Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  सामाजिक राहा

  जे सर्व कोणी ख्रिस्तासाठी काम करतात त्यांना मी म्हणू शकतो, जे काय तुम्ही अधिक मिळविता जितक्यांना तुम्ही चेतविता ती संधी तुम्ही सोडू नका. तुम्ही आपले बायबलमधील महान सत्य त्यांच्यासमोर उघडा. तुमचे यश हे केवळ तुमच्या ज्ञानावर अवलंबून राहात नाही किंवा संपत नाही. तुमची पात्रता ही तुमच्या स्वत:च्या मार्गाने त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, तर तुमच्यामध्ये प्रीति व मित्रत्वाचे गुण देवाचे वचन व प्रार्थना या सर्वांची जोड असणे आवश्यक आहे. असे असेल तर निराश झालेले लोकसुद्धा तुमच्या जवळ येऊ शकतात. ख्रिस्ती कुटूंबाचे सदारीकरण हे निराशजनक लोकांना किंवा कुटुंबाना नवी दिशा दाखवू शकतात किंवा खाजगी घरामध्ये सुद्धा घेतलेली सभाही अति यशस्वी होऊ शकते. उघड्या भागामध्ये दिलेल्या संभाषणा ऐवजी घरामधील छोट्या कुटुंबातील सभासदांना ख्रिस्तासाठी जिंकणे हे अति सोपे जाते. - गॉस्पल वर्कर्स १९३.ChSMar 154.3

  ख्रिस्ताच्या वचनाची सुवार्ता सांगणाऱ्यांनी आणि त्याच्या कृपेची सुवार्ता ज्यांना मिळाली आहे त्या सर्वांनी ...... कल्याणार्थ स्वत:ला गुंतवून घेणाऱ्या ख्रिस्ताचा कित्ता गिरविला पाहिजे. आपण सामाजिक सख्य बंध तोडले पाहिजे असे नाही. आपण इतरांचे पासून अलिप्त राहून नये. आपल्याला सर्व थरातील लोकापर्यंत पोहोचता यावे म्हणून जेथे कोठे ते राहतात तेथे जाऊन आपण त्यांची भेट घ्यावी. ते स्वत:हून क्वचितच आपल्याला शोधत फिरतील. केवळ व्यासपीठावरुन सांगितलेल्या दैवी सत्याद्वारे लोकांची अंत:करणे हेलाऊन जातील असे नाही. व्यासपीठा व्यतिरिक्त दुसरे ही कार्यक्षेत्र मोकळे आहे. साधे आहे, परंतु एक नम्र कुटुंबाचे घर, मोठ्या धनाड्याचा प्रासादतुल्य बंगला, दवाखाना चालविणारे मंडळ आणि साधी सामाजिक संमेलने, आदि करुन ही क्षेत्रे आहेत. - द डिझायर ऑफ एजेस १५२.ChSMar 154.4

  ख्रिस्त वेगळा नव्हता आणि कडक शिस्तीच्या नियमांपासून परुशी ढळल्यामुळे त्यांनी परुशांना दोष दिला होता. अलिप्तेच्या भीतीचे कुंपण धर्म क्षेत्राला घातले असल्याचे त्याच्या दृष्टीस आले ते दररोजच्या जीवनासाठी फार पवित्र आहे अशी त्यांची भावना होती. या भीती त्याने उलथून टाकल्या. मनुष्याच्या संबंधात त्याने त्यांचा धर्म पंथ कोणता असा जसे विचारले नाही. तुम्ही कोणत्या चर्चचे आहात असेही विचारले नाही. गरज असलेल्या सर्वांना त्याने मदतीचा हात पुढे केला. दिव्य स्वभाव प्रगट करण्यासाठी तो एकाकी वैरागी जीवन जगत नव्हता. मानवतेसाठी त्याने कळकळीने कष्टाचे जीवन घालविले. शरीराला क्लेश देणे बायबल धर्मात अंतर्भूत नाही हे तत्त्व त्याने मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. पवित्र आणि अदृष्य धर्म ठराविक वेळेसाठी आणि विशेष प्रसंगासाठी नाही. ह्याचे शिक्षण त्याने दिले. सर्व स्थळी आणि सर्व वेळी त्याने मानवावरील प्रेम व्यक्त केले आणि स्वत:भोवती आनंदाचे वातावरण निर्माण केले. - द डिझायर ऑफ एजेस ८६.ChSMar 155.1

  त्यांच्या प्रतिकूल मनाची पर्वा न करता तो तुच्छ गणलेल्या त्या लोकांच्या पाहुणाचाराचा स्वीकार करीत होता. तो त्यांच्या छपराखाली झोपत होता. त्यांनी स्वहस्ते बनविलेले जेवण तो त्यांच्या सह बसून खाण्यात सहभागी होत होता. त्यांच्या गल्लीत जाऊन त्यांना शिक्षण देत होता आणि तो त्यांना अत्यंत मायेने व आदराने वागवित होता. - द डिझायर ऑफ एजेस १९३.ChSMar 155.2