Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ५७ वें - सरकारी अधिपति व कानूकायदे यांशी आमचा संबंध

    विश्वासणार्‍यांनी राजकीय अधिकार्‍यांशी कसा काय संबंध राखावा याविषयी प्रेषिताने स्पष्ट रूपरेषा दिलेली आहे. “मनुष्यांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभुकरिता अधीन असा राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या आणि अधिकारी वाईट करणार्‍यांना शिक्षा देण्यासाठी व चागले करणाच्यांची स्तुति करण्यासाठी त्यानें पाठविलेले म्हणून त्याच्या अधीन असा देवाची इच्छा नाही अशी आहे कीं तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला कुंठीत करावे, आपली स्वतंत्रता ही दृष्टपणाचे झाकण न करिता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असें असा. सर्वास मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा, राजाला मान द्या.’ १ पेत्र २:१३-१७.CChMara 341.1

    अधिकारी म्हणून आम्हांवर मानव नेमिलेले आहेत व लोकांवर राज्य करण्यासाठी कानू कायदे केलेले आहेत. जर हें कानूकायदे नसते तर आज जगाची स्थिति आहे त्यापेक्षा अधिक वाईट झाली असती यांतील कांही कायदे चागले तर कांही वाईट आहेत. वाईट कायद्यात भरच पडत चाललेली आहे आणि आम्हांला तग परिस्थीतीत यावे लागत आहे. परंतु देवाच्या शास्त्रानुरूप स्थिरपणे जगण्यास तोच आम्हांला आधार देईल. सीनाय डोंगरावर देवाने स्पेष्ट वाणीने दिलेल्या व नंतर स्वहस्ताने दगडी पाट्यावर कोरलेल्या आज्ञा याच्याशी विसंगत नसतील तर आमच्या देशाचे कानूकायदे हरएक बाबीत पाळणे हें आमचे कर्तव्य आहे. हें मी पाहन घेतलेले आहे. “मी आपले धर्मशास्त्र यांच्या अंर्तयामी ठेवीन. मी तें त्यांच्या हृदयपटांवर लिहीन. मी त्याचा देव होईन व माझे लोक होतील.’ ज्याच्या अंर्तयामावर देवाचे कायदे लिहीलेले आहेत तो मानवापेक्षा देवाच्याच आज्ञा मान्य करील. परमेश्वराच्या करारात यत्किंचितही विरोध झाला तर तो मागें पुढे सर्वांच्या आज्ञांना झुगारून देईन, सत्याच्या प्रेरणेने सुरक्षित झालेले देवाचे लोक आणि सद्सद्विवेकाला स्मरून देवाच्या प्रत्येक शब्दाप्रत वागून जाणारे लोक त्याच्या अंत:करणात लिहील्याप्रमाणे देवाचे नियमशास्त्र हेच मात्र अदिकृत आज्ञाशास्त्र असें तें मान्य करून पाळावयास तयार होतील. दैवी आमात असलेली सूज्ञता व सत्ता ह्या परम श्रेष्ठ होत.CChMara 341.2

    येशूच्या काळी असलेले राज्य भ्रष्ट व जुलमी होतें. अनुचित व्यवहार, जुलूमजबरदस्ती, असह्य दु:खे आणि भयंकर क्रूरता सर्वत्र आढळून येत होती. तथापि राजकारणात सुधारणा करण्याचे तारकाने मनावर घेतले नाही. राष्ट्रीय शत्रुवर ठपका ठेविला नाही. सत्तेवर असलेल्या लोकांच्या अधिकारांत अगर त्याच्या कारभारात त्यानें कांही एक हस्तक्षेप केला नाही. ज्याला आम्ही आपला नमुना गणितो तो जागिक राज्यकारणांपासून अलिप्त राहिला.CChMara 341.3

    कायदाविषयक व राजनीतिविषयक प्रश्नाचा निर्णय देण्याविषयी ख्रिस्ताला पुन: पुन: विचारण्यात येत असें. परंतु ऐहिक बाबींत पडण्याचे तो नाकारीत असें. तो आमच्या जगांत न्यायत्वाचे राज्य प्रस्थापित करावयास आलेला होता, त्या महान् आत्मिक राज्याचा तो अधिपति म्हणून तो या जगांत सिद्ध झालेला होता. थोरवीला चढविणारी व पवित्रतेत गति देणारी तत्त्वे हींच त्या राज्याची कारभारसूत्रे होती, हें त्यानें आपल्या शिक्षणातून स्पष्टपणे विशद केलेले आहे न्याय, दया आणि प्रीति हीच यहोवाच्या राज्याची अधिकार-सामर्थ्य होत, असें त्यानें दर्शविले.CChMara 342.1

    खरेपणाचा अविर्भाव दाखवून व जणू काय आपल्या कर्तव्याचा खुलासा मिळवावा म्हणून ख़िस्ताकडे खोडकर लोक आलें व म्हणाले, गुरूजी आम्हांस ठाऊक आहे कीं आपण खरे आहां, देवाचा मार्ग खरेपणाने सांगतां व कोणाची भीड धरीत नाही. कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपणाला कसे वाटते हें सागा. कैसरला कर देणे हें योग्य आहे किंवा नाही ? CChMara 342.2

    ख्रिस्ताने आपल्या उत्तरात टाळशटाळ न करता प्रश्नाला सरळ उत्तर दिले कीं ज्याअर्थी तुम्ही रोमन सत्तेच्या सरक्षणाखाली राहात आहां त्याअर्थी तुमच्या वरीष्ठ कर्तव्याशी विरोध नसेल तर त्याची कराची मागणी त्या सत्तेला देऊन टाकावी. ख्रिस्ताचा सवाल ऐकून “परूशांना आश्चर्य वाटेल व तें त्याला सोडून गेले. त्यांच्या ढोगाला व आढ्यतेला त्यानें खडसावून उत्तर दिले व तें देताना मानवाच्या राजकीय व दैवी कर्तव्याची काय मर्यादा आहे हें स्पष्ट करून सांगितलें.CChMara 342.3