Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    येणाऱ्या घटना

    आपले लोक क्षुल्लक गोष्टींना सुद्धा सन्मान देतात, परंतु बदल होईल. ख्रिस्ती जग आता हालचाल करीत आहे. कारण अनेक मंडळ्या अनावश्यक आज्ञा आणून आवश्यक देवाच्या पवित्र आज्ञा काढून टाकीत आहेत. देवाच्या आज्ञा लबाडीने हिरावून घेत आहेत. देवाचे सत्य त्याच्या आज्ञा जे मानतात. त्यांच्याविरुद्ध इतर लोक जातील. म्हणजे प्रत्येक आत्म्याची परीक्षा केली जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:५४६. ChSMar 192.1

    लोक कठोरपणे देवाच्या नियमाविरुद्धचे मनुष्याचे नियम लोकांवर जबरीने लादतात. ते आपल्या स्वत:च्या आज्ञा लोकांवर जबरदस्तीने पालन करण्यासाठी सांगतात. देवाच्या सरळ साध्या आज्ञांपासून त्यांनी वेगळेच नियम काढले आहेत. देवाने स्थान केलेला विश्रांतीचा दिवस यांनी हा दिवस बदलला. म्हणजे यहोवा देवाच्या आज्ञाभंग करुन त्याचा अपमान केला. देवाचे नियम हा त्याचा स्वभाव आहे. निष्पाप व भोळे लोक मनुष्याचे नियम पाळून दुःख व त्रास भोगतात तर सैतानाच्या भूलथापांना बळी पडणारे त्याच्या आज्ञा पाळून कट्टरता व्यक्त करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२२९.ChSMar 192.2

    धार्मिक सामर्थ्याचे संबंध जे स्वर्गाशी आहेत ते सुशिक्षितांची आणि ते दावा करतात की त्यांच्यामध्ये कोकऱ्याची वैशिष्टे आहेत ते आपल्या कृतीमधून तसा आव आणतात, परंतु त्यांची हृदये अजगराची असतात. त्यांच्यावर सैतानाचे नियंत्रण असते. एक अशी वेळ येत आहे की देवाच्या लोकांचा छळ करण्यात येईल कारण ते सातव्या दिवसाच्या शब्बाथाचे पालन करतात. परंतु देवाच्या लोकांना ठामपणे आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे आणि देव त्यांच्या वतीने कार्य करील. मग लोकांना दिसेल की तो देवांचा देव आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२२९-२३०.ChSMar 192.3

    प्रत्येक अपमानास्पद वागणूक, नालस्ती, निर्दयपणा आणि क्रूरपणा हा मनुष्याच्या अंत:करणात योजण्यास सैतान चिथावणी देत होता व त्या प्रत्येकाचा वापर येशूच्या भक्तांविरुध्द करण्यात आला आहे. त्याची पुन्हा ठळकपणे पूर्णता होत आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन अजून ही देवाच्या नियमशास्त्राचे वैर आहे आणि त्याच्या आज्ञेच्या स्वाधीन ते होऊ शकत नाही. प्रषितीय काळामध्ये जग ख्रिस्ताच्या तत्त्वाशी समरस झाले नव्हते आणि आज ही ते तसेच आहे. “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर द्या.” असे बोल काढण्यास ज्या द्वेषभावनेने स्फूर्ति आली. त्याच द्वेष भावनेने शिष्यांचा छळ करण्यात आला. आणि तीच भावना अजूनही आज्ञा भंग करणाऱ्यांच्या मनात आहे. अंधकारमय युगात त्याच द्वेष वृत्तिने स्त्री-पुरुषांना तुरुंगात टाकले, हद्दपार केले आणि ठार केले. पाखंडीपणाच्या आरोपाच्या चौकशी करणाऱ्या त्यांच्या उच्च न्यायालयाच्या असह्य दळ याच भावनेतून उदयास आला. सेंट बार्थोलोम्युच्या दिवशी असहाय्य लोकांची कत्तल त्याच प्रवृत्तिने अमंलामध्ये आणली होती आणि स्मीथ फिल्डच्या असहाय्य लोकांना भस्क करणारा आणि त्याच कारणाने भडकला होता आणि आज सुद्धा ज्यांना नव्या जन्माद्वारे नवचैतन्य प्राप्ति झाली नाही अशांच्याद्वारे द्वेष युक्त सामर्थ्य कार्य करीत आहे. खरे आणि खोटे यांच्यामधील झगड्याची नोंदणी हा सत्याचा इतिहास नेहमीच राहिलेला आहे. जरी विरोध, अनर्थ, तोटा आणि दुःख व्यथा यांना या जगात तोंड द्यावे लागले तरी शुभवृत्त घोषणेचे कार्य पुढे चालू राहील. - द अॅक्टस् ऑफ अपोस्टलस् ८४, ८५. ChSMar 192.4

