Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देव ज्यांना किंमत देता त्यांची कसोटी बघतो

    संकट सोसण्यास आम्हांला पाचारण करण्यांत आलें आहे यावरून सिद्ध होतें कीं, प्रभु येशूला आम्हांमध्ये काहीतरी मौल्यवान् दिसते व त्याची आम्ही वाढ करावी अशी त्याची इच्छा आहे. त्याचे गौरव होईल असें कांही आम्हामध्ये त्याला दिसलें नाही, तर तो आम्हांला शुद्ध करण्याच्या बाबतीत वेळ घालविणार नाहीं. काटेकुटे कापून काढण्यास आम्ही त्रास घेत नाहीं. ख्रिस्त आपल्या भट्टीत निरुपयोगी दगड टाकीत नाहीं. तो मौल्यवान् धातूची कसोटी पाहातो. 107T 214;CChMara 100.1

    देव योजनेप्रमाणे जबाबदार जागा घेणार्‍य मनुष्यांना तो त्यांचे गुप्त दोष दाखवितो, अशासाठीं कीं, त्यांनी अंत:करण तपासून पाहावे व टीकात्मकदृष्ट्या गुंतागुंतीच्या भावना तपासून पाहाव्या एवढेच नव्हें तर त्यांच्या मनातील काये व दोषहि तपासून पाहावेत; त्यांनी आपला स्वभाव बदलावा व आपल्या संस्कृति सुधाराव्या. प्रभु आपल्या योजनेनुसार मनुष्याच्या नैतिक शक्तीची कसोटी पाहातो व त्यांच्या कृतीचे हेतु प्रगट करतो, अशासाठीं कीं जे चुकीचे आहे तें काढून टाकून त्यामध्ये योग्य गोष्टींची त्यांनी वाढ करावी. आपल्या सेवकांनी त्याच्या अंत:करणाच्या नातक यंत्राची ओळख करून घ्यावी अशी योजना देव करतो. हें घडून येण्यासाठी तो वारवार त्यांच्यावर संकटाचा अग्नि येऊ देतो व त्याकडून त्याची शुद्धता होतें. पण प्रभूच्या दिवशीं कोण टिकेल ? तो येईल तेव्हां कोण तरेल? कारण तो शुद्ध करणार्‍य अग्नीसारखा आहे. परटाच्या खारासारखा आहे. रुपें गाळून शुद्ध करणार्‍यसारखा तो आहे. लेवीच्या वंशजास तो शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग तें धर्माने परमेश्वराला बलि अर्पण करतील. (मलाखी ३:२,३). 114T 85;CChMara 100.2

    देव पायरी पायरीनें आपल्या लोकांचे मार्गदर्शन करतो. अंत:करणात काय आहे हें दर्शविण्यासाठी लागणाच्या वेगवेगळ्या मुद्याकडे त्यांना आणतो. कांहींजण एकाद्या मुद्यात टिकून राहातात तर दुसर्‍यांत पडतात. प्रत्येक वाढत्या मुद्यावर अंत:करणाची कसोटी होतें व बारकाईने त्याची परीक्षा होतें. आपली अंत:करणे या सरळ कार्याविरुद्ध आहेत हें देवाच्या नामधारी लोकांना समजल्यावर प्रभूने आपल्या तोडांतून ओकून टाकू नये म्हणून त्यांनी त्यामध्ये विजय मिळविला पाहिजे. 1217 187; CChMara 100.3

    देवाचें कार्य करण्याची दुर्बलता दिसून आल्याचें समजून आल्यावर व त्याच्या शहापणाद्वारें चालण्याकरितां जर आम्ही वश होऊ तर प्रभु आम्हांबरोबर कार्य करील. जर आम्ही आपल्यांतून स्वला काढून टाकू तर तो आमच्या सर्व गरजा पुरवील. 137T 213;CChMara 100.4