Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आमची मालमत्ता व देवाच्या कायाला हातभार

    जे देवावर मनापासून प्रेम करतात व ज्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांना मी बजावते: आताच तुमचा पैसा देवाच्या कार्याला चालविण्यासाठी खर्च करण्याची वेळ आहे, नाश पावणाच्या आत्म्याचा जीव वाचविण्यास पाळकांचे हात त्यांच्या स्वनाकाराच्या कार्यात बळकट करण्याची वेळ हीच आहे. जेव्हां तुम्ही स्वर्गीय न्यायालयात भेटाल तेव्हां ज्या आत्म्यांना जिंकण्यासाठी तुम्ही मदत केली आहे त्याबद्दल तुम्हांला गौरवी वेतन मिळणार नाही का?CChMara 81.2

    कोणीही आपला पैसा मागें राखून ठेवू नये व ज्यांच्या जवळ पुष्कळ आहे त्यांनी आनंद करावा अशासाठी कीं, त्यानी स्वर्गात कधींही नाश न पावणारा खजिना तें स्थापन करूं शकले. प्रभूच्या कार्यात खर्च करण्यासाठी जो पैसा आपण नाकारतों तो नाश पावेल. त्यावर स्वर्गातील बँकेत व्याज आकारलें जाणार नाहीं.CChMara 81.3

    प्रभु से ० डे ० अं ० लोकांना त्यांच्या व्यवसायातून त्याच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्या कार्यात मदत करण्यास बोलावितों. आपली अर्पणे व देणग्या देण्याद्वारे जे औदार्य दाखविले जाईल त्याकरिता त्यांनी त्याच्या आशीर्वादाबद्दल व त्याच्या दयेबद्दल कृतज्ञता दाखवावी अशी त्याची इच्छा आहे. 249T 131, 132;CChMara 81.4

    प्रभूनें मला पुन: पुन: दाखविले कीं, संकटाच्या वेळी आमच्या क्षणिक गरजा भागण्यासाठी कोणतीही तरतूर करणे पवित्र शास्त्राच्याविरुद्ध आहे. मी पाहिलें कीं, जर संताजवळ भरपूर अन्नाचा साठा असेल किंवा संकटाच्या वेळी शेतात धान्य असेल, आणि जेव्हां तरवार, दुष्काळ व मरी हीं शांत असतील तेव्हां ती त्यांच्यापासून जबरदस्तीने काढून घेतली जातील व परके येऊन त्यांची शेतें कापतील. मग देवावर पूर्णपणे भरवसा ठेवण्यासाठी वेळ राहील व तो आम्हांस सावरून धरील. मी पाहिलें कीं, आमची भाकर व पाणी त्यावेळी खात्रीची असणार. आम्ही भुकेने उपार्शी मरणार नाहीं कारण अरण्यांत देव आमच्यासाठी अन्न पुरवील. गरज पडेल तर तो आमच्या पोषणासाठी एलियाला त्याप्रमाणे कावळे पाठवील किंवा स्वर्गातून इस्राएल लोकांसाठी मान्ना पाडला त्याप्रमाणे मान्ना पाडील. CChMara 81.5

    संकटाच्या वेळी घरें, शेतें यांचा उपयोग सताना होणार नाही. कारण त्यांना त्यांच्या क्रोधाविष्ट जमावापुढून पळून जावे लागेल. त्यावेळी सत्याच्या कार्याच्या वाढीसाठी त्यांची मालमत्ता देता येणार नाही. मला दाखविण्यांत आलें कीं, देवाची अशी इच्छा आहे कीं, त्याच्या भक्तांनी प्रत्येक अडथळ्यापासून संकटाचा काळ येण्याअगोदर अलिप्त राहावे व देवाबरोबर स्वार्पण करून करार करावा. जर त्यांनी आपली मालमत्ता वेदीवर ठेविली व मनापासून देवाला कर्तव्याबद्दल विचारपूस केली, तर तो त्यांना या गोष्टी केव्हा देऊन टाकाव्या तें शिकवील. मग तें सकटाच्या काळांत मुक्त होतील, व त्याचे पारडे खालीं जाण्यासाठी कोणताहि खोडा उरणार नाहीं. 25EW 56, 57; CChMara 82.1