    अवशिष्ट मंडळीला मोठ्या त्रासातून आणि नाशातून जावे लागेल. जे कोणी देवाच्या आज्ञा पाळतील व येशूवर विश्वास ठेवतील त्यांना अजगर आणि त्याच्या अनुयायांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. सैतानाने सर्व धर्म भ्रष्ट मंडळ्यांवर आपले नियंत्रण ठेवले आहे, परंतु एक छोटासा काळ आहे. तो सैतानाच्या श्रेष्ठत्वाला विरोध करतो. जर सैतान देवाचे लोक पृथ्वीवरुन संपवून टाकील तर तो विजवोत्सव साजरा करील. जसे त्याने आपल्या सामर्थ्याने इस्त्राएल लोकांना पृथ्वीवर सर्वत पांगविले होते त्याच प्रकारे तो जवळील भविष्यामध्येही तो विधर्मी लोकांना हाताशी धरुन देवाच्या लोकांचा नाश करु पाहील. सर्वांना देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे. सैतानाने जवळ-जवळ सर्व जग देवाच्या नियमांविरुध्द आहे. देवाच्या पवित्र नियमांचा भंग होत आहे जे देवाचे विश्वासू आहेत. त्यांच्यामध्ये सैतान वितुष्ट आणतो, मुलांविरुध्द आई-वडील भावांमध्ये भेद, मित्र या सर्वांमध्ये अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२३१.ChSMar 193.1

    प्रत्येकाची परीक्षा होण्याची वेळ फार दूर नाही. खोट्या शब्बाथाचे पालन करण्यास आम्हाला आग्रह करण्यात येईल. देवाची आज्ञा आणि मनुष्याचे नियम यांच्यामध्ये स्पर्धा, चढाओढ असणार. क्रमाक्रमाणे जगिक मागणीला ज्यांनी संमति दिली आहे आणि ऐहिक रुढीला मान्यता दिली आहे ते नालस्ती, उपहास, विटंबना, तुरुंगवास आणि मृत्यु यांच्या अनुभवातून जाण्या ऐवजी त्यावेळच्या अधिकाऱ्यांना शरण जातील. त्या समयी सुवर्ण गाळापासून विभक्त करण्यात येईल. खरे धर्माचरण, ईश्वर निष्ठा आणि भपकेदार बाह्यस्वरुप यांच्यामधील तारतम्य किंवा फरक स्पष्ट करण्यात येईल. ज्यांच्या चातुर्याविषयी आम्ही आश्चर्य केले त्या प्रमुख व्यक्ति अंधारात गडप होतील. ज्यांनी पवित्रस्थानातील अलंकार शीरावर घातले आहेत, परंतु ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पेहराव अंगावर चढविला नाही तर ते स्वत:च्या लजास्पद नग्नतेमध्ये सामोरे येतील. - प्रॉफेटस अॅण्ड किंग्ज १८८. ChSMar 193.2

    भविष्यामध्ये आपल्यासमोर दुःख, त्रास अशा संकटांचा धोका आहे. तसेच तुरुंगवास, मालमत्तेची हानी आणि जीवाचाही नाश होऊ शकतो. हे सर्व देवाचे नियम पालन करण्याचे परिणाम असतील. देवाचे नियम मानवाने निरर्थक केले आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१२. ChSMar 194.1

    वेळ भरभर जात आहे जेव्हा तुम्ही देवाचे सत्याचे रक्षण करण्याचे ठरविता तेव्हा तुम्हाला ख्रिस्ताच्या दुख भोगण्याचा अनुभव येईल. त्याने मोठा जुलूम सहन केला, परंतु आपल्याला कार्य करायला थोडा वेळ आहे. आता लवकरच देव मानसावरील जबाबदारी स्वत:कडे घेईल फसवेगिरी करणारांकडील सामर्थ्य तो काढून घेईल आणि त्या अविश्वासू लोकांना शिक्षा करील. अंधश्रध्दा आणि चुकीच्या गोष्टींनी देवाचे सत्य पायदळी तुडविले आहे. न्याय आणि न्यायबुध्दी या सर्व गोष्टी सत्याच्या विरोधात जातात म्हणून त्यांना सामर्थ्य मिळते. - द सदर्न वॉचमन. ChSMar 194.2

    शांततेच्या आणि प्रगतीच्या काळामध्ये मंडळीने जे कार्य करायचे होते त्यामध्ये त्यांना अपयश आले. म्हणून त्यांना भयानक व कठीण व निराशेच्या अवस्थेमध्ये हे कार्य करायचे आहे. जगभरामध्ये एकच इशारा देण्यात आला आहे. परंतु हा इशारा सामान्य असो किंवा कडक देवावरील विश्वासाच्या शत्रुना जे विरोध करतात त्यांना देवाचा निरोप सांगणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्यावेळी वरकरणी विचार करणारे भरपूर असतील. ते म्हणतात आमच्याकडे जे आहे तेच बरे आहे असाही एक वर्ग आहे. त्यांनी आपला विश्वास टाकून दिला आहे आणि उघड उघड शत्रुपक्षाचा विश्वास स्वीकारला आहे. शेवटी तर असा प्रसंग येईल की देवाच्या लोकांवर कठीण प्रसंग येईल. अशी परिस्थिती निर्माण होईल की शत्रु पक्षाच्या सभेमध्ये एकएकाला साक्ष द्यावी लागतील. तेथे निंदानालस्ती होईल. अशाप्रकारे अनेकांनी सभेमध्ये कोर्टामध्ये बोलावून न्यायालयात त्यांच्याविरुद्ध अनेक आरोप केले जातील. कारण ज्यावेळी त्यांना सुवार्ता सांगण्याची संधी होती तेव्हा त्यांना दुर्लक्ष केले. त्यांनी संधी सोडून दिली होती. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४६३.ChSMar 194.3

    आज प्रोटेस्टंट जग पाहात आहे की एक छोटासा कळप आहे तो शब्बाथ पाळतो ........... फाटकामध्ये आहे. त्यांचा स्वभाव आणि सन्मान तो देवाच्या नियमांना देतात. जे देवाचे नियम सतत नाकारतात ते देवाच्या भीतिपासून दूर गेले आहेत. त्यांचा शब्बाथ त्यांनी पायदळी तुडविला आहे. अशा या घुसखोरांना देवाच्या नियमांमधून त्याच्या मार्गातून दूर करायला हवे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४५०.ChSMar 195.1

    सैतान या छोट्या कळपावर राग व्यक्त करण्यासाठी नेहमीच उत्सुक आहे. हा लहानसा कळप कारण हा छोटासा कळप मनुष्याचे पारंपारिक आणि खोटे नियम मान्य करण्यास तयार नाही कारण तो केवळ सृष्टी निर्माणकर्ता परमेश्वर याचेच नियम पाळतो. म्हणून मनुष्याचे प्रसिद्ध प्रतिष्ठीत व मोठ्या हुद्यावरील लोकांना तयार केलेले देवा विरुदचे नियम जे खोटे आहेत त्यांचे हे निरुपयोगी नियमांचे पालन हा छोटा गट करीत नाही म्हणून त्यांच्यावर खोटे आरोप लाऊन देवा विरुद्धचे हे लोक त्यांना कोर्टामध्ये खेचतात. श्रीमंत, बुद्धीमान, सुशिक्षित व प्रतिष्ठीत लोक येऊन या छोट्या गटाचा (देवाच्या लोकांचा) तिरस्कार करतात, छळ करतात. मंडळीचे सभासद ही त्यांना सामील राहतात. त्यांच्यावर आरोप करतात, प्रलोभ दाखवितात. अनेक प्रकारचे छळही करतात. त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करतात. देवाच्या लोकांविरुद्ध उठून मोठ्याने ओरडून त्यांच्यावर आरोप करतात. बायबलमधील शब्बाथाविरुद्ध ते वकील लावतात. शासनाच्या नियमांविरुद्ध देवाचे लोक जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. जगभर असणाऱ्या प्रसिद्धीचा आधार घेतात. विधिमंडळाचे अधिकारी ओरडून रविवार शब्बाथाला मान्यता देतात. अशाप्रकारे सत्य व असत्या यांच्यामधील संघर्ष ही शेवटची लढाई आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४५०, ४५१.ChSMar 195.2

    छळामुळे त्यांची पांगापांग झाल्यामुळे ते मिशनरी उत्साहपूर्ण भावनेने बाहेर पडले. त्यांच्या मिशन कार्याची जाणीव त्यांना होती. उपासमार होत असलेल्या जगाला देण्यासाठी त्यांच्या हातात जीवनी भाकर आहे याची कल्पना त्यांना होती आणि ही भाकर मोडून भुकेने व्याकुळ झालेल्यांना देण्याची प्रेरणा त्यांना ख्रिस्त प्रेमाने झाली. - अॅक्टस ऑफ अपोस्टल १०६.ChSMar 195.3

    देवाच्या उद्देशाप्रमाणे कसोटी झालेले सत्य समोर आणले पाहिजे आणि परीक्षा व चर्चेचा विषय होणे आवश्यक आहे. त्याच्यावर तिरस्कार असला तरीही यावर चळवळी होते. देवाच्या या सत्यावर संघर्ष होतो. या सत्याची निंदा करणे, चिडविणे, चौकशी करणे या सर्व केल्यामुळे या सर्व गोष्टींमुळे लोक जागे होतील नाहीतर ते झोपेतच राहतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४५३.ChSMar 196.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents