Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    पुनरुज्जीवन आणि सुधारणेची गरज

    लवकरच जगावर जे आश्चर्यकारक दिवस येतील त्यासाठी ख्रिस्ती लोकांना आपली तयारी करायला हवी. कारण ही आश्चर्यकारक दिवस अनिवार असतील. आणि ही तयारी मन लाऊन अभ्यास करुन करावी. यासाठी झटून अभ्यास करावा. पवित्र शास्त्रातील वचनांचा मन:पूर्वक अभ्यास करुन ख्रिस्ताच्या येण्याची तयारी करावी. देवाचे नियम आणि नीतिवचनावर अवलंबून राहण्यासाठी त्याचे वचन वाचून आपल्या अंत:करणात ठेवावा. देव लोकांना पुनरुज्जीवन आणि सुधारण्यासाठी पाचारण करीत आहे. - प्रोफेटस् अॅण्ड किंग्ज. ६२६. अधार्मिकांचे पुनरुज्जीवन ही फार मोठी आणि अति महत्त्वाची व तातडीचे गरज आहे. यावर तोडगा काढणे ही आपले पाहिले कार्य आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, २२ मार्च १८८७.ChSMar 61.1

    सुधारणा घडून येण्याची वेळ आहे. जेव्हा अधर्मिकांचे पुनरुज्जीवनाची सुरुवात होते तेव्हा प्रार्थनेने पवित्र आत्म्याचे कार्य सुरु होते. प्रत्येक विश्वासणाऱ्यामधून भांडखोर आत्मा हद्दपार होतो. मंडळीमधून तो दिसेनासा होतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ८:२५१.ChSMar 61.2

    पुनरुज्जीवन आणि सुधारणा ही पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच होऊ शकते. पुनरुज्जीवन आणि सुधारणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन हे याचे नवीनीकरण होते. याचीही लक्षणे आहेत. यामध्ये जीवनामध्ये बदल घडून येतो. हृदय आणि मन या दोन्हीमध्ये लवकरच बदल घडून येतो. त्यामध्ये सामर्थ्य येते. यामुळे आध्यात्मिक मृत्युमधून जीवनामध्ये पुरुरुत्थान होणे असे आहे. सुधारणा ही वागण्यामध्ये आणि स्वभावामध्ये बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. सवयी आणि आचरणामध्ये बदल घडून येतो. सुधारणेमुळे धार्मिकतेची चांगली फळे दिसून येत नाहीत, तर ती केवळ पुनरुज्जीवनामुळेच दिसून येतात. असे होण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य मिळते. यासाठी आत्मा बदलण्याची गरज असते. पुनरुज्जीवन आणि सुधारणा यांनी आपापले कार्य करावे. त्यांनी एकजीव व्हावे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २५ फेब्रुवारी १९०२. ChSMar 61.3

    जे कोणी स्वईच्छेने पवित आत्म्याच्या नियंत्रणाखाली सुधारणेसाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन करील. आम्ही आमच्या समोर संकटे पाहात आहोत. आणि देव त्याच्या कामगारांना सरळ होण्यासाठी बोलवित आहे. प्रत्येक आत्म्याने आता सत्य घेऊन ठाम उभे राहायला हवे. त्यांनी स्वत:ला देवाला समर्पित होऊन मागील वर्षाचे स्मरण करुन त्याला शरण जावे. रात्रीच्या दृष्टांतात मला जे घडले व घडेल ते पाहात होते. सुधारणेचे मोठे कार्य मी दृष्टांतात पाहिले होते. अनेक ठिकाणी धर्म सुधारणा पुढे-पुढे सरकत होती. देवाचे लोक योग्य मार्गाने पुढे सरकत होते. देवाच्या पाचारणाला त्यांनी प्रत्यंत्तर दिले होते. द जनरल कॉन्फरन्स बुलेटिन २९ मे, १९९३. पान ३४. ChSMar 61.4

    रात्रीच्या दृष्टांतामध्ये माझ्यासमोर देवाच्या लोकांमध्ये एक मोठी सुधारणा घडून आल्याचे दृष्टीस आले. अनेक लोक देवाचे गौरव करीत होते. आजारी लोक बरे होत होते आणि अनेक चमत्कार केले जात होते... शेकडा आणि हजारो लोक कुटूंबांना भेटी देत आहेत आणि देवाच्या वचनामधून शिकवितांना दिसत आहेत. पवित्र आत्म्याकरवी लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे आणि सत्याचा आत्मा आत्म्यांचे परिवर्तन करताना दिसत होता. चारी दिशांना दरवाजे उघडले जात होते आणि सत्य पुकारले जात होते. स्वर्गीय दैवी सामर्थ्याने देवाचे वचन सर्वत्र चमकत होते. सत्य आणि नम्र लोकांमध्ये देवाचे आशीर्वाद येत होते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१२६.ChSMar 62.1

    देवाच्या लोकांमध्ये मोठी सुधारणा करण्याची गरज आहे. मंडळीची सध्याची अवस्था ही मलिनतेची आहे. ज्याने आमच्यासाठी आपले जीवन दिले, रक्त सांडले त्याला आपण अशा मंडळीचे समर्पण करीत आहोत ? हे आपले योग्य सादरीकरण आहे काय ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ३:४७४.ChSMar 62.2

    आळसपणाचा तिरस्कार करुन आळस व सुस्तपणा मंडळीमधून पूर्णपणे झटकून टाकणे आवश्यक आहे. देवाचा आत्मा स्पष्टपणे सर्वांमधून दिसून येतो. दैवी सामर्थ्य प्रगट होईल. मंडळी पाहिल की देवाचे दूत ईश्वरी कार्य करीत आहेत. सत्याचा प्रकाश स्पष्टपणे दिसून येईल. त्याचे किरण तीव्र होतील. आणि येशूच्या शिष्यांच्या काळात घडल्याप्रमाणे अनेक आत्मे चुकीच्या मार्गापासून सत्याकडे वळले. देवाच्या गौरवाने पृथ्वी प्रकाशेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९.४६. ChSMar 62.3

    मला दाखविण्यात आले की देवाचे लोक त्यांच्यामध्ये बदल होण्याची ते वाट पाहात आहेत. सामर्थ्य त्यांना धरुन ठेवील. परंतु त्यांची निराशा होईल. कारण ते चुकीचे वागत होते. त्यांनी स्वत:च कार्य हाती घेऊन त्याप्रमाणे कृती करायला हवी. देवाचे कार्य त्यांनी पुढे होऊन करावे आणि देवाचे सत्य ज्ञान समजण्यासाठी त्यांनी देवासमोर काकुळतीने विनंती प्रार्थना करावी. आपल्या समोर तो देखावा दिसत आहे तो परिणाम समजून येण्यासाठी योग्य आहे. आणि देवाचे सत्य ऐकणाऱ्यांच्या हृदयात घरात आणि इतरत्र सर्वत्र पसरण्या येईल जगाची कापणी करण्याची वेळ आली आहे. पीक जवळजवळ पिकले आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६१. ChSMar 62.4

    उलट पक्षी प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेऊन त्यामध्ये प्रगती करण्याऐवजी काहीजण आपला अमुल्य काळ आळशीपणामध्ये घालवित आहेत. आणि आध्यात्मिक उत्साहवर्धन होण्याच्या विशिष्ट संधीची आणि दुसऱ्यांना जागृत करण्याच्या त्यांच्या कार्यक्षमतेची वृद्धि होण्याची वाट पाहात आहे. त्यांचे सध्याचे कर्तव्य व आलेली संधी यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि त्यांच्यात असलेला प्रकाश मंद होऊ देतात. स्वत: काहीही न करता विशेष आशीर्वाद मिळण्याची आणि त्याद्वारे सेवा करण्याची परिवर्तित होऊन लायक ठरण्याची ही अपेक्षा करतात. - द अॅक्टस् ऑफ अपोस्टल, ५४. उत्पादक नव्हे परंतु गि-हाईकChSMar 63.1

    ख्रिस्ताचे निष्णात अनुयायी प्रथम स्वर्गीय अनुभवामध्ये होते. परंतु नंतर त्यांच्या आस्था थंडावल्या म्हणून देवाच्या सेवेमध्ये त्यांच्या मानसिक हालचाली दुर्बल ठरली. यामुळे त्यांच्यावर अविश्वासूपणाचा शिक्का पडला. ते जे करीत आहेत त्यापेक्षाही चांगले ते करु शकतात आणि त्यांच्यावर जास्त दोषारोप आले नसते, परंतु त्यांच्या हृदयावर जे संस्कार झाले होते त्यावर ते अधिक चांगले करु शकले असते. त्यांना ठाऊक आहे आणि जगाला ठाऊक आहे की ते त्यांचा स्वनाकार आणि वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी मोठा दर्जा खाली आले आहेत व जगाशी समरुप झाले आहेत. स्वर्गातील जीवनी पुस्तकात अनेकांची नावे लिहिण्या विरुद्ध ते वागत आहेत. उत्पादक नाही परंतु गि-हाईक आहेत. अनेकजण ख्रिस्ताचे नाव वागवितात, परंतु त्याचे गौरव अंधुक, त्याचे सौंदर्य पारदर्शक झाले आहे. अनेकांची नावे मंडळीतील पुस्तकात आहेत, परंतु ख्रिस्ताच्या नियमाखाली नाही. कारण ख्रिस्ताच्या सूचनेकडे ते दुर्लक्ष करतात. ते त्याचे कार्य करीत नाहीत. म्हणून ते त्याच्या शत्रुच्या नियंत्रणाखाली आहेत. ते कोणतेच सकारात्मक कार्य करीत नाहीत. म्हणूनच ते बेसुमार नुकसानदायक कार्य करतात. कारण त्यांचे सामर्थ्य हे तारणाऱ्याच्या सामर्थ्यावर नाही. तारणाऱ्याच्या जीवनापासून ते जीवनापर्यंत आणि त्याच्या मरणापासून ते मरणापर्यंत. ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स. ३०३, ३०४. ChSMar 63.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents