Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अनिर्णीत सबब

    जेव्हा ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले तेव्हा त्याने प्रत्येक मनुष्याला कार्य नेमून दिले. आणि अनिर्णित सबबच त्यांना दिली नव्हती. त्यांना काही करायला नाही असे काहीच नव्हते. सैतानाने त्यांची मने भरकटवू नये म्हणून त्याने आपल्या योजना शिष्यांना सांगून ठेवल्या होत्या. थोडक्यात म्हणजे त्याच्या शिष्यांना आळशी किंवा काहीच न करता स्वस्थ राहू नये याची ख्रिस्ताने तरतूद करुन ठेवली होती. काहीच करायचे नाही आणि आपल्या बंधूविरुद्ध दुष्ट साक्षी करायच्या अशा गोष्टींना कोणालाही संधी देऊ नये. यामुळे एकमेकांमध्ये तर फूटी पडू शकतात आणि यामुळे मंडळी विस्कळीत होईल याची ख्रिस्ताला कल्पना होती. म्हणून तो म्हणतो की जे माझ्यामध्ये एकत्र येत नाहीत ते विखुरले जातील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १३ मार्च १८८८. ChSMar 138.1

    बंधू आणि भगिनींनो तुमच्यापैकी अनेकजण कामाविरुद्ध सबब सांगतील. आपल्या दुर्बलपणाची कारणे सांगतील. इतरांसाठी कार्य न करण्याची अपात्रता दाखवितील. परंतु देवाने तुम्हाला इतके असमर्थ बनविले आहे काय ? तुमची असमर्थता आणि निष्क्रीयतेमध्ये तुम्ही स्वत:चे उत्पादन करु शकता की नाही? प्रजा निर्माण करु शकत नाही. किंवा जीवन जगण्याची तरतूद करता की नाही ? मग इतरांसाठी कार्य करण्याची असमर्थता का दाखविता ? देवाने तुम्हाला कमीत कमी एक दान तरी दिले आहे ना ? त्यामुळे तुम्ही स्वत:ची सुधारणा करु शकता. स्वत:ची तृप्ती किंवा समाधानासाठी काहीतरी करता की नाही ? कोणीतरी तुम्हाला भाड्याने घेतले तर तुमच्या कर्तव्याची जाणीव तुम्हाला आहे की नाही ? किंवा एखाद्याकडे काही कला असेल आणि त्याचा वापर तुम्हाला करुन घ्यायचा असेल तर त्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागेल किंवा नाही ? मग तुम्हाला दिलेल्या संधीकडे दुर्लक्ष करुन या शेवटल्या जगामध्ये तुम्ही आपल्या सामर्थ्याचा वापर करणार नाही का ? हे सत्य आहे की काही थोडक्यांनी देवाने दिलेल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४५७. ChSMar 138.2

    अनेकांची अशी धारणा आहे की त्यांच्या जीवनातील त्यांचे कार्य व व्यवसायामुळे इतर आत्म्यांच्या तारणासाठी ते काहीच करु शकत नाहीत. त्यांच्या मुक्तिदात्यासाठी ते काहीच योजना करु शकत नाहीत. ते म्हणतात. की आम्ही एका कामाचे दोन भाग करु शकत नाहीत. स्वत:चे कार्य आणि धार्मिकता वाटून घेऊ शकत नाही. म्हणून धार्मिक कर्तव्यापासून आणि धार्मिकतेची कर्तव्य याकडे ते पाठ फिरवितात आणि जगामध्ये स्वत:ला ते पुरुन घेतात. आपल्या जगीक व्यवसायाला ते प्रथम प्राधान्य देतात व देवाला विसरुन जातात. देवाला निराश करतात. जर कोणी आपल्या व्यवसायामध्ये गंतून राहिला असेल तर ते देवाच्या भयामध्ये, ईश्वरी कार्यामध्ये व पावित्र्यामध्ये टिकून राहू शकत नाहीत. त्यांनी आपला व्यवसाय बदलून प्रत्येक तासाला ते येशूच्या सान्निध्यात राहू शकतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:२३,२३४.ChSMar 139.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents