Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  यशस्वी कार्याचा मुलभूत उद्देश

  पूर्ण प्रितीने केलेले कोणतेही कार्य, जरी लोकांच्या दृष्टिने ते थोडके किंवा लक्षात न ठेवण्याजोगे असो. ते सफल आहे. कारण तुम्ही किती काम करता यापेक्षा तुम्ही ते किती प्रेमाणे, जीव लावून करता, हे परमेश्वर पाहतो, मान्य करतो. TFTC - २:१३५.ChSMar 301.2

  शंभरजण मोजून मापून आखणी करुन, यंत्रवत नियमानुसार त्यामध्ये जीव न ओतता, पूर्ण प्रेमाने करण्यापेक्षा, खरेच परिवर्तन झालेल्यांनी स्वेच्छेने, नि:स्वार्थीपणे केलेले सुवार्ता कार्य मान्य ठरते. TFTC - ४:६०२. ChSMar 301.3

  तुमची योग्यता किंवा भविष्यातील योग्यता, यामुळे तुम्हाला यश मिळते असे नव्हे तर परमेश्वर तुमच्याकरिता काय करतो यावर यश अवलंबून असते. तेव्हा माणसांनी केलेल्या गोष्टी बद्दल अश्वस्त रहाण्यापेक्षा परमेश्वर प्रत्येक विश्वासणाऱ्या करिता काय व किती करु शकतो या विश्वासाने आश्वास्त व्हा. आपण पूर्ण विश्वासाने त्याच्या पाठामागे जावे. त्याची इच्छा आहे, तुम्हाला ऐहीक व आत्मीक गोष्टीची समज द्यावी अशी त्याची इच्छा आहे. तो तुमची हुशारी आणखी तेज करु शकतो तो तुम्हाला कौशल्य व चातुर्य देवू शकतो. तुमची कौशल्ये कार्यासाठी उपयोगात आणा, परमेश्वराला शहाणपण मागा आणि तुम्हाला ते देण्यात येईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स १४६.ChSMar 301.4

  ख्रिस्ताने नेमून दिलेले कार्य करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यास लागणरे धैर्य त्याच्या कृपेच्या मैलाने सुरळीत होते. पाच मुर्ख कुमारींकडे दिले होते (म्हणजे सत्य वचनाचे ज्ञान होते), परंतु त्याच्यावर ख्रिस्ताची कृपा नव्हती. त्या दररोज बाह्य कार्याचा सोहळा साजरा करत, परंतु त्यांची कार्ये निर्जिव होती. ख्रिस्ताच्या सत्यतेमध्ये रिकामी होती. त्यांच्या हृदयात व सत्य याचा अभाव होता. ख्रिस्ताच्या जीवन लेखाची प्रतिमा नव्हती. त्याच्या प्रयत्नामध्ये ख्रिस्त कृपेचे तेज नव्हते. कारण त्यांचा धर्म हा वृक्ष नव्हे तर त्याची साल, कवच होते, ते बाह्य कवच होते. त्यांनी शास्त्र नियम पालन करताना उपवास केले, परंतु ख्रिस्ती जीवनक्रमात ते असफल झाले. कारण ख्रिस्त जो स्वतः सत्य आहे ते त्यांच्यामध्ये नव्हते. त्यांनी ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाचे धडेच घेतले नव्हते ते त्यांना तारणाकरिता राहाणे, ज्ञानी बनवू शकले असते. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड - मार्च २७, १८९९.ChSMar 301.5

  दैवी सामर्थ्य व मानवी माध्यम यांच्या परस्पर सहकार्याचे परमेश्वराचे कार्य पूर्णत्व प्राप्त करते. जे स्व-सिमीत आहेत, परतमेश्वराच्या कार्यात वरवर ते क्रियाशील दिसूनही येतील, परंतु त्याचे कार्य निष्फळ आहे. इंद्रधनु वलयीत सोनेरी वेळीजवळ थांबलेल्या देवदूताजवळील धूपदाणीकडे त्याचे लक्ष असते. तर त्यांना आपल्या प्रार्थना व प्रयत्न यामुळे एकतर येशू ख्रिस्ताच्या गुणवत्तेचा दरवल पसरलेला दिसला असता किंवा काईनाने केलेल्या अर्पणाप्रमाणे निष्फळ ठरलेला असता. आपण जर मानवाच्या साधन सामग्रीच्या सर्व कृति पाहिल्या असत्या, ज्या परमेश्वरा पुढे आहेत तर आपल्या लक्षात येईल की फक्त प्रार्थनेद्वारे परिपूर्ण झालेले कार्य, जे ख्रिस्ताच्या गुणवत्तेने पवित्र झालेले आहे तेच न्यायाच्या दिवशी टिकून राहील. तेव्हा प्रत्येक कार्याची मिमांसा, उजळणी केली जाईल. तेव्हा तुम्हाला परमेश्वराची सेवा करणारे व परमेश्वराची सेवा न करणाऱ्या यातला भेद कळेल. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड - जुलै ४, १८९३.ChSMar 302.1

  या काळाचे उत्तर धैर्य नव्हे, आपण जरी सर्व प्रकारची सुवार्तेची बाह्य कृति केली, तरी आपण पवित्र आत्म्याच्या प्रभावाबद्दल अगदीच भणंग, रिते राहतो, जशी गीलबाओची टेकडी ओलावा व पर्जन्य यास वंचित आहे. कारण आपल्यामध्ये हवाय अध्यात्मिक ओलावा. आणखीन आपल्याला हवीय नितिमत्त्वरुपी सुर्याची किरणे, जी आपल्याला कोमल बनवते व आपले मनही ताब्यात ठेवेल. आपण तत्त्वांच्या बाबतीत सदोदीत अढळ रहायाला हवे. पवित्र शास्त्रातील वचने पवित्रपणे शिकवण्याची गरज आहे. TFTC - ६:४१७, ४१८.ChSMar 302.2

  यश, इच्छा व कल यावर अवलंबून असते. कौशल्यावर मात्र ते एवढ अवलंबून नसते. विश्वासार्थ सुवार्ता कार्य हे उत्कृष्ठ कौशल्याद्वारे साध्य होते असा समज असेल तर ती आपली चुक आहे, परंतु आस्थेवाईकपणे केलेले दैनंदिन कार्य, समाधानी मन व इतरांच्या कल्याणाकरिता अढळपणे, मनापासून केलेले प्रामाणिक प्रयत्न याने ते साध्य होते. नम्र लोकांमध्ये खरी उत्कृष्ठता मिळेल, मिळू शकेल. प्रेमळ विश्वासूपणाने केलेले सर्वसाधारण कार्य परमेश्वराच्या दृष्टिने मंगलमय आहे. - प्रॉफेट अॅन्ड किंग्ज - २९.ChSMar 302.3

  बलशाली व सुंदर व्यक्तिमत्त्वाचा बांधेसूद आराखडा सुवार्ता कार्यातील वैयक्तिक क्रियेवर बांधला जातो. त्यामुळे छोट्यातल्या छोटा किंवा मोठ्यातला मोठा तपशील आपला विश्वासू चारित्र्य, स्वभावगूण दाखविणारा असावा. छोट्या गोष्टीमधील अखंडता, प्रामाणिकपणा व छोट्याश्या कार्यामधून आपला दयाळूपणा, आपले आयुष्य मार्ग उजाळून टाकेल आणि या पृथ्वीवरील आपला कार्यकाल संपला त्यावेळी दिसून येईल की विश्वासूपणाने हाताळलेल्या छोट्या गोष्टी प्रभावशाली झाल्या आहेत, जो प्रभाव अनंत असेल. - पॅट्रिआर्च ॲन्ड प्रॉफेटस् - ५७४.ChSMar 303.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents