Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शब्बाथ पालनाचे आशीर्वाद

    शब्बाथाचे पालन करणारे व चौथी आज्ञा पाळतो असें म्हणणारे या सर्वांचे निरक्षण सर्व स्वर्ग शब्बाथ दिवशीं करीत आहे असें मला दाखविण्यांत आलें. देवदूत त्या दैवी संस्थेविषयी मोठा आदर व गोडी दाखवीत होतें. ज्यांनी आपल्या अंत:करणांत प्रभु देवाला पूर्ण भक्तीभावाने पवित्र मानिले आहे, आणि निश्चय करुन शब्बाथाचा पवित्र वेळ पाळण्यास जे पाहातात व शब्बाथ हा आनंददिन आहे असें मानून देवाला मान देतात अशांना देवदूत विशेष प्रकारे प्रकाश व आरोग्य यांनी युक्त असा आशीर्वाद देत होतें व त्यांना विशेष शक्ति देण्यांत आली. 1927 704, 705;CChMara 54.1

    स्वर्गाच्या मागणीशीं रूकार दिल्याने भौतिक व आत्मिक आशीर्वाद प्राप्त होतात. 20PK 546;CChMara 54.2

    “जो मनुष्य हें करतो तो धन्य होय व मनुष्याचा पुत्र शब्बाथाची पायमल्ली करण्यापासून अलिप्त असतो व वाईट गोष्ट करण्यापासून आपला हात आवरितो त्याला धरून राहतो.” ‘विदेशांचे पुत्र प्रभूच्या बाजूला उभे राहून त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी त्याच्या चरणीं जडले आहेत. त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहातात त्यासं मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन.” यशाया ५६:२, ६, ७. 21GC 451;CChMara 54.3

    आकाश व पृथ्वी आहे तोंवर शब्बाथ उत्पन्नकर्त्यांच्या सामर्थ्याची खूण म्हणून चालूं राहील. जेव्हां एदेन पृथ्वीवर पुन: फुलेल, तेव्हां देवाच्या पवित्र दिवसाचा सूर्याखालील सर्वाकडून मान होईल. “एका शब्बाथापासून दुसर्‍य शब्बाथापर्यंत सर्व मानव जात नवीन पृथ्वींत माझ्यासमोर भजन-पूजन करायला जातील असें परमेश्वर म्हणतो.” 22DA 283.CChMara 54.4

    *****