Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मन:पूर्वकपणा

    असे लोक जे पूर्णपणाने परमेश्वराची सेवा करतात ते देवाचे लोक म्हणून प्रतिष्ठा पावतात. ते पूर्ण मनाने, स्वत:ला कोणतेही श्रेय न देता, त्याच्या पवित्र कराराची साठवण ठेवून त्यांनी त्याची आणि फक्त त्याचीच सेवा करण्यास स्व:ला बांधील केलेलं असते. TFTC - ९:१७.ChSMar 272.4

    ते पूर्ण मनाचे दृढनिश्चय असलेले स्त्री व पुरुष सर्वात उठून दिसतात. ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना वारंवार चाळले आणि शेवटी अशी वेळ आली की फक्त अकरा शिष्य व काही विश्वासू महिला शिल्लक राहील की त्यांनी ख्रिस्ती मंडळीचा पाया घालावा. एकमेकांचे ओझे वाहण्याची वेळ आली असता जे मागे थांबून रहातील व मंडळी प्रकाशमय झाल्यानंतर त्यांना उत्साह येईल, ते गाणे गातील, ओरडतील आणि परमानंदी बनतील. पण त्यांच्याकडे लक्ष द्या ! जेव्हा उत्साह संपेल, तेव्हा फक्त काही विश्वासू सन्मानिय पुढे येतील व प्रभुच्या अटळ तत्त्वांचे प्रदर्शन करतील. ते मीठाप्रमाणे आहेत. त्यांची चव जिभेवर रेंगाळते. हे कठिण काम तेव्हा येते जेव्हा मंडळी खऱ्या मदतनीसाचा विकास करत असते. TFTC - ५:१३०ChSMar 273.1

    जो आपल्या पूर्ण मनाचे समर्पण करीत नाही आणि परमेश्वराच्या ज्ञानाच्या महतीसाठी स्वत:ला नुकसान करुन घेत नाही तो प्रभू कार्यात यशस्वी होत नाही. जो स्वत:साठी काही राखीव ठेवतो तो ख्रिस्त शिष्य नव्हे. त्याच्या कामकऱ्यापेक्षाही तो कमीच आहे. - द डिझायर ऑफ एजेस २७३.ChSMar 273.2

    ते कोणताही अनुमान काढण्यास गुंतत नाहीत नाही ते अविश्वासू व्यवसायांमध्ये भाग घेतात. कारण तसे करणे म्हणजे प्रभूने नेमून दिलेल्या कार्यास अडथळा असे ठरेल. TFTC - ९:१९.ChSMar 273.3

    मुक्तिदाता दुटप्पी सेवा मान्य करत नाही. कामकऱ्याने नित्य स्वसमर्पणाचा अर्थ पाठ करावा. - गॉस्पल वर्कर्स ११३.ChSMar 273.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents