Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  सुरुवातीचे कामगार मेहनती व समर्पित

  आम्ही आपल्या तरुणांमध्ये विश्वास प्रगट करावा आणि तरुणांनी आपल्या माजी कामगार अधिकाऱ्यांचे कर्तृत्वान कामे पाहून त्या प्रमाणे प्रगति करण्याचे धाडस करावे. त्यांच्या सारखे त्यांनी स्वत:चे या कार्याला वाहून घ्यावे व कष्ट करावे. ख्रिस्ताच्या सेवकावर जो कार्याचा अधिभार आहे त्यांनी तरुणांना योग्य सल्ले देऊन त्यांना देवाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि जे अति कामाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. त्यांची उदाहरणे घेऊन तरुणांनी त्या मार्गाने चालावे. आईवडील, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सल्ला. ५१६, ५१७. ChSMar 49.3

  तरुणांना काम हवे आहे. देव त्यांना मिशनरी कार्यासाठी पाचारण करीत आहे. हे कार्य तुलनात्मक जबाबदारी आणि काळजीपासून मुक्त असे त्यांना आवडणारे कार्य आहे. ज्यांना प्रशिक्षण घेऊन सर्व प्रकारचे सहकार्य करुन काम व्यवसाय करतात त्यांच्यापेक्षा हे कार्य चांगले व महत्त्वाचे आहे. यातच तरुण मुले ही कोणतेही काम ताबडतोब शिकतात व त्यामध्ये तरबेज होतात. कष्टाचे काम करण्याची त्यांची पात्रता असते. नव्या वातावरणामध्ये सुद्धा ते सहज समावले जातात. ज्या ठिकाणी लो आहेत तेथे ते पोहोचतात. - कॉन्सल टू पेरेंटस्, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस् ५१७.ChSMar 50.1

  अनेक तरुणांना योग्य प्रकारचे शिक्षण त्यांच्या घरी मिळते आणि त्यांना सेवेसाठी तयार केले जाते. नव्या जागी जाऊन ते आपले कार्य उत्साहाने करतात. योग्य आणि योजनाबद्ध आणि विश्वासाने ते आपले कार्य करीत राहतात आणि वेळ पडल्यास ते त्यांच्या वरिष्ठ मिशनऱ्यांचेही सहाय्य घेतात. शहरातील कार्यामध्ये ही वरीष्ठांचा अनुभवच घेऊन कार्य करावे. त्यांच्याकडून त्यांना योग्य शिक्षण मिळते. ईश्वरी मार्गदर्शनाखाली आणि प्रार्थना सतत करुन आपल्या कार्याला सुरुवात करण्याची सवय ठेवावी. असे केले तर त्यांच्या कार्याला आशीर्वाद मिळेल. जसे हे कामगार जुन्या कामगारांशी एकत्र होतील. तेव्हा त्यांची पद्धत आणि तरुणांचे सामर्थ्य यामुळे कार्यामध्ये वाढ होईल आणि कार्यात यश मिळेल. त्यांना अनुभव असणाऱ्यांची साथ तर मिळतेच परंतु स्वर्गातील देवदूतही त्यांच्याबरोबर असतात आणि जसे आम्ही एकत्र काम करु तसे देवाची प्रार्थना करणे, गीते गाणे आणि त्याची स्तुती करीत त्याचे कार्य करु. विश्वासान, धैर्याने व स्वतंत्रपणे. भरवसा आणि विश्वास हे सर्व स्वर्गीय मंडळकडून येतेच. हेच देवदूत त्यांना साधेपणा, प्रार्थना आणि स्तुतिचा मार्ग दाखवितात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११९. ChSMar 50.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents