Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  उशीर करण्यासाठी वेळ नाही

  “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे. तो येऊन ठेपला आहे वेगाने येत आहे.” सफन्या १:१४. सुवार्ता प्रसाराचे बूट घालून खाड्खाड आवाज करीत कूच करा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४८. ChSMar 103.1

  मंडळीच्या सभासदांनी देवाच्या हुकूमावर कूच करण्यासाठी सतत तयार राहावे. त्याची आज्ञा पालनासाठी तत्पर असावे. ज्या ठिकाणी कार्य करायचे आहे असे तुम्हाला दिसेल तेथे पुढे जा आणि ते कार्य हाती घ्या. सतत येशूकडे पाहात राहा. जर मंडळीचा प्रत्येक सभासद मिशनरी कार्यकर्ता म्हणून जगू लागला तर राज्याची ही सुवार्ता सर्व देशातील लोकापर्यंत पोहोचेल. सर्व राष्ट्र सर्व भाषा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:३२.ChSMar 103.2

  जगाचा इतिहास बंद होण्याच्या आपणा जवळ जवळ जात आहोत. आपल्यासमोर मोठे कार्य आहे. या कार्याची समाप्ती होण्यासाठी शेवटचा इशाराचा संदेश या पापी जगाला द्यायचा आहे. असे काही लोक आहेत की जे द्राक्ष मळ्यात आपले काम करतात. प्रत्येक फाट्यापर्यंत ते आपले काम करतात. प्रत्येक फाट्यातून त्यांना उचलून देवाने त्यांना आपला संदेश पोहोचविण्यासाठी जगात पाठविले. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:२७०. ChSMar 103.3

  पृथ्वीच्या लांबी-रुंदीपर्यंत इशाराचा आवाज जाऊ द्या सर्व लोकांना सांगा की देवाचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. अति त्वरेने मोठा दिवस होत आहे. त्याविषयी कोणीही अज्ञान असू नये. आमच्याकडे कदाचित गरीब आत्मे असतील ज्यांना चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले असेल. कदाचित अशिक्षित व अडाणी लोकांना त्यांच्यावर नेमण्याची शक्यता असू शकते. सत्याप्रमाणे जे मिळाले आहे ते सर्व इतरांपर्यंत तेच पोहोचणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२२.ChSMar 103.4

  माझ्या बंधु-भगिनींनो, तुमचे सामर्थ्य या कार्यासाठी वाहून द्या. शेवटच्या घटकेला तुम्ही स्वर्गीय भांडारापासून वंचित राहू नये याची काळजी घ्या तेव्हा वेळीच स्वर्गीय भांडारातील सत्ये आताच जाणून घ्या. वधस्तंभावरील मरणावर विजय मिळविण्यासाठी हे कार्य पुढे सरकवा. आत्मे प्रकाशित करण्यासाठी त्यांचा शोध घ्या. तुमच्या बंधूच्या तारणासाठी कार्य करा. तुमचे कार्य हे अग्निच्या परीक्षेची साक्ष देईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:५६. ChSMar 103.5

  आम्ही हा संदेश प्रत्येक ओळ आणि प्रत्येक पानामधून लोकांना द्या. लोकांना निर्णय घेण्यास भाग पडेल आणि आमचे हे कर्तव्य आहे की लोकांना सत्य समजण्याची पूर्ण संधी द्यावी. त्यांनी चातुर्याने स्वत:चा निर्णय घेणे अति महत्त्वाचे आहे. देवाने त्याच्या लोकांना हे कार्य करण्यासाठी पाचारण केले आहे. हे कार्य त्यांना अति काळजीपूर्वक, कळकळीने ते आणि चातुर्याने करावे. कृपेचा काळ लवकरच बंद होत आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१२६, १२७.ChSMar 104.1

  आम्हाला वेळ गमावण्याची संधी नाही. शेवट जवळ आला आहे. ठिकठिकाणाहून देवाचे सत्य चोहीकडे पसरुन शेवटास जाईल आणि उजवीकडून डावीकडे धोके निर्माण होतील. देवाचा संदेश पोहोचविण्यासाठी ठिकठिकाणावरुन अडथळे निर्माण होतील ते सध्यापेक्षाही गंभीर होतील. शक्य होईल तितक्या लवकर आम्ही आपले कार्य वेगाने करायचे आहे कराण युद्धाची वेळ लवकरच सुरु होणार आहे. मला देवाकडून प्रकाश मिळाला आहे. लवकरच अंधाराचे साम्राज पसरणार आहे. चोर पावलांनी सैतानाने जे झोपले आहेत त्यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. मेंढराचे कातडे पांघरुन लांडगे देवाच्या लोकांमध्ये घुसून मेंढरांमध्ये चुकीची तत्त्वे पसरवित आहे. परंतु यामुळे देवाचा शेवटचा संदेश जगाला देण्यासाठी आता अधिकार कठीण होणार आहे. तेव्हा देवाने आम्हाला सहाय्य करुन आम्हाला आमच्या कार्यासाठी सहाय्य करण्यासाठी ख्रिस्त आपला पुढारी आहे. आम्हाला विजय मिळविण्यासाठी तोच आम्हाला आशीर्वाद देणार आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२२.ChSMar 104.2

  आता उशीर करण्यामध्ये धोका आहे. जो आत्मा तुम्हाला सापडतो त्याच्यासमोर बायबल उघडा कारण सैतानाने त्याच्या भोवती लबाडीचे जाळे पसरुन ठेवले आहे. मग एक दिवसाचा तरी उशीर का ? आजच का नाही सुरुवात करावी ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४४३.ChSMar 104.3

  ख्रिस्ताच्या अनुयायांना सावध आणि सत्यतेची गरज आहे. तेही प्रत्येक वयामध्ये, परंतु आता आपण सार्वकालिक जगाच्या किनाऱ्यावर उभे आहोत. आपण सत्याचा प्रकाश घेऊन उभे आहोत. हे महत्त्वाचे कार्य आपल्या जवळ आहे. देवाच्या महान सत्याचा प्रकाश जो आपल्या जवळ आहे त्याविषयी आपण दुप्पट सामर्थ्याने आणि उत्साहत करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने त्याच्या पात्रते प्रमाणे सर्व सामर्थ्याने कार्य करावे. माझ्या बंधूनो तुमचे तारण धोक्यात आणू नका. तुमच्या कार्यामध्ये तुम्हांला अपयश आले तर त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. कारण या कार्यासाठी देवानेच तुमची नेमणूक केली आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४६०, ४६१.ChSMar 104.4

  महत्त्वाचे प्रश्नChSMar 105.1

  सार्वकालिकता आपल्यासमोर लांबत चालली आहे. आपण यावर काय विचार करतो आहे. पडदा आता केव्हाही उघडला जाईल, परंतु आम्ही अजूनही आमच्या स्वार्थीपणाला चिकटून आहोत. अशा वेळीच आपल्या भोवती असणाऱ्या अनेकांचा नाश होत आहे ? यावेळी आपली हृदये कठिण झाली आहेत काय ? हे आपणास कळत नाही काय ? आपल्याला त्यांच्यासाठी कार्य आहे ते लोकांसाठी करायचे आहे याची आपल्याला जाणीव नाही काय?ChSMar 105.2

  माझ्या भावांनो आणि भगिनींनो तुम्ही त्यांच्यापैकी आहात काय त्यांना डोळे असून दिसत नाही आणि कान असून ऐकायला येत नाही ?ChSMar 105.3

  देवाने तुम्हाला जे ज्ञान व प्रकाश दिला आहे ते व्यर्थ आहे काय ? जगाचा शेवट जवळ आला आहे त्या विषयी देवाने इशाऱ्यावर इशारे दिले आहेत ते व्यर्थ आहे काय ?ChSMar 105.4

  जगावर जे काय येत आहे त्याची घोषणा दिली गेली आहे असा तुम्ही विश्वास धरीत काय ?ChSMar 105.5

  तुमचा विश्वास आहे आहे काय की देवाचा न्याय पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर टांगला आहे ?ChSMar 105.6

  मग तुम्ही निष्काळजी आणि सामान्यपणे कसे काय राहू शकता ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२६,२७.ChSMar 105.7

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents