Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मेंढ्याळासम काळजी

    आपले एक मेंढरु हरवले आहे असे आढळल्यास ज्या सुरक्षित आहेत अशा मेंढराकडे पाहून तो म्हणतो का की “माझ्या पाशी नव्यान्नव मेंढरे सुरक्षित आहेत त्यांना सोडून मी त्या हरवलेल्या एकट्यास शोधायला जायच तर त्यात माझं नुकसानच आहे. त्याला परत येऊन दे म्हणजे मी त्यासाठी आपल्या कोंडवाड्याचे दार उघडेल आणि त्याला आत घेईल.’ नाही, कदापी नाही, ज्या क्षणी त्याला जाणवेल की एक मेंढरु हरवले आहे. तो शोकाकुल होईल, अस्वस्थ होईल. तो मेंढर मोजेल, पुन्हा, पुन्हा मोजेल आणि खात्री झाल्यावर तो नव्यान्नव मेंढरांना कोंडवाड्यात सुरक्षित ठेवून हरवलेल्या मेंढरास शोधावयास जाईल. रात्र काळोखी व खाचखलग्यांनी भरलेली वाट असेल, पण त्यापेक्षाही त्याची अस्वस्थता जास्तच असेल आणि त्याचा शोध ....... असेल. तो त्या हरवलेल्या मेंढरासाठी जीवाच रान करेल.ChSMar 282.2

    आणि दूरवरुन त्या मेंढराचा अस्पष्ट आवाज ऐकून त्याला किती समाधान वाटेल. मग तो उंच कडे चढून जाईल व कड्याच्या अगदी टोकास, स्वत:ची पर्वा न करता जाईल व त्याचा शोध घेत राहील आणि त्या मेंढराचा आणखीन क्षीण होत असलेला आवाज ऐकून तो मृत्युद्वारी असावा असे वाटेल आणि तेवढ्यात ते त्याला सापडेल. त्याने केलेल्या श्रमाचे फळ त्याला मिळेल. परंतु इतके कष्ट होऊनही तो त्याच्यावर रागावणार नाही, त्याला फटकार ही नाही, त्याला घरचा रस्ताही दाखवून जाण्यास सांगणार नाही तर आनंदाने उचलून आपल्या खांद्यावर घेईल. त्याचे थरथरणे, त्याला झालेल्या जखमा व ओरखडे यामुळे तो त्याला हृदयाशी कवटाळून त्याला उब देऊन त्याला पुन्हा घरी आणेन. अगदी कृतज्ञ मनाने कारण त्याचा शोध वाया गेलेला नसतो. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स १८७, १८८.ChSMar 282.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents