Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    औद्योगिक शिक्षण

    अशाप्रकारे शिक्षण आणि सहाय्य केवळ शहरामध्येच नाही परंतु खेडी व नगरामध्येही राहणाऱ्या गरीब लोकांसाठीही त्यांना चांगले जीवन जगण्याची गरज आहे. सर्व समाजामध्ये औद्योगिक आणि आरोग्यदायी शिक्षणाची कमतरता असते. कुटूंबे झोपड्यामध्ये राहतात व त्यांच्याकडे लाकडांचे काही सामान व अपुरे कपडे असतात. त्यांच्याकडे काही हत्यारे नसतात. पुस्तके आणि आवश्यक वस्तुची कमतरता असते. मानवी संस्कृतीमध्येसुद्धा ते मागे आहेत. कलंकित जीवन व अविकसित शरीर चुकीच्या सवयीमुळे परिणामी आजारी शरीरे घेऊन ते फिरतात. या लोकांना मूळापासून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या चुकीच्या सवयी कशा सुधाराव्यात याचे शिक्षण त्यांना देण्याची गरज आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १९२.ChSMar 161.4

    वेगवेगळ्या औद्योगिक कारखान्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यावे म्हणजे गरीब लोकांना रोजगार मिळू शकेल. सुतार, लोहार अशा अनेक कला असणाऱ्या सर्वांना कामे मिळतील. आणि अशाच प्रकारची अनेक कामे येणाऱ्या सर्वांना नोकऱ्या मिळतील आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून येतील. बेरोजगार असतील त्यांना त्यांची कामे मिळतील व ते जबाबदार नागरीक बनतील व मानाचे जीवन जगतील. - मिनीस्ट्री ऑफ हिलंग १९४.ChSMar 162.1

    ख्रिस्ती शेतकरी गरीबांना शेतामध्ये घरे बांधणे आणि वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्यासाठी आणि उत्पादन काढण्यासाठी शिकविण्यासाठी सहाय्य करतील आणि ते आपले खरे मिशनरी कार्य करतील. शेतीच्या अवजारांचा वापर कसा करावा, निरनिराळी पीके कशी काढावीत व मशागत कशी करावी. बाग लावून त्याची देखरेख कशी करावी या सर्व गोष्टी त्यांना शिकवा. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १९३.ChSMar 162.2

    गरीबांची सेवा आणि सहाय्य करण्याच्या हेतूने स्त्री पुरुष या दोघांसाठी मोठे क्षेत्र आहे. तरबेज स्वयंपाकी, घरातील काम करणारे, महिला कामगार, शिंपी, परिचारीका या सर्वांची आवश्यकता असते. तसेच गरीब घरातील सदस्यांसाठी स्वयंपाक करणे, घराची काळजी घेणे याचे ज्ञान घेणे, घरातील मुलांना व मुलींना काही उपयुक्त उद्योग या गोष्टी शिकविणे गरजेचे आहे. - मिनिस्ट्री ऑफ हिलींग १९४.ChSMar 162.3