CChMara 112.5

    सभेचा विजय पवित्र आत्म्याच्या समक्षतेवर व सामर्थ्यावर अवलंबून आहे. सत्यावर प्रीति करणाच्या प्रत्येक व्यक्तीने पवित्र आत्म्याच्या वर्षावाद्दल प्रार्थना करावी. आपल्या शक्तीप्रमाणे जेवढे प्रत्येक अडखळण काढून टाकता येईल तेवढे त्याच्या कार्यातून काढून टाकावे. मंडळीच्या सभासदामध्ये जोपर्यंत एकमेकांबद्दल द्वेष व वैरभाव आहे तोपर्यंत पवित्र आत्म्याचा वर्षाव होणार नाही. मत्सर, वैर, दुष्ट तर्क वितर्क, दुर्भाषण हीं सैतानापासून आहेत व या गोष्टी पवित्र आत्म्याच्या कार्याविरुद्ध परिणामकारकरित्या अडथळा आणतात. CChMara 112.6

    या जगांत देवाला मंडळीपेक्षा प्रिय अशी दुसरी गोष्ट नाही. अशी काळजी दुसर्‍य कोणत्याही गोष्टीविषयीं तो घेत नाहीं. जे त्याची सेवा करतात त्यांचे वजन खराब करणाच्या कार्याकडून देवाचा अंत अपमान होतो. निराश करण्याच्या व टीका करण्याच्या सैतानी कार्यात जे मदत करतात त्याचा देव हिशेबा घेईल. 136T 39-42;CChMara 112.7