Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सुवार्ता प्रसाराशी युती

    सुवार्ता प्रसार आणि वैद्यकिय मिशन हे दोन्ही एकत्रच जातात. खरी आरोग्य सुधारणा ही सुवार्ता प्रसाराबरोबर बांधली गेली आहे. हे त्याचे तत्त्व आहे. ख्रिस्तीपण हे आपले व्यवहारीक जीवन आहे. ते जे कार्य करतात ते विश्वासाने, काळजीने व पूर्णपणे करतात. लोकांसमोर आपण आरोग्यदायी जीवनाची तत्त्वे मांडायला हवी. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्य करावे. आपल्या सर्व सामर्थ्याने त्यांना ही शिकवण द्यावी. स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या आरोग्यदायी जीवनाची तत्त्वे त्यांना सांगून त्यांचे पालन करणे आणि रोजच्या जीवनात त्यांचा सराव करण्याचे शिक्षण द्यावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३७९.ChSMar 167.5

    ही स्वर्गी योजना आहे की आम्ही तसेच कार्य करावे जसे शिष्यांनी केले होते. शरीर रोग्याचा संबंध हा सुसमाचाराशी निगडीत आहे. सुवार्ता प्रसाराचे कार्य आणि आरोग्यदायी शिक्षण वेगळे करता यते नाही. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १४१.ChSMar 168.1

    औषधोपचार कार्य आणि सुवार्ता प्रसार ही एक साखळी आहे. हे देवासाठी असे एक माध्यम आहे. त्याद्वारे देव आपला चांगूलपणाची पूर्तता आपल्या लोकांवर करतो. अशाप्रकारे तो आपल्या आशीर्वादाचे पाट मंडळीवर सोडतो. कारण तोच जीवनाची नदी आहे. - द बायबल एको, १२ ऑगस्ट १९०१.ChSMar 168.2

    जे सुवार्ता प्रसारक आहे त्यांना सुवार्ता प्रसाराचा अनुभव घेतला आहे. त्यांनी साधे उपचार कसे करावे हे शिकून घ्यावे. म्हणजे ते चातुर्याने त्यांच्यावर उपचार करु शकतील व सुवार्ता प्रसार करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१७२.ChSMar 168.3

    पुस्तके विक्रेता जो ठिकठिकाणी व घरोघर जातो तेव्हा अनेकजण आजारी असल्याचे त्यांना दिसून येते. तेव्हा त्यांच्यामध्ये हर आजाऱ्यांवर उपचार करण्याची पात्रता असणे गरजेचे आहे. त्यांच्यावर साधे उपचार करण्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या आजारांवर विश्वासूपणे प्रार्थना करुन रुग्णाचा विश्वास वाढविणे ही आवश्यक आहे. कारण आपला देव एक महान वैद्य आहे. आपण जेथे कोठे जातो तेथे तो आपल्या बरोबर आहे. देवदूत आपल्या कार्यात सहाय्य करतात. विश्वासू कार्यकर्ते त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होतातच. आपल्या कार्यामध्ये ते आशीर्वादीत होतात. कारण त्यांचे कार्य विश्वासूपणाचे असते. - द सदर्न वॉचमन २० नोव्हेंबर १९०२.ChSMar 168.4

    प्रत्येक सुवार्ता प्रसारकाला जाणीव व्हायला हवी की आरोग्यदायी जीवनाचे शिक्षण द्यावे. त्याचे सिद्धांत शिकवावे, त्यांच्या कार्याचा तो एक भाग आहे. या कार्याची मोठी गरज आहे आणि यासाठी सर्व जग आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १४७.ChSMar 168.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